मोक्षप्राप्तीसाठी हे पाऊल कदापिही उचलू नका.
नमस्कार मित्रांनो,
मला मोक्ष हवं आहे. मी लिहिलेली ही गोष्ट जो कोणी वाचत आहे त्याने मला अपराधी समजू नये. रात्रीचे अकरा वाजले. आता ना दुःख आहे ना भय आणि नाही थंडी वाजते. हे सगळं करण्यासाठी मला दोन तास लागले. सगळ्यांना मी झोपेच्या गोळ्या दिल्या. आज माझा अक्षरही बदल्यासारख वाटतंय.
हे मी अचानक केलं आहे अशातला भाग नाही. ना मला कुणाचं भय होत आणि नाही कुणाच कर्ज माझ्या डोक्यावर होत. 50 हजार पगार होता मला. आयुष्यातील सगळी स्वप्न पूर्ण करून झाले आहेत. पण मी काय मिळवलं. मी लहानपणापासूनच सगळ्यांपेक्षा वेगळा होतो.
जेव्हा जगाची चाली रीती कळू लागलं तेव्हा संसारिक सुखापेक्षा मी जगाला वेगळ्या नजरेनं पाहिलं. जगाचं खरं रूप मला कळलं. माझं मन गेल्या 15 वर्षांपासून सन्यासी बनलं होतं. मला मोक्षप्राप्ती पाहिजे होती. पण मी संसाराच्या कचाट्यातून मुक्त होऊ शकलो नाही. हळूहळू माझे विचार बदलू लागले. माझी पत्नी सविता ही माझ्यासारखीच आहे.
जेवढं आहे किंवा जे काही आहे तेवढ्यातच ती खुश राहायची या माझ्यासारख्याच विचारांची होती. आम्ही आता भावाला माफ केल आहे. मी तर फकीर होऊन संन्यासी झाल्यासारखा जगत होतो. माझ्या बायकोनेही हो ला हो केलं. शेवटपर्यंत मला साथ देण्याचं तिनं म्हटलं.
गेल्या 10 ते 15 वर्षात मी अनेकदा घरातून निघून संन्यास घेण्याचा विचार सुद्धा केला होता. पण 2 वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडलेल्या घटनेने मला आणखी बळ दिलं. माझं शरीर आता थकलं होतं, घसा त्रास देऊ लागला होता. श्वास घेताना, खाताना, झोपताना, बोलताना प्रत्येक वेळी डोकं एकदम सुन्न होऊन जायचं.
गेल्या वर्षी मी सगळ्यांशी संन्यास मागितला. मला मुक्त करा असं म्हणत अनेकदा मी बायकोसमोर रडायचं पण बायको मला थांबवायची. शेवटी चार-पाच दिवसात डोक्यान हार मानल. मी पत्नीला सांगितलं तिनं माझं यावेळी म्हणणं मान्य केलं आणि शेवटच्या वेळेस माझ्यासोबत राहण्याच वचन घेतलं. सर्वांची क्षमा मागतो.
तुम्ही मला माफ करा मी तुम्हाला खूप त्रास देतोय आणि निष्पाप आणि साधी भोळी सवितासोबत निरागस मुलांना या मतलबी जगात मी एकट नाही सोडू शकत त्यांना सोबत घेऊन जातो आहे. संदीप तुझीही माफी मागतो. मागच्या वर्षी तुलाही सांगितलं होतं की, पण हे सगळं होणारच होतं. मी रस्त्यावर जातोय शरीरावरील ओझं हलकं करायचं आहे.
पहाटेचे चार वाजले होते मी घरातून बाहेर पडलो होतो. कडाक्याच्या थंडीत तुम्हा सगळ्यांना अडचणी टाकून चाललोय मला क्षमा करा. तुम्हा सगळ्यांची मी क्षमा मागतो तुमचा रमेश. मित्रहो ही सुसाईड नोट जी आपण आता पाहिली ती हरियाणातील हिस्सारमध्ये राहणाऱ्या रमेश नावाच्या तरुणाने लिहिली आहे.
या 20 डिसेंबरला रमेशने आपली तीन मुलं आणि पत्नीला झोपेच्या गोळ्या देऊन त्यानंतर लोखंडी रॉडने त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःच्या गळ्याला विजेची तार गुंडाळी मात्र त्याची आत्महत्या होऊ शकली नाही. नंतर त्याने एका वाहनाखाली उडी मारून आत्महत्या केली.
हे सगळं त्याने का केलं? फक्त मोक्षप्राप्ती मिळावी यासाठी, त्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा होती. अशा पद्धतीने कुणाची हत्या करून किंवा आत्महत्या करून मोक्ष कधीच प्राप्त होत नसतो. मोक्षप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या, साधना करावी लागते.
अशाप्रकारे कोणाच्या सांगण्यावरून किंवा एखाद्या ग्रंथांमध्ये काहीतरी वाचून त्याचा असा चुकीचा अर्थ काढून जर आपण कोणाची हत्या करत असाल आत्महत्या करत असेल तर त्याने मोक्ष हा कधीच प्राप्त होत नाही. आपण सर्व सुज्ञ आहात. कृपया विनंती आहे अशाप्रकारचे पाऊल आपल्याकडून
कधीही उचलल जाणार नाही आणि आपले मित्र परिवार आहेत, कुटूंबीय आहेत यांना सुद्धा अशा घटनांपासून आपण परावृत्त करा. मोक्ष प्राप्तीचा हा अत्यंत चुकीचा आणि अत्यंत अपयशी असा प्रकार आहे कृपया या प्रकारांना बळी पडू नका.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.