तुम्हालाही प्रवास करताना गाडी लागत असेल तर हा उपाय करा; पुन्हा कधीही प्रवासात गाडी लागणार नाही..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण बऱ्याचदा कार ने किंवा बस ने प्रवास करतो, प्रवासाची आवड कोणाला नसते. पण अनेकजण प्रवास करायला घाबरतात. प्रवास तर आवडतोच पण प्रवासातून गाडी लागत असल्याने अनेकजण प्रवास करणेच टाळतात. प्रवासात अस्वस्थ वाटणं, पोटात मळमळणं असे अनेकांना होत.
आणि कहर म्हणजे प्रवासात गाडी लागणं अर्थात उलटी होणं याने तर भरपूर जण त्रस्त असतात. पण गाडी का लागते? प्रवासात उलटी का होते? आणि प्रवासात गाडी लागू नये आणि प्रवास आनंदी होण्यासाठी काय केले पाहिजे या सगळ्याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
असं काय होत गाडीत बसल्यावर कि आपल्याला उलटी होते? उलटी होते म्हणजे खाल्लेलं वर येतं. तुम्ही म्हणाल गाडी हलत असते म्हणून शरीरातील अन्न ढवळून वर येत आणि उलटी होते. तुम्ही जर का हे लॉजिक लावलेलं असाल तर तुम्ही चुकत आहात. Motion Sickness या शब्दाचं नाव तुम्ही ऐकलच असेल. Motion म्हणजे हालचाल आणि Sickness म्हणजे आजारपण, याचाच अर्थ हालचालीमुळे येणारं आजारपण. हे आपल्याला विमान प्रवास, बोटीचा प्रवास, गाडीच्या प्रवासात येऊ शकतं.
प्रश्न असा आहे कि हा Motion Sickness येतो कसा? याचं उत्तर आहे डोळे आणि कानांचा न जुळलेला ताळमेळ. ज्याला Conflicting Signal Theory असेही म्हणतात. आता तुम्ही म्हणाल डोळे आणि कानांचा कसला ताळमेळ? तर गाडी सुरु झाल्यानंतर तुम्ही आरामात पाठ टेकवून बसलेला असता. तुमचे डोळे गाडीच्या आत मध्ये असलेल्या सर्व गोष्टी बघत असतात.
अगदी ड्राइवर च्या सीट पासून ते बाजूला बसलेल्या माणसा पर्यंत. गाडी तर चालू असते पण गाडीतल्या वस्तूंची मुव्हमेंट नसते. पण त्याचवेळी आपले कान सर्वकाही ऐकत असतात. गाड्यांचा मागे जाणारा आवाज, हॉर्न आणि बरंच काही आपले कान ऐकत असतात. आणि मेंदूकडे सिग्नल्स पाठवत असतात. त्याचवेळी डोळे सुद्धा आपले काम मेंदूंपर्यंत पाठवण्याचं काम करत असतात, आणि मग मेंदू गोंधळात पडतो.
आपला मेंदू माहिती गोळा करत असतो. प्रवास करत असताना डोळे आणि कान वेगवेगळी माहिती देतात. डोळे म्हणतात हालचाल नाहीय आणि कान म्हणतात हालचाल आहे. या दोघांचे सिग्नल बघून मेंदू कंफ्यूस होतो आणि मग होते उलटी. आता प्रश्न असा आहे कि कानाला हालचाल झालीय हे कसं कळतं.? आणि वेगवेगळे सिग्नल्स मिळाल्यानंतर मेंदू उलटी का करायला सांगतो.?
कानाच्या आतल्या बाजूला एक Vascular System असते. Vascular System म्हणजे कानाच्या एका बाजूला Liquid असते आणि दुसय्रा भागात थोडेसे केस असतात. जेव्हा हालचाल होते तेव्हा Liquid हलतं. आणि हालचालींवर आदळून केसांची पण हालचाल होते, यावरून मेंदूला हालचाल होत असल्याचं समजते.
पण आता उलटी का होते.? याच कारण आहे Neurotoxin, म्हणजे एक प्रकारचं विष जे खाण्या पिण्यात असतं. मेंदूला जेव्हा शरीरात Neurotoxin प्रवेश झाल्याचे संकेत मिळतात तेव्हा मेंदूला वाटते शरीरात Poisons ची एन्ट्री झाली आहे. मेंदूला समजतांच लगेचच शरीरात सूचनांचा सिग्नल जातो. पोटातलं सर्व बाहेर काढण्याची प्रक्रिया मेंदूद्वारे सुरु होते. आणि तोंडाला लाळ येऊन उलटी होणार आहे याचे Symptoms दिसून येतात.
पण हे सगळं टाळता येऊ शकतं का.? तर उत्तर आहे हो हे टाळता येऊ शकतं. प्रवासात हे टाळण्यासाठी शक्य तितक्या लांब पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच खिडकीतून बाहेर बघा, कदाचित तुम्हाला फरक जाणवेल.
तर मित्रांनो प्रवासात गाडी लागण्याबाबत हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना शेअर करायाला विसरू नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.