मंगळसूत्रातील दोन वाट्या आणि काळे मणी घालण्यामागे काय आहे शास्त्र.? हे आहे त्यामागील महत्वाचे कारण.!

मंगळसूत्रातील दोन वाट्या आणि काळे मणी घालण्यामागे काय आहे शास्त्र.? हे आहे त्यामागील महत्वाचे कारण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुलगी जेव्हा विवाह बंधनामध्ये अडकते तेव्हा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले जाते. पती आपल्या पत्नीला विवाहाच्या दरम्यान मंगळसूत्र गळ्यामध्ये घालत असतो तेव्हापासून त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात होऊ लागते. एका सवाष्ण ची ओळख तिच्या मंगळसूत्र वरून होत असते.गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले जाते तेव्हा कुमारी पासून तिची ओळख एक सुवासिनी म्हणजेच सवाष्ण याद्वारे जग ओळखू लागते.

अनेकदा मंगळसूत्र म्हणजे लग्नाचे लायसन्स आहे असे म्हणून थट्टा सुद्धा केली जाते परंतु या मंगळसूत्राला आध्यमिक तसेच धार्मिक सुद्धा महत्त्व आहे. मंगळसूत्र हे सवाष्ण स्त्रीचे शास्त्र मानले जाते अशा महिलेकडे कोणीही वाईट नजरेने पाहत नाही. मंगळसूत्र मध्ये काचेच्या काळया रंगाच्या दोन पदरी गुंफण केलेली तसेच मध्यभागी सोन्याच्या दोन दोन मणी तसेच मध्यभागी दोन वाट्या असतात अशाप्रकारे मंगळसूत्राची रचना असते.

या मंगळसूत्र मध्ये दोन पदरीची काळे मणी हे आता पती-पत्नींना एकमेकांसोबत आयुष्यभर साथ द्यायची आहे याचे प्रतीक आहे आणि दोन वाटी म्हणजे पती-पत्नी आहेत व या दोन वाटेच्या आजूबाजूला चार मनी असतात ते म्हणजे धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष आणि पुरुषार्थ यांचे प्रतीक मानले जाते म्हणजेच लग्नानंतर मुलीला आई, पत्नी असे अनेक कितीतरी नात्यामध्ये गुंफण करावी लागते.

यामध्ये महिलेला धर्माचे आचरण करावे सुद्धा लागते. मुलगी जेव्हा माहेरी असते तेव्हा तिला घरातील खर्चाबद्दल काळजी करण्याचे कारण नसते परंतु जेव्हा स्त्री लग्न करून सासरी जाते तेव्हा स्त्रीला घरातील सर्व व्यवहार पाहावे लागतात यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा सुद्धा समावेश असतो. मंगळसूत्र मधील वाट्या व त्यामध्ये असणारी तार ही आपल्या कुलदेवतेचे स्मरण करत असते याचा अर्थ असा होतो की आता मुलीने माहेरील कुलदैवताला विसरून सासरच्या कुलदेवतेला वंदन करायला हवे व या कुलदेवतेच्या सन्मान करून आपल्या कुळाला वाढवायला हवे याचे प्रतीक असते.

त्याचबरोबर मंगळसूत्र मधील दोन वाट्या एक हळद म्हणजेच माहेरचे प्रतीक असते तर दुसरे कुंकू म्हणजे सासरचे प्रतीक असते. मंगळसूत्र प्रमाणेच पती-पत्नी यांचे नाते पवित्र असते आणि त्याच बरोबर आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये लग्नानंतर मंगळसूत्र घालणे पवित्र मानले जाते यामुळे महिलेच्या अलंकार भूषण मध्ये वाढ होते व त्यांच्या सौंदर्यामध्ये वाढ होतेच पण त्याचबरोबर मंगळसूत्र परिधान केल्याने पतीसुद्धा पत्नीकडे आकर्षित होत असतात अशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र या दागिण्याला अतिशय महत्व प्राप्त आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *