महिला डोक्यावर पदर का घेतात.? फक्त १% लोकांनाच माहित आहे यामागील रहस्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे.आज ही आपल्या घरातील ज्येष्ठ स्त्रिया डोक्यावर पदर घेताना आपल्याला दिसतात परंतु आधुनिक जीवनशैली व पाश्चात्त्यांचे अनुकरण करून हळूहळू डोक्यावर पदर घेण्याची पद्धत कमी कमी होत आहे.आताच्या या मुलींना डोक्यावर पदर घेणारी स्त्री काकूबाई वाटते. काही अंशी खरेही आहे आता प्रत्येक स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे आणि कुटुंबाची जबाबदारी पुरुषांइतकेच घेत आहे किंबहुना पुरुषांपेक्षा स्त्रियांचे योगदान सुद्धा जास्त आहे मग पदर सांभाळत बसण्यात काय अर्थ आहे.
काही महिला पदर याला बंधन समजत असतात परंतु पदर म्हणजे काही बंधन नाही. पदर म्हणजे काही मर्यादा आहेत. एखद्याचा मान सन्मान ठेवणे त्यांचा आदर करणे हे पदरद्वारे दाखवता येते परंतु नुसता डोक्यावर पदर घेऊन खरोखर आपण समोरच्या व्यक्तीला मान देऊ शकतो का? असे म्हणतात की नाकापर्यंत पदर आणि वेशी पर्यंत नजर.
काही जण बाहेर डोक्यावर पदर घेतात परंतु घरात त्यांची वागणूक अतिशय चुकीची असते पण चांगली वर्तणूक करून सर्वांशी मिळून मिसळून राहून आपण आपला आदर प्राप्त करू शकतो परंतु ज्यावेळी आपण एखादे धार्मिक कार्य करत असतो देव पूजा, होम, हवन करत असतो अशावेळी डोक्यावर पदर नेहमी घ्यायला हवा.आपण देवांपेक्षा मोठे नाही परंतु ते त्यांना मान जरूर द्यावा. आपण कितीही मोठे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलो तरीही भगवंता पेक्षा मोठे नक्कीच नाहीये.या गोष्टीचे भान ठेवावे. पदर म्हणजे मर्यादा आहे. पदर म्हणजे दोन व्यक्तींमधील एक प्रेम आदर भावना आहे.
पूर्वीच्या काळी अनेक महिला डोक्यावर पदर घेत असत परंतु नाकापर्यंत पदर घेत नसत. त्यानंतर मुघलांचे राज्य आले तेव्हा अनेक मुघल आपल्या भारतीय महिलांचे चेहरा पाहून त्यांना पळवून घेऊन जात असे त्यानंतर म्हणूनच अनेक महिला आपल्या डोक्याचा पदर नाकापर्यंत घेऊ लागले .पदर म्हणजे बंधन नाही.पदर म्हणजे संरक्षण आहे परंतु प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो.
प्रत्येकांनी पदर घ्यायचा की नाही हा त्याच्या त्याच्या मनाचा मोठेपणा असतो म्हणूनच पदर हा एक बंधन नसून तो एक संरक्षण दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचे मानले गेलेले आहे. तसे पाहायला गेले तर आपल्या जुन्या परंपरा व संस्कृती तशा सगळ्यात वाईट नाही परंतु त्या संस्कृती आणि परंपरा आपल्या कल्याणासाठी आणि उत्कर्षासाठी सुद्धा आहेत हे आपण विसरायला नाही पाहिजे.
जेव्हा एखादी महिला व्यवस्थित साडी पदर मध्ये चांगली शोभून दिसते तितकी ती आधुनिक परंपरेला अनुसरून असलेल्या पोशाखांमध्ये शोभून उठून दिसत नाही म्हणूनच अनेकदा पदर हा भारतीय संस्कृतीचा आरसा सुद्धा मानला जातो कारण की या आरशामध्ये भारतीय स्त्री अत्यंत सोज्वळ सुबक दिसत असते.
सध्याच्या काळामध्ये जरी आपण आधुनिक परंपरेत वावरत असलो तरी आपण बाहेरील देशांचा पोशाख पाहिला तरी तिकडचे लोक आपल्या संस्कृतीचे अनुकरण करत आहेत आणि आपण मात्र आपण तिकडच्या संस्कृतीचे अनुकरण करत आहोत म्हणून डोक्यावर पदर घेणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक बाब असला तरी या वैयक्तिक बाबी मुळे आपली संस्कृती सुद्धा तेवढी टिकून राहत असते.
म्हणून आपली संस्कृती जर एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला द्यायची असेल तर आपल्या संस्कृतीचे व परंपरा चे रक्षण करणे सुद्धा आपल्या हातातच आहे म्हणून आज सुद्धा भारतामध्ये असे अनेक काही महिला आहेत ज्या अध्याप सुद्धा डोक्यावर पदर घेत असतात म्हणून डोक्यावर पदर घेणे म्हणजे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही तर डोक्यावर पदर घेणे म्हणजे एक संस्कृती आहे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना सन्मान देणे याचा असा अर्थ सुद्धा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.