मागच्या जन्माच्या या खुणा ज्या या जन्मात पण आहेत तुमच्या सोबत, अश्या ओळखा या खुणा.!

मागच्या जन्माच्या या खुणा ज्या या जन्मात पण आहेत तुमच्या सोबत, अश्या ओळखा या खुणा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांना आपण गेल्या जन्मी कोण होतो. आपला जन्म कोणत्या योनीमध्ये होता त्याबद्दलची माहिती जाणून घेण्या बद्दल अनेकाना उत्सुकता असते आणि म्हणूनच अशा वेळी गेल्या जन्मातील काही गोष्टी जाण्यासाठी आपण इच्छुक असतो.आजच्या लेखामध्ये एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की मागील जन्मातील काही खुणा.

या खुणा आजही आपल्या बरोबर आहे आणि त्यावरून आपल्या लक्षात येते की आपल्या पुनर्जन्म झाला आहे. बहुतेक वेळा अशा काही खुणा, काही वागणे, हे असे वाटते की घरात इतर कोणाचे ही नसते त्यावरून हा प्रकार मागील जन्माची संबंधित आहे हे आपल्या लक्षात येते म्हणूनच आज आपण अश्याच काही महत्वाच्या गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत.

आपण अशा कोणत्या बाबींवरून जाणू शकतो आहे ते सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जन्म, डाग. एखादे बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरावर एखादी लालसर किंवा काळया रंगाचे डाग आपल्याला पाहायला मिळते आणि अशावेळी आपल्याला कळते की हे बाळ नेमके कोण होते? शरीरावर तीळ असते ,शरीरावरील या खुणा आपल्या मागील जन्मातील एखाद्या घटनेशी संबंधित आहे. मागच्या जन्मी मृत्यूच्या वेळी आपण जखमी झाला असाल,काही लागले असेल तर तेच या जन्मात आपल्याला जन्मखून म्हणून दिसून येते.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बोलण्यातील खुणा.जर एखाद्या व्यक्तीला पाण्याची, वाहत्या पाण्याचे, डोंगर, दरी उंच ठिकाण याची जर भीती वाटत असेल तर अशा वेळी या व्यक्तींचा मृत्यू गेल्या जन्मी कुठून तरी डोंगरावरून पडल्यामुळे ,पाण्यामध्ये पडल्यामुळे किंवा कोणीतरी टाकल्यामुळे घडलेला असतो आणि हीच भीती त्यांना या जन्मात सुद्धा वाटत असते आणि म्हणूनच अशा व्यक्तींना उंच टेकडी डोंगर दरी पाण्यामध्ये पाहिले तरी भीती वाटत असते. त्यांना या जन्मातही या सर्व गोष्टींची भीती वाटते आणि कितीतरी जन्मापर्यंत कायम राहते.

अनेकदा असे घडते की आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा आपण भेटतो आणि आपल्याला असे वाटते की त्या व्यक्तीला आपण कुठेतरी आधी पाहिलेले आहे किंवा भेटलेले आहे किंवा एखाद्या व्यक्तीला जेव्हा पाच-दहा मिनिटे तरी भेटतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपले विशिष्ट असे मत तयार होते. किंवा अनेकदा आपण त्या व्यक्तीबद्दल विशिष्ट मत तयार करतो, ती व्यक्ती चांगली आहे किंवा ती व्यक्ती वाईट आहे. भविष्यात या व्यक्तीच्या संगतीत आपण जर राहिलो तर आपल्याला नेमक्या काय गोष्टी भोगावे लागतील याची कल्पना आपण करत असतो आणि म्हणूनच अशा वेळी एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपण त्याच्याबद्दलचे विशिष्ट असे मत तयार करत असतो.

याचा अर्थ कि ती व्यक्ती गेल्या जन्मी आपल्या सोबत काही तरी संबंध निर्माण केलेली असते आणि म्हणूनच अशा वेळी भविष्यातील विचार न करता व भूतकाळातील विचार न करता वर्तमान काळातील आपले मन आपल्याला सांगते की ती व्यक्ती वाईट आहेत. त्या व्यक्तीच्या नादी लागायला नाही पाहिजे. अनेकदा आपले मन असे म्हणते पण त्या मागचे कारण काय आहे हे आपल्याला ठाऊक नसते याचा अर्थ की त्या व्यक्तीने गेल्या जन्मी आपल्या सोबत काहीतरी वाईट वागले असेल म्हणून अशावेळी आपल्या मनाचे ऐकणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे.

पुढील गोष्ट म्हणजे आपले नातेसंबंध अशा व्यक्तींशी जोडले जाते की ज्या व्यक्तींची आपले काहीच संबंध नसतो. अनेकदा आपल्या जीवनामध्ये अशा काही व्यक्ती प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे येतात की ज्यांचा आपल्यासोबत दूर दूर संबंध नसतो आणि अनेकदा अशा काही व्यक्ती आपल्या जोडीदार सुद्धा बनतात तेव्हा याचा अर्थ असा की गेल्या जन्मांमध्ये या व्यक्तींसोबत तुमचा काहीतरी संबंध असतो. जे या जन्मात आपल्याला त्यांच्यापर्यंत खेचून नेतात. पुढील गोष्ट म्हणजे कधीकधी आपल्याला काही घटना व प्रसंग आठवत असतात.

त्यांचा आपल्या जीवनाशी अजिबात संबंध नसतो. आपल्या जीवनात या घटना कधीतरी घेतलेल्या असतात या घटना काहीतरी घडलेल्या आहेत व घडणार असतील याच्या बद्दलची काही कल्पना आपल्याला जाणवू लागते. तर या काही महत्वाच्या घटना आपल्या गेल्या जन्मामध्ये घडून गेलेल्या असतात त्याच गोष्टी आपल्याला आठवत असतात.या जन्मात आपला त्याच्याशी काही संबंध नसतो पुढील गोष्ट म्हणजे कधीकधी असे काही वाटते की आपण एखाद्या अज्ञात ठिकाणी व स्थळी जात असतो तिथे गेल्यानंतर आपल्याला असे वाटते की आपण या ठिकाणी आधी आलेले आहोत व काही काळ थांबलेले आहोत आधी राहिलेलो आहोत परंतु प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी पहिल्यांदाच आलेलो असतो याचा अर्थ असा की गेल्या जन्मामध्ये आपला आणि त्या जागेचा काही तरी संबंध असतो.

अनेकदा असे आपल्या सोबत घडते की एखादी घटना वा एखादे स्थळ आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असते ते स्वप्न आपण पाहत असताना प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्याच्या बद्दल काही आठवत नसते किंवा काही संबंध सुद्धा नसतो अशा वेळी त्या काही घटना स्वप्नामध्ये घडलेल्या असतात त्याचा संपूर्णपणे संबंध गेल्या जन्मातील अनेक घटनांशी जोडला गेलेला असतो.

पुढील गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेक जण व्यक्ती अशा असतात की त्यांना भविष्यात घडणार्‍या घटनांबद्दल माहिती होत असते किंवा भविष्यात नेमकी काय घटना घडणार आहेत याचा अंदाज सुद्धा ते वर्तवित असतात. असे साधारण मकर व कुंभ राशी असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत घडत असते, त्या व्यक्तींना भविष्यात नेमके काय घडणार आहे हे आधीच कळत असते. या सर्व गोष्टी त्यांना आधीच्या जन्मात मुळे सगळे कळत असते तसेच आपल्या आजूबाजूला काही असे लहान मुले असतात की त्या कमी वयातच खूप सारे प्रतिभाशाली ज्ञान प्राप्त करत असतात.

खूप कमी काळामध्ये यश प्राप्त करतात याचा अर्थ की गेल्या जन्मी सुद्धा त्यांनी काहीतरी ज्ञान प्राप्त केलेले असते त्याची साधना या जन्मी त्यांना मिळत असते. अनेकदा आपल्या आजूबाजूला असे काही माणसे असतात ते आपले नेहमी वाईट चिंतत असतात आपल्या बद्दल वाईट चर्चा करत असतात त्या लोकांशी आपला कधी संबंध सुद्धा आलेला नसतो परंतु ही लोक आपल्या सोबत नेहमी वैराच्या व चुकीच्या भावनेने वागत असतात अशा वेळी सुद्धा आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात.

जर तुमच्या सुद्धा आजूबाजूला अशा प्रकारची काही व्यक्ती असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ही व्यक्ती कदाचित तुमच्या गेल्या जन्मातील काही व्यक्ती असू शकतील की ज्यामुळे त्यांचे तुम्ही काहीतरी घेतलेले असेल किंवा त्यांना काहीतरी देणे बाकी असेल आणि म्हणूनच अशा वेळी या जन्मात ते तुमची वाईट विचार करत असतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *