या गोष्टींची वेळेवर काळजी घेतली नाही तर होऊ शकते तुमची किडनी फेल.!

या गोष्टींची वेळेवर काळजी घेतली नाही तर होऊ शकते तुमची किडनी फेल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. किडनी फेल होण्याचा धोका नक्की कोणाला असतो? मधुमेह,उच्च रक्तदाब त्रास असणाऱ्या लोकांमध्ये किडनी फेल होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये ठेवणं सर्वाधिक गरजेचं असतं. त्याशिवाय मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

रासायनिक खते आणि कीटक नाषकयुक्त आहारामुळे किडनीवर घातक परिणाम होतो. मध्यपान,धूम्रपान कारण्यांनाही किडनी फेल होण्याचा धोका अधिक असतो. तसेच वेदनाशामक औषंधाचा जास्त वापर केल्यामुळे सुद्धा किडनी फेल होऊ शकते. हे जरा आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. तर मित्रांनो किडनी फेल होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भरपूर पाणी प्यावे, दिवसातून कमीतकमी आठ ग्लास पाणी माणसाने पियाल पाहिजे. लघवीला झाल्यास लगेच लघवीला जावं. लघवीला होऊनही लघवी थांबवून ठेवल्यास मूत्राशय,किडनीवर प्रचंड ताण येतो आणि याचा वाईट परिणाम किडनीच्या कार्यावर होतो. किडनीचा आजार टाळण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी वर्षातून एकदा किडनी चेक करून घेणं खूप गरजेचं आहे.

पौष्टिक अन्नपदार्थाचं सेवन करा. कुटलीची आमटी आहारात घ्यावी आणि शहाळं च पाणी प्यावं. आहारातील मिठाचं प्रमाण कमी करा, दररोज ४ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाऊ नका. आहारातील मिठावर लक्ष ठेवायचं शिवाय वेफर्स,स्नॅक्स,बिस्किटे,वडापाव यातील मिठावर व सोडियमवर लक्ष सुद्धा ठेवा. सेंद्रिय शेतातून पिकलेला भाजीपाला खाण्यास प्राधान्य द्या.

कोबी,फ्लॉवर खाणे टाळा. फळे,भाजीपाला स्वच्छ धुवूनच खावेत कारण यावर भरपूर प्रमाणात कीटकनाशके फवारतात. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ज्या अंगदुखीच्या गोळ्या असतात त्या घेणं टाळा. तसेच हेल्थ चेकअप वेळच्या वेळी करून घ्या आणि किडनीची तपासणी लवकरात लवकर करून घ्या.

मित्रांनो आपली जर किडनी फेल होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर वरील दिलेली जी माहिती आहे ती आपल्या खूप फायद्याची आहे, तर त्या तुम्हीही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर नक्की करा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *