महिलांच्या अंगावरून पांढरे जाणे (श्वेतपदर) फक्त तीन दिवसात बंद करा या खास घरगुती उपायने? महिलांसाठी उपयुक्त अशी माहिती ….!!
मित्रांनो, स्त्री ही घरची लक्ष्मी असते. महिला वर्ग जरी घरात असेल तरीदेखील त्यांना घरातील कामे भरपूर करावी लागतात. घरातील कामामुळे त्यांना आपल्याकडे लक्ष देणेदेखील होत नाही. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मित्रांनो सर्वांना असे वाटते की, महिला या घरात असल्यामुळे त्यांना काहीच त्रास होत नाही. परंतु मित्रांनो काही शारीरिक समस्या असतात त्या महिलांना सहन करावे लागतात. त्याचा त्रास सहन करावा लागतो. मित्रांनो महिलांच्या बाबतीत शारीरिक दृष्टीने अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये स्त्रियांच्या अंगावर जाणे ही एक खूप मोठी समस्या आहे. प्रौढ महिला असो किंवा लहान मुली असो या महिलांना जर अंगावर पांढरे जात असेल तर त्याचा खूपच त्रास सहन करावा लागतो.
यामध्ये महिलांची कंबर दुखणे, हात पाय गळणे आणि खूपच थकवा जाणवतो. यामुळे वैवाहिक जीवनात देखील अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. अनेक महिला यावर डॉक्टरांचा सल्ला घेतात तसेच काही गोळ्या, औषधे घेतात. परंतु अंगावर पांढरे जाणे ही समस्या दूर होत नाही. मित्रांनो महिलांच्यासाठी आज मी एक घरगुती उपाय सांगणार आहे. जेणेकरून महिलांच्या बाबतीत असणारा हा पांढरे जाण्याचा आजार पूर्णपणे कमी होणार आहे. मित्रांनो हा उपाय करण्यापूर्वी महिलांनी आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
आपल्या आहाराकडे विशेषतः लक्ष दिले पाहिजे. त्यांना सात्विक आहार घेणे खूप गरजेचे आहे म्हणजेच तेलकट, तळलेले पदार्थ आपल्या जेवणामध्ये त्याचा समावेश करायचा नाही. महिला या घरातील कामामुळे आपल्या आहाराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांचे आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष होऊन जाते. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते.
तसेच मैत्रिणींनो महिलांनी आपल्या जेवणामध्ये दह्याचा वापर केला पाहिजे. संध्याकाळी मात्र दही खाऊ नये. त्याऐवजी त्यांनी एक ग्लास दूध द्यावे तसेच फळांचा देखील आहारात समावेश करणे गरजेचे आहे. तसेच मैत्रिणींनो पाणी भरपूर पिले पाहिजे. ज्या महिलांना पांढरे जाण्याचा त्रास आहे त्या महिलांनी पाणी भरपूर पिले पाहिजे. तर मैत्रिणींनो पाहूयात पांढरे जाणे या आजारावरती खास घरगुती उपाय कोणता आहे तो.
मैत्रिणींनो या उपायासाठी आपल्याला लागणार आहे धने. धने हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. उष्णतेचे काही जरी आजार असेल तर आपण धण्याचा वापर करतो. धने हे शितल असल्यामुळे त्याचा उन्हाळ्यामध्ये वापर भरपूर लोक करतात. तसेच उन्हाळी लागणे यावर देखील अनेक जण धण्याचा वापर करीत असतात. तर मैत्रिणींनो आपल्याला या उपायासाठी दोन चमचे धने घ्यायचे आहेत आणि हेच धने तुम्हाला मिक्सर मधून किंवा खलबत्त्यात कुटून बारीक करून न घ्यायचे आहेत. हे दोन चमचे धने घेतल्यानंतर तुम्हाला एका स्टीलच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचे आहे.
मैत्रिणींनो कोणताही आयुर्वेदिक उपाय करीत असताना स्टिलच्या भांड्यांचा वापर करायचा आहे. जर्मनी भांड्याचा वापर अजिबात करायचा नाही. तर मैत्रिणींनो स्टीलच्या पातेल्यात एक ग्लास पाणी घेतल्यानंतर तुम्हाला बारीक केलेले धन्याची पावडर त्यामध्ये दोन चमचे घालायचे आहे आणि पाणी अगोदर थोडेसे गरम करून द्यायचे. आणि नंतर त्यामध्ये दोन चमचे हे बारीक धने त्यामध्ये टाकायचे आहेत आणि उकळायचे आहे. एक ग्लास पाण्याचे एक कप पाणी होईपर्यंत तुम्हाला ते गॅसवर उकळून घ्यायचे आहे.
एक कप पाणी झाल्यानंतर हे पाणी तुम्हाला गाळून घ्यायचे आहे. जो काही चोथा राहणार आहे तो तुम्ही चाऊन देखील खाऊ शकता. पित्ताचा जरा अनेकांना त्रास असेल तर त्यांनी हाच चोता चावून खाल्ल्याने त्यांचा पित्ताचा त्रास कमी होऊन जातो. तर मैत्रिणींनो हे एक कप पाणी ज्या महिलांना अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास आहे त्या महिलांनी सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी हे पाणी प्यायचे आहे. थोडेसे पाणी कोमट होऊ द्यायचे आणि हे पाणी तुम्हाला द्यायचे आहे. सलग दहा दिवस तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे. तुम्हाला तीन दिवसातच फरक जाणवेल की आपल्या अंगावरून पांढरे जाणे कमी झाले आहे. परंतु मैत्रिणींनो तुम्हाला दहा दिवस हे पाणी प्यायचे आहे.
तर मैत्रिणींनो तुम्हाला देखील अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास असेल खूप असह्य वेदना होत असतील किंवा पांढरे जाण्याच्या समस्यांमुळे अनेक प्रॉब्लेम्स वैवाहिक प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यासाठी घरगुती उपाय केल्याने तुमचा हा त्रास कमी होऊन जाणार आहे. तर मैत्रिणींनो घरगुती उपाय एकदा नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.