महिला जर अशा प्रकारे घर पुसत असतील तर येते घरात गरिबी; पाण्यात नक्की टाका 1 वस्तू.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. असे म्हणतात की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. आपण आपले घर नेहमी स्वच्छ करत असतो घरामध्ये असलेली अस्वच्छता बाहेर काढत असतो आणि घर नेहमी साफ सफाई करून स्वच्छ ठेवत असतो ,यासाठी अनेक प्रयत्न करतो. वेळोवेळी घर झाडून स्वच्छ करतो .फरशी पुसतो कितीतरी प्रकारे आपण आपल्या घराची स्वच्छता करीत असतो परंतु फरशी पुसताना आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आपण फरशी पुसताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. फरशी पुसताना काय करावे.? फरशी पुसण्याच्या पाण्यात काय टाकावे म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल घरात सकारात्मक ऊर्जेचा येण्यासाठी काय करावे हे सर्व जाणून घेणार आहोत. एका गोष्टीची आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.संध्याकाळच्या वेळी फरशी अजिबात पूसू नये त्याचबरोबर सूर्यास्तानंतर झाडू मारू नये हे तर आपण सगळ्यांनी ऐकलेच असेल.
फरशी पूसूनही आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा व घरातील संपन्नता नष्ट होते.फरशी पुसताना जो कपडा आपण वापरतो तो कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा प्रकारे ठेवावा.कपडा किचनमध्ये असेल तर मग कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे ठेवा, ज्याप्रमाणे आपण घरातील झाडू कोणाला दृष्टीस पडणार नाही अशा प्रकारे ठेवतो त्याप्रमाणे फरशी पुसण्याचे कपडेही कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे ठेवावे.
आपल्या किचनमध्ये कधीही हा कपडा ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते व घरात वास्तुदोष उत्पन्न होतो फरशी पुसताना शक्यतो खाली बसूनच कशी पुसावी यामुळे देवी लक्ष्मी स्थिर राहते परंतु आज काल मोब आलेले आहे. घरात असल्यामुळे आपण उभे राहूनच फरशी पुसत असतो परंतु आठवड्याभरातून एकदातरी खाली बसून कानाकोपर्यातून फरशी पुसायला हवी त्याचबरोबर फरशी पुसताना आपण जे पाणी वापरतो त्या पाणी मध्ये आपल्या घरातील एक मूठ मीठ जरूर टाका.
असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतात. अन्नधान्यात बरकत येते .उत्पन्नाच्या मार्गातील अडचणी दूर होतात म्हणून फरशी पुसण्याचा पाण्यात एक मुठभर मिठ जरूर टाकावे. पाण्यात मीठ टाकल्याने घरातील सूक्ष्मजीव नष्ट होतात व आजारपणे नष्ट होतात तसेच आपल्याला शक्य असेल तर तुरटीच्या पाण्याने ही आपण घर स्वच्छ करू शकतो त्यामुळे ही घरातील जीवजंतू व सूक्ष्मजीव नष्ट होतात व आजारपण पसरणार नाही.
घरात सुख समाधान व आनंद खूप चांगले येते म्हणून दररोज फरशी पुसावी परंतु गुरुवार च्या दिवशी फरशी अजिबात पूसू नये कारण की गुरुवार हा गुरु देवाचा वार असल्याने या गुरुदेवाला अजिबात हलके करू नये म्हणून गुरुवारच्या दिवशी फरशी पूसू नये. गुरुवारी साफसफाई करून आपले घर हलजे करू नये त्याचबरोबर गुरूवारच्या दिवशी घरातील जाळे सुद्धा काढू नये. असे केल्याने आपला गुरु ग्रह कमजोर होतो आणि आपल्या घरामध्ये वैभव येत नाही.
घरातील लादी पुसताना जर आपण त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ व हळद मिक्स करून लादी पुसली तर आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी स्थिर राहते. असे सुद्धा म्हटले जाते की जर गुरुवारी लादी पुसणे अत्यंत आवश्यक असेल तर अशा वेळी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्या पाण्याने आपल्या घरातील फरशी पुसा असे केल्याने आपला गुरु ग्रह चांगला राहतो आणि गुरु ग्रहाचे दोष सुद्धा आपल्याला लागत नाही. आता आपल्या लक्षात आले असेल की फरशी पुसताना आपल्याला कोणते नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून घरातील लादी म्हणजेच फरशी पुसताना चे नियम पाळणे अत्यावश्यक आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.