महिलांनो मासिक पाळीत खूप त्रास होणे, ओटी पोटात, दुखणे, कंबर, पाय दुखणे यावर जबरदस्त घरगुती रामबाण उपाय नक्की वाचा महत्वपुर्ण माहिती !
बऱ्याच महिलांना पाळीच्या वेळी पोटात दुखणे पायात गोळे येणे ओटीपोटात दुखणे कंबर दुखणे अशा समस्या असतात. या समस्या हार्मोनल इनबॅलन्स मुळे होतात. लहान मुलींनाही हा त्रास होत असतो.
आयुर्वेदानुसार शरीरात होणाऱ्या कोणत्याही वेदना या वातामुळे होतात. शरीरात असणाऱ्या वात, पित्त, कफ या त्रिदोषांपैकी वात दोष जर वाढला तर शरीरात वेदना होतात.
पूर्वीच्या काळी पाळी आली की महिलांना वेगळं बसवलं जात होतं. त्यांनी घरचं कोणतेही काम करण्यास मनाई होती देवपूजा करणे देवाला जाणे किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत्या की महिलांची पाळी होणे म्हणजे विटाळ मानले जाई. आत्ताची मॉडर्न लोक याला थोतांड म्हणतात पण याचा उद्देश महिलांना विश्रांती देणे हाच होता. कारण त्या काळात कुटुंब मोठी असल्यामुळे महिलांना भरपूर काम होती आपलं मत व्यक्त करण्याची त्यांना परवानगी नव्हती. म्हणूनच या काळातील विश्रांतीची गरज भागविण्यासाठी धर्मातील नियमाच्या नावाखाली महिलांची चांगली सोय केली गेली.
अलीकडच्या मॉडर्न जमान्यात टीव्हीवर आपण जाहिराती पाहतो. त्या मध्ये पॅड वापरून तुम्ही त्यात मुली नाचताना पाहता. पळताना पाहता नाच गाणं करताना पाहता. व्यायाम करताना पाहता पण हे पूर्ण चुकीच आहे. मैत्रिणींनो साधी बोटाला एखादी जखम झाली आणि त्यातून रक्तस्राव होत असेल तर आपण किती जपतो. आणि या काळात तर चार दिवस आपण या प्रक्रियेतून जात असतो. मग विचार करा तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे जाहिरात बघून नाच करणे, पडणे या गोष्टी अजिबात करू नका.
मैत्रिणीनो, या काळात जर आपल्या पोटात कळ येत असेल, ओटीपोटात दुखत असेल, पायात गोळे येत असतील तर याचा अर्थ तुमचा वातप्रकोप वाढला आहे. त्यासाठी आपण एक घरगुती सोपा उपाय पाहणार आहोत.
मैत्रिणींनो यासाठी ज्या दिवशी मासिक पाळी येते त्या दिवशी एक चमचा कच्चा ओवा घ्या आणि यात अर्धा चमचा काळे मीठ मिक्स करा. काळे मीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही घरी वापरता ते पांढरे मीठ वापरू शकता. हे मिश्रण तुम्ही चावून-चावून खा. तुमचा तोंडातील लाळ त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. त्यानंतर त्यावर कडकडीत गरम पाणी प्या. जसे चहा गरम पितो तेवढा गरम पाणी प्या. हा उपाय तुम्ही चार दिवस करा.
मैत्रिणींनो यामुळे वाताचे शमन होईल. ओव्या मुळे वात निघून जाईल आणि यामुळे शरीरात कोणत्याही भागात होणाऱ्या वेदना थांबतील. हा विशेषता ओटीपोटातील कोणत्याही वेदनेसाठी हा रामबाण उपाय आहे.
मैत्रिणींनो वाताचे प्रमुख ठिकाण म्हणजे कंबर, ओटीपोट आणि पाय म्हणून आपण चंदन बना लाक्षादि तेल किंवा बला तेल यापैकी कोणत्याही एका तेलाने महिनाभर मॉलिश करावे. नारायणी तेल सुद्धा चालेल. हे तेल कंबर ओटीपोट पाय यांना चोळून चोळून जिरवावे. हा उपाय तुम्ही सलग महिनाभर करावा.
मैत्रिणींनो पुढच्या उपायासाठी आपल्याला मंजिष्ठा चूर्ण आणि अनंतमूळ चूर्ण लागेल. रक्तावर काम करणाऱ्या म्हणजे रक्ताची शुद्धता करणाऱ्या या खूप सुंदर वनस्पती आहेत. याचा काढा करून घ्यायचा आहे आणि हा उपाय सलग महिनाभर करायचा आहे.
हा काढा करण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी उकळत ठेवा त्यामध्ये अर्धा चमचा मंजिष्ठा चूर्ण घाला. दहा काळे मनुके सुद्धा घालू शकता. दोन कपाचे एक कप काढा होईपर्यंत हे पाणी उकळून घ्या. त्यानंतर ते कपामध्ये गाळून घ्या. आता त्यात अनंतमूळ चूर्ण अर्धा चमचा टाका आणि झाकून ठेवा. हा काढा कोमट झाल्यानंतर प्यावा.
मैत्रिणींनो यातील पुढच्या उपाय यासाठी आपल्याला बारा-पंधरा काळे मनुके आणि गायीचे तूप लागेल. एका भांड्यात गायीचे तूप कडकडीत गरम करून घ्या आणि यात दहा-बारा किंवा मुठभर काळे मनुके घालून गरम करा नंतर थोड काळ मीठ घाला. दिवसभरात कधीही हे मनुके खा. खाताना भरपूर चावून खा. अशा पद्धतीने एकाच वेळेस भरपूर मनुके तूपात भाजून तयार करून ठेवू शकता. मात्र एका दिवशी मुठभर मनुके खायचे आहेत. अतिशय सुंदर आणि गोड उपाय आहे. हा उपाय तुम्ही सलग महिनाभर करायचा आहे.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.