मांसाहार करणे पाप आहे कि पुण्य?
नमस्कार मित्रांनो,
मांसाहार करणे पाप आहे कि पुण्य या विषयाला घेऊन वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते आहेत. एकीकडे मांस खाणारे याला योग्य मानतात तर दुसरीकडे शाकाहारी व्यक्ती मांस खाणे पाप आहे असे म्हणतात.
गरुड पुराणामध्ये एक कथा सांगितली गेली आहे ती ऐकल्यावर तुम्हाला स्वतः कळेल मांस खाणे योग्य की अयोग्य. भगवान श्री कृष्ण एकदा बासरी वाजवत झाडा खाली बसले होते तेव्हा एक हरीण तिथे आले, त्याच्या पाठोपाठ एक शिकारी हि आला आणि म्हणाला हि शिकार माझी आहे ती मला द्या.
तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणाले कोणत्याही जीवाला मारून खाणे हे योग्य नाहीये, हे खूप मोठे पाप आहे. त्यावर त्या शिकाऱ्याने ने उत्तर दिले, मी तुमच्या सारखा एवढा ज्ञानी नाहीये पण माहित आहे कि कोणत्या जीवाला मारून खाणे हे पाप नाहीये, त्याला मारून मी मुक्त केले आहे.
जुन्या काळामध्ये मोठमोठे राजे प्राण्यांना मारून आपली भूक भागवत होते. तेव्हा श्री कृष्णांनी त्याला एक कथा ऐकण्यास सांगितले, शिकारी कथा ऐकायला तयार झाला. भगवान श्री कृष्णांनी कथेला सुरुवात केली,
एकदा एका गावा मध्ये अन्नटंचाईची समस्या सुरु झाली, त्या गावच्या महाराजांना आपल्या प्रजेची खूप चिंता वाटू लागली, राजाने एक सभा भरवली आणि सभे मध्ये सर्व अधिकाऱ्यांना सर्वात स्वस्त अशी कोणती गोष्ट आहे ज्याने प्रजेच्या भुकेचा हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो असे विचारले.
सर्वांनी आपापली मते मांडण्यास सुरुवात केली. त्याच वेळी शिकारी प्रेमी अधिकारी आपले मत सांगण्या साठी पुढे आला आणि राजाला म्हणाला – सर्वात स्वस्त असे मांस आहे, हे ऐकल्यावर त्या राज्याचा प्रधान मंत्र्याने आपले मत मांडण्या साठी राजाकडे थोडा वेळ मागितला.
त्या रात्री तो प्रधान मंत्री त्या अधिकाऱ्याच्या घरी गेला आणि त्याला सांगितले, राजाची तब्येत अचानक बिघडली आहे आणि औषध म्हणून एका बलाढ्य व्यक्तीच्या शरीराचे 2 किलो मांस हवे आहे. तुम्ही योग्य व्यक्ती आहेत, मी तुम्हाला 1 लाख सोन्याच्या मुद्रा देतो,
यावर अधिकारी घाबरला आणि आतमध्ये जाऊन त्याने आणखी 1 लाख मुद्रा घेऊन आला आणि प्रधानमंत्री ला सांगितले जीवच नाही राहिला तर काय करू मी ह्या मुद्रांचे.
तुम्ही हे घेऊन जा आणि दुसरा व्यक्ती शोधा. प्रधान मंत्री ने त्या 2 लाख मुद्रा घेऊन अजून खूप अधिकाऱ्यांकडे जाऊन पहिले पण कोणी हि मांस द्यायला तयार नाही झाले, असे करत प्रधानमंत्री कडे अब्जावधी मुद्रा जमा झाल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी सभे मध्ये प्रधानमंत्री ने त्या मुद्रा राजा समोर आणल्या आणि म्हणाला कि खरंच मांस खूप स्वस्त आहे, राजा ने नंतर त्या सर्व मुद्रा घेऊन अन्नधान्य साठा केला आणि शेतामध्ये बदल करून भरघोस उत्पादन केले आणि अन्नटंचाई चा प्रश्न सोडवला.
शेवटी मंत्री ने अधिकाऱ्याला सांगितले की, जसा आपला जीव आपल्याला खूप मोलाचा वाटतो तसाच सर्वाना आपला जीव मोलाचा वाटतो, कोणाचा जीव घेतला तर त्याचे पाप एका जन्मी नाही तर पुढचे सगळ्या जन्मा मध्ये आपल्याला भोगावे लागते.
त्या अधिकाऱ्याला त्याची चूक समझली आणि त्याने माफी मागितली कि मी कधी कोणाचा जीव घेणार नाही.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.