कोणत्याही हनुमान मंदिरात ही गोष्ट चढवा…माता लक्ष्मी धावत येईल.. करोडो रुपयांचे कर्ज त्वरित माफ होईल.

कोणत्याही हनुमान मंदिरात ही गोष्ट चढवा…माता लक्ष्मी धावत येईल.. करोडो रुपयांचे कर्ज त्वरित माफ होईल.

नमस्कार मित्रांनो,

जय बजरंगबली.. मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहोत. असा कोणता व्यक्ती आहे जो आपल्या आयुष्यामध्ये धन कमवू इच्छित नाही? अस कोण आहे जो आपल्या आयुष्यात प्रसन्नता यावी असे वाटत नाही? असं कोण आहे जो प्रभू ची भक्ती करतो परंतु आपली मनोकामना पूर्ण करू इच्छित नाही?

हे आपण जाणतो की, बजरंग बली ही एक अशी देवता आहे जे साधारण उपाय केला तरी लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताची प्रत्येक प्रकारची मनोकामना पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला एक खास प्रकारची मनोकामना पूर्ण करण्याविषयी सांगणार आहोत.

आयुष्यात वाईट काळ येता व्यक्ती कर्जाच्या कचाट्यात सापडते आणि त्याचे पूर्ण जीवन अंधकारमय होऊन जाते. कर्ज घेणे वाईट गोष्ट नाही परंतु परिस्थितीच इतकी वाईट होते की लाखो प्रयत्न करून देखील कर्ज उतरत नाही.

आज आम्ही तुमच्यासाठी बजरंग बली यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने बजरंगबलीची कृपा प्राप्त होऊन करोडोंचे कर्ज देखील सहजरित्या फिटते.

बजरंग बली विघ्नहर्ता तर आहेतच परंतु काही कारणाने तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्या संकटात असाल तर त्यातून मार्ग काढण्यासाठी बजरंग बली तुमची साथ देतात. सुरुवातीला आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची आहे. त्यानंतर बजरंग बली यांची पूजा करायची आहे.

या उपायामध्ये तुम्हाला कोणत्याही हनुमान मंदिरामध्ये बस ही एक छोटीशी वस्तू चढवायची आहे. यामुळे व्यक्तीचे करोडोंचे कर्ज उतरतेच शिवाय ती व्यक्ती लवकर धनवान होते. या उपायासाठी तुम्ही तुमच्या घरातील गव्हाच्या पीठामध्ये मीठ न घालता गुळ, तीन लवंग घालून चुरमा बनवा.

यानंतर तुमच्या घराजवळील असलेले कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन या प्रसादाचा भोग चढवा. त्यानंतर तिथेच बसून एक वेळ हनुमान चालीसाचा पाठ करावा. त्यानंतर तुम्ही आणलेल्या प्रसादाचे जास्तीत जास्त लोकांमध्ये वाटप करा व स्वतः सुद्धा ग्रहण करा.

हा उपाय तुम्ही कधीही सुरू करू शकता. सलग 11 दिवस हा उपाय केल्याने तुमचे करोडोंचे कर्ज देखील माफ होईल. हा एक सिद्ध उपाय आहे. हा उपाय शक्य नसल्यास आम्ही तुम्हाला अजून एक उपाय सुचवू इच्छितो. हा उपाय केल्याने तुम्ही कर्जमुक्त तर होताच शिवाय तुम्ही कर्ज दाता व्हाल.

हा उपाय मात्र ब्रह्म मुहूर्तावर करावा लागतो. ब्रह्म मुहूर्तावर पिंपळाच्या झाडावर देवतांचा वास असतो. शनी देवाचा वास असतो. या उपायासाठी तुम्हाला पिंपळाची छोटी छोटी 11 पानं तोडावी लागणार आहे.(कापलेली वाळलेली अशी पाने घेऊ नयेत.) सिंदूर मध्ये पाणी मिसळून 10 पानांवर ‘श्री राम’ लिहावे. आणि अकराव्या पानावरती तुमची मनोकामना लिहावी.

मनोकामना मोठी असल्यास एका कागदावर लाल पेनाने लिहून तो कागद पानावर टेपने चिटकवा. मनोकामना लिहिलेले पान दुमडून राम नाम लिहिलेले पाच पाने वर आणि पाच पाने खाली असे ठेवावे. आणि त्याला एका धाग्याने बांधा. आणि जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरामध्ये जा व लाल रंगाचे लाडू किंवा जिलबी अशी मिठाई सोबत न्या.

हि अकरा पाने बजरंगबली यांच्या चरणी अर्पण करा. पण तिथे बसून हनुमानजींचा पाठ करावा. त्या प्रसादाचा वाटप आपल्या परिवारातील सगळ्यांना करावा. हा उपाय आठवड्यातून एकदा असे सात आठवडे करायचा आहे.

अस करून तुम्ही कर्जमुक्त होऊन धनवान व्हाल. सोबतच घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर्य नांदेल. कोणतीच समस्या भेडसावणार नाही. वरील दोन्ही उपाय करणे तुम्हाला शक्य नसल्यास हा उपाय करा. हा उपाय अत्यंत सरळ आहे. या उपायात तुम्हाला गोड पान बनवायचे आहे. त्यात लवंग असावी.

कोणताही नशेचा पदार्थ त्यात असू नये. असे सात पान बनवा. हा उपाय शनिवारी अथवा मंगळवारी सायंकाळच्या वेळी करावा. हे सात पान हनुमान मंदिरात जाऊन हातात धरून बजरंग बली यांना आपल्या कोणत्याही समस्येबद्दल बोलून या समस्या पान रुपी तुम्हाला अर्पण करत आहेत अस म्हणावे.

याचे निराकरण करा. यातून मुक्ती द्या असे म्हणून ते अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घाला. व तिथे बसून एक वेळ पाठ करा व आपल्या घरी निघून या. घरी येताना लक्षात ठेवावे अर्पण केलेल्या पैकी कोणतही पान घरी परत आणू नये.

असं म्हणतात प्रसाद रूपी कोणत्याही प्रकारचे चढवलेले पान परत आणल्यास तुमच्या समस्या कधीही संपत नाहीत.बजरंग बली तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करो.. शुभं भवतु ||

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *