कशातील पाणी पिणे जास्त हितकारक आणि हानिकारण.? जाणून घ्या पाणी पिण्याची सर्वात योग्य पद्धत.!

कशातील पाणी पिणे जास्त हितकारक आणि हानिकारण.? जाणून घ्या पाणी पिण्याची सर्वात योग्य पद्धत.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  आपल्या सर्वांना माहीतच आहे की पाणी हे जीवन आहे.आपल्या शरीरासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.आपल्या शरीराचा 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे.आपल्या सर्वांना माहीत आहे पाणी हे जीवनातील आवश्यक गोष्ट आहे पण पाणी पिणे हे महत्त्वाचे जरी असले तरी पण अनेक जण पाणी पितात, काहीजण फ्रीजमधील पाणी पितात, काहीजण तांब्याच्या भांड्यातले पाणी पितात, काही स्टीलच्या भांड्यात तर काही काचेच्या भांड्यातून पाणी पितात.आजच्या या लेखात आपण कोणत्या प्रकारच्या भांडयात पाणी प्यायले पाहिजे.कोणते पाणी आपल्यासाठी फायदेशीर आहे.

कोणते पाणी आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. पाण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे की पाणी तुम्ही ज्या पदार्थांमध्ये टाकतात त्या पदार्थांमध्ये पाणी मिसळून जाते. पाण्याचे अनेक गुणधर्म आहेत त्यातील सर्वात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे मातीचे भांडे. आपण अनेकदा म्हणतो की पाणी पिणे गरजेचे व फायदेशीर आहे. पाणी आणि माती यांचा संबंध पहिल्यापासून येतो.

समुद्राचे, नदीचे पाणी असेल, विहीरी चे पाणी असेल, तलाव असेल प्रत्येक ठिकाणी पाण्याचा व मातीचा संबंध येत असतो. मातीतील पोषक तत्व हे पाण्यामध्ये मिक्स होत असतात. मातीमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडिअम आणि वेगवेगळे घटक अस. पोषक तत्व या पाण्यामध्ये मिक्स होत असतात आणि त्यामुळे मिसळणे हा पाण्याचा गुणधर्म आहे.

आपल्या शरीराला आवश्यक जेव्हा आपण मातीच्या माठामधून पाणी पितो तेव्हा या पाण्यामध्ये मातीमधील जे काही महत्वाचे खनिज पदार्थ असतात ते मिक्स होतात अशावेळी आपल्या शरीराला आवश्यक तत्त्व प्राप्त होत असतात तसेच एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या शरीराला गरजेचे असेल तेवढेच माठ पाण्याचे तापमान थंड करत असतो आणि म्हणूनच जर आपण माठातील पाणी सेवन केले तर आपल्या शरीराला कोणत्याच प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागत नाही कारण की माठातील पाणी आणि आपल्या शरीराचे तापमान एक समान असते.

आपल्यापैकी अनेक जण फ्रिजमधील थंड पाणी पीत असतात परंतु फ्रिजमधील थंड पाणी हे कृत्रिम रीत्या थंड केलेले असते आणि अशा वेळी या पाण्यामध्ये सुद्धा काही रासायनिक प्रक्रिया होत असतात. पाण्यातील उष्णता शोषून घेणे आणि पाण्याला थंड करणे ही दोन्ही गुणधर्म वेगवेगळे आहेत म्हणून आपण माठ नक्कीच वापरला पाहिजे पण माठ कोणत्या प्रतीच्या मातीचा बनवले आहेत तेही महत्वाचा आहे म्हणून चांगल्या प्रतीच्या मातीचा माठ बनवलेला असेल तर तो माठ आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे यासाठी आपण माठ योग्य पाहून विकत घेतला पाहिजे आणि त्यातील पाणी रोज बदलेही पाहिजे.

तांब्याच्या भांड्यातले पाणी सुद्धा खूप चांगले असते. इंग्रजीमध्ये तांब्याला कॉपर असे म्हणतात. आपल्या शरीरामध्ये तांबे हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते तसेच आपल्या शरीरासाठी मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर म्हणजे तांबे हे धातू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे धातू जर आपल्या शरीरामध्ये सर्व प्रमाणामध्ये प्राप्त झाली तर यामुळे आपल्याला फायदा मिळत असतो.

तांब्याच्या भांड्यातील पाणी आपण नियमितपणे सेवन केले तर आपल्या शरीराला आवश्यक तत्व प्राप्त होतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली बनते यामुळेच तांब्यामधील असणारी जे काही गुणधर्म आपल्या शरीराला प्राप्त होतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीरातील र”क्त निर्मितीसुद्धा व्यवस्थित रित्या होते व परिणामी हिमोग्लोबिनचे प्रमाण आपल्या शरीरात वाढते.

तांब्याच्या भांड्यामध्ये अशी काही गुणधर्म असतात जे पाण्यामध्ये लहानसहान छोटे-मोठे कीटक असतात व जंतू असतात ते नष्ट करून टाकतात आणि अशा वेळी जर आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी सेवन केले तर आपल्या शरीराला शुद्ध पाणी प्राप्त होते व शरीरामध्ये कोणत्याही बाह्य किटकांचा तुमचा अंतर्गत प्रवेश होत नाही म्हणून तांब्याच्या भांड्यातले पाणी पिणे सुद्धा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असते.

शरीराला आतून स्वच्छ करण्याचं काम आणि पचन संस्था ही व्यवस्थित करण्याचे काम सुद्धा तांब्याच्या भांड्यातले पाणी प्यायल्याने होत असते तसेच पचनसंस्था व्यवस्थित करणे आणि शरीराला आतून स्वच्छ करणे हे काम सुद्धा तांब्याच्या भांड्यातले पाणी प्यायल्याने होते. जर आपण रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायले तर आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते व त्याच बरोबर जास्त पाणी पाण्याच्या भांड्यांमध्ये असल्यामुळे पाण्याला तांब्याचे गुणधर्म प्राप्त होतात आणि आपल्या शरीरामध्ये जे काही नको असणारे घटक असतात ते पूर्णपणे बाहेर पडतात.

अशा पद्धतीने आपल्या शरीराची अंतर्गत स्वच्छता सुद्धा होते. आपल्यापैकी अनेक जण स्टील व काचेच्या ग्लासमध्ये पाणी पीत असतात त्याचे सुद्धा आपल्या शरीराला काही फायदे व तोटे असतात. जेव्हा आपण काचेच्या भांड्यामध्ये पाणी ठेवतो आणि हे पाणी सेवन करतो तेव्हा काचेतील कोणतेही गुणधर्म पाण्यामध्ये नीट मिक्स होत नाही आणि यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही आणि अशा प्रकारचे पाणी आपण दिवसभरात कधीही पिऊ शकतो तसेच स्टीलच्या भांड्यात पाणी सुद्धा आपण कधीही सेवन करू शकतो.

फक्त आपल्याला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपले जेवण झालेले आहे. जेवण झाल्यानंतर सुद्धा आपण तांब्यातील पाणी सेवन करायचे नाही अन्यथा आपल्याला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. आपल्यापैकी अनेक जण फ्रिजमध्ये पाणी थंड करायला ठेवत असतात. फ्रिजमध्ये पाणी थंड केल्याने आपल्या जीवाला बरे वाटते पण शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बहुतेक वेळा फ्रिजमध्ये पाणी थंड केल्याने किंवा बर्फ ते पाणी शोषून घेतो आणि अशावेळी बर्फ तयार होतो.

जेव्हा आपण थंड पाणी पितो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होत असते आणि ही उष्णता आपल्या शरीरासाठी घातक ठरते म्हणून सर्वसाधारण गार असलेले माठातले पाणी आपल्या शरीरासाठी फायदेशीरच ठरते अशावेळी आपल्याला आपल्या घरातील साधे माठातील पाणी पिणे उपयुक्त ठरते जर तुमच्या घरी सुद्धा माठ असेल तर अतिशय उत्तम जर माठ नसेल तर तुम्ही बाजारातून विकत आणा आणि त्यातील पाणी प्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *