केस मनसोक्त वाढतील, गळणार, तुटणार नाही.. कोंडा येईल बाहेर, फक्त करा हा एक उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक महिलेला किंवा पुरुषाला आपले केस सुंदर काळेभोर दिसायला हवे असे वाटत असते. केस आपल्या सौंदर्याचा एक अविभाज्य घटक आहे. जर तुमचे केस सुंदर दिसायला असतील तर तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये चार चाँद लागत असतात. सगळेजण तुमच्याकडे आकर्षित होत असतात परंतु जर तुमचे केस नेहमी गळत असतील, केस अकाली पांढरे झाले असतील, डोक्यावर टक्कल पडले असेल तर अशा वेळी अनेक जण तुमची मस्करी करत असतात. चारचौघांमध्ये तुम्ही अनेकदा चर्चेचा विषय बनलेला असतात.
सध्याच्या पिढीला म्हणजेच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये केसांच्या अनेक समस्या त्रास देत असतात.या समस्या दूर करण्यासाठी बहुतेक वेळा आपण बाजारात उपलब्ध असणारे प्रोडक्ट व रासायनिक शाम्पू यांचा वापर करतो, यामुळे आपल्या केसांचे आरोग्य सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस केसांचे आरोग्य बिघडत जाते आणि म्हणूनच जर तुम्ही सुद्धा वारंवार केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, केसांमध्ये इन्फेक्शन होणे यासारख्या समस्या मुळे चिंतित झाला असेल तर अजिबात काळजी करू नका. या उपायाने तुमच्या सगळ्या चिंता दूर होणार आहेत, चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल..
आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आज आपण जो उपाय करणार आहोत, तो अत्यंत साधा सोपा परंतु तितकाच प्रभावी आहे. हा उपाय केल्याने आपल्या केसांच्या समस्या काही दिवसांमध्येच दूर होणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कडीपत्ता लागणार आहे. कडीपत्ता असे अनेक औषधी गुणधर्म व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे तसेच या पानांमध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या केसांच्या मुळाशी जर कोणत्याही प्रकारचे विषारी घटक जमा झाले असतील तर ते निघून जाणार आहे.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घ्यायची आहेत. ही पाने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे.जर यावर कोणत्याही प्रकारची धूळ असेल तर ती निघून जाईल आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने ही सगळी पाने आपल्याला पुसून घ्यायचे आहेत आता आपल्याला एका कढईमध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहे. मोहरीचे तेल हे उष्ण गुणधर्म प्रदान करणारी असतात आणि म्हणूनच आपल्या शरीराच्या मुळांना उष्णता देण्याचे कार्य यामुळे होते.
जर तुमच्या केसांच्या मुळांना काही त्रास झाला असेल तर या तेलामुळे त्यांना पोषक तत्व प्राप्त होते त्यानंतर आपल्याला कडुलिंबाचे तेल दोन चमचे लागणार आहे. कडुनिंबाच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जर तुमच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोंडा झाला असेल ,कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते दूर करण्याची शक्ती कडू लिंबाच्या पानात मध्ये असते त्याचबरोबर यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात.
जे केसांच्या सर्व समस्या दूर करतात, आता आपल्याला या कढईमध्ये कडीपत्त्याची पाने टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित रित्या गरम करायचे आहे, जोपर्यंत पानांचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. कडीपत्त्याच्या पानांचा रंग पूर्णपणे बदलल्यावर आणि या तेलामध्ये पानांचा अर्क संपूर्ण उतरल्यावरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे व त्यानंतर गाळणी च्या सहाय्याने हे तेल आपल्याला एका बॉटलमध्ये भरायचे आहे.
हे तेल तुम्ही कधीही तुमच्या केसांना लावू शकता, शक्यतो हा उपाय रात्री केला तर तुमच्या केसांना जास्त फरक जाणवू लागेल. सकाळी उठल्यावर तुम्ही कोणत्याही शाम्पूने किंवा नाही आपले केस धुऊ शकतात अशा प्रकारे जर आपण हा उपाय सातत्याने महिनाभर जरी केला तरी तुमच्या केसांची निगडित असलेल्या सगळ्या समस्या लवकरच दूर होतील. तुमचेवकेस वाढू लागतील, अकाली झालेले पांढरेपणा, केस गळतीची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.