लाफिंग बुद्धा चे चमत्कारी फायदे; कुठे व कसा ठेवावा घरात, दुकानात किंवा ऑफिसात.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये भगवान कुबेराला धनाची देवता मानली जाते त्याच पद्धतीने चीनमध्ये सुख संपत्ती समृद्धी याकरिता लाफिंग बुद्धा याकडे पाहिले जाते. आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहिती आहे की, जर घरामध्ये लाफिंग बुद्धा ठेवला तर घरामध्ये पैशाची आवक वाढते आणि आपल्या घरांमध्ये पैशाची भरभराट होते परंतु लाफिंग बुद्ध घरामध्ये ठेवत असताना त्याची योग्य ती दिशा बघणे सुद्धा आवश्यक आहे कारण प्रत्येक दिशेची व्यवस्थानाचे आपले स्वतःचे असे एक महत्त्व असते.
प्रत्येक घरातील पूर्व दिशा हि सुख समाधान आणि भाग्याचे स्थान समजले जाते म्हणून घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढावा त्याचबरोबर घरातील सदस्यांमध्ये एकोपा वाढावा याकरिता लाफिंग बुद्धा घराच्या पूर्व दिशेला ठेवावा. फेंगशुईच्या नियमानुसार जर लाफिंग बुद्धा दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय या दिशेला ठेवला तर त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि धन व सुखाला आकर्षित करते.
खरंच पैशाची आवक वाढते त्याच बरोबर जर आपले गुप्त शत्रू तुम्हाला काही त्रास देत असतील तर ते सुद्धा थांबते. घर व ऑफिसमध्ये लाफिंग बुद्धा ठेवताना अशा पद्धतीने ठेवावा की तो लाफिंग बुद्धा आपल्या नजरेसमोर दिसावा.आपल्या नजरेच्या वर व खाली असू नये म्हणजे येता जाता त्यावर सहज आपली नजर जात राहते. घरात ठेवलेल्या लाफिंग बुद्धा ची नजर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असावी म्हणजे घराच्या आत जो कोणी व्यक्ती प्रवेश करेल त्या व्यक्ती ला सर्वप्रथम लाफिंग बुद्धा दिसायला हवा. लाफिंग बुद्धा कोणत्याही धातूचा नसावा तो सिरमीक चा असावा.
बुद्धाचा हसरा चेहरा सुखाचे व संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. चिनी मान्यतेनुसार लाफिंग बुद्धा बेडरूममध्ये ठेवू नये व त्याची पूजा सुद्धा करू नये. याचा शोभेची वस्तू म्हणून वापर करावा. लाफिंग बुद्धा चे वेगवेगळे प्रकार आहे. हसणारा लाफिंग बुद्धा ,कमरेवर हात ठेवलेला लाफिंग बुद्धा, दोन्ही हातामध्ये कमंडलू घेतलेला लाफिंग बुद्धा ,एका हातामध्ये चीनी फळ घेतलेला लाफिंग बुद्धा, कमंडलूमध्ये बसलेला लाफिंग बुद्धा इत्यादी प्रकार आहेत. या प्रकारानुसार आपल्याला फळ सुद्धा मिळत असते. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या बुद्धाचे कोणकोणते फळ आपल्याला मिळते.
हसणारा लाफिंग बुद्धा. हसणारा लाफिंग बुद्धा हे आनंदाचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. या बुद्धा ला आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर म्हणजेच अडीच ते तीन फूट उंचीवर ठेवावे. जणू बाहेर एखाद्या व्यक्ती आपल्या घरात आली तर तो लाफिंग बुद्धा आपले स्वागत करत आहे असे वाटावे. दोन्ही हात वर उंचावलेला बुद्धा. दोन्ही हात वर उंचावलेला बुद्धा ठेवण्यासाठी दोन व टीम फूट उंच असा लाकडी किंवा लोखंडी स्टूल चा वापर करावा,असे केल्याने लाभ होईल.
ज्या ऑफिसमध्ये नेहमी भांडण,वाद क्लेश,तंटा होतात, अशा ठिकाणी ही मूर्ती अजिबात ठेवू नये. शक्यतो बसलेली व हसणारी बुद्धाची मूर्ती जास्त लाभदायक ठरते. जर ही मूर्ती कोणाच्या घरामध्ये असेल तर ती लवकरात लवकर हटवावी यामुळे घरात भांडणे आणि वाटण्या सुद्धा होऊ शकतात. खांद्यावर गाठोडी घेतलेला बुद्धा. असा बुद्धा विकत घेताना एक लक्ष द्यावे की त्याची गाठोडे ही भरलेली असावी म्हणजेच त्याच्या गाठोडी तील सामान बाहेर पडलेले असावे.
अशा प्रकारचा बुद्ध आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणचे आर्थिक चक्र खूप वेगाने फिरतात म्हणून हा बुद्धा दुकानात व व्यवसायाच्या ठिकाणी जरूर ठेवावा. यामुळे ग्राहकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होते आणि आपल्या व्यवसायामध्ये व उत्पादनामध्ये यश मिळते. धातूचा लाफिंग बुद्धा. शक्यतो बुद्धाची मूर्ती ही विशिष्ट मातीची बनलेली असते. परंतु आणि अनेकदा आपल्याला लोखंडाचा धातूचा लाफिंग बुद्धा सुद्धा पाहायला मिळतो.
जे लोक खूप साधे भोळे आहेत त्यांचे निर्णय क्षमता कमकुवत आहे ,अशा व्यक्तींचा अनेक जण गैरवापर करत असतात अशा व्यक्तींनी आपल्या घरामध्ये धातूचा लाफिंग बुद्धा ठेवायला पाहिजे परंतु ही एकटीच होती ठेवायला हवी. त्याच्या बाजूला कोणतीच वस्तू ठेवू नका. खराब झालेला धूळ-माती साचलेला, खंडित झालेला ,कलर निघालेला असा कोणत्याही प्रकारचा लाफिंग बुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू नका. लाफिंग बुद्धा ची पूजा सुद्धा करू नका. धातूचा लाफिंग बुद्धा घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने आपल्या निर्णय क्षमतेत वाढ होते. ही होती लाफिंग बुद्धा बद्दल विशेष महत्त्वाची अशी माहिती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.