करीना कपूरचा मोठा खुलासा, लोकांनी सैफसोबत लग्न करण्यापूर्वी दिली हि चेतावणी..

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खानची जोडी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानली जाते. एकेकाळी शाहिद कपूरबरोबर करीना कपूरचे नाव जोडले गेले होते. पण लवकरच दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आणि करीनाला सेफ अली खान वर प्रेम झाले. बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर करिनाने सैफशी लग्न केले आणि आज दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत.

सोशल मीडियावर एक मुलाखत व्हायरल होत आहे ज्यात करीना कपूर एक मोठा खुलासा करताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी करीना करण जोहरच्या चॅट शोमध्ये गेली होती जिथे तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल अनेक मोठे खुलासे केले. दरम्यान, करीना कपूरने खुलासा केला होता की सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी बर्‍याच लोकांनी त्याच्यासोबत लग्न न करण्याचा आग्रह केला होता आणि अनेक प्रकारचे इशारे दिले होते.

news18.com
सैफ आधीच विवाहित असून त्याला दोन मुले आहेत असे काही लोक म्हणाले होते. करिनाच्या म्हणण्यानुसार, लोकं आपल्या प्रेमाबद्दल बरेच काही बोलू लागले आहेत याचा तिला आनंद आहे. जेव्हा मी सैफशी लग्न करणार होते तेव्हा प्रत्येकजण माझ्याशी तशीच वागणूक देत होता की तू सैफशी लग्न करू नकोस कारण त्याचे आधीच लग्न झाले आहे आणि त्याला दोन मुले आहेत.

तू  सैफसोबत लग्न करण्याचा खरोखर निश्चय केला आहे का असा सवालही काही लोकांनी केला होता. काही म्हणायचे की त्याच्यासोबत  लग्न केल्यांनतर तुझे करिअर संपेल. या गोष्टींमुळे मला वाटू लागले कि प्रेम करणं खरंच गुन्हा आहे का.? लग्न करणे किती मोठा गुन्हा आहे? म्हणून मी विचार केला एकदा करून पाहूया आणि बघूया नंतर काय होतं, अश्या प्रकारचा खुलासा करिनाने केला. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *