कंबरदुखी दूर करतील ‘हे’ रामबाण घरगुती उपाय!
नमस्कार मित्रांनो,
कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे, व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे यांसारख्या गोष्टींमुळे अगदी तरुण वर्गात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.
एकाच जागी खूप वेळ बसून काम करणे सुद्धा याला कारणीभूत आहे. सुरुवातीला या वेदना अतिशय कमी असतात आणि त्यामुळे आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. पण जस जसा काळ लोटतो आणि आपण यावर काहीच उपाय करत नाही तेव्हा या वेदना अतिशय वाढतात.
इतक्या वाढतात की त्या कधीही त्रास देऊ शकतात. अशावेळी मग वैद्यकीय सल्ला घेण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामध्ये खर्च सुद्धा खूप येतो. म्हणून आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत वेळीच कंबरेच्या वेदनेवर कोणते घरगुती उपचार तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्ही या आजारातून लवकर सुटका मिळवू शकाल!
कंबरदुखीची मुख्य कारणे : कंबरदुखीची काही मुख्य कारणे आपण पाहून घेऊया. जर हे करणे तुम्ही थांबवले तर त्याचा सुद्धा फायदा दिसू शकतो, अतिशय मऊ गादीवर झोपणे, जास्त काळ हाई हिल परिधान करणे, जास्त वजन वाढणे, शरीरात कॅल्शियमची कमतरता भासणे,
तासनतास एकाच जागेवर बसणे, शारीरिक हालचाल जास्त न करणे, व्यायाम करायला टाळाटाळ करणे, योग्य स्थितीमध्ये बसणे, यांसारख्या काही गोष्टी मुख्यत: कंबरदुखीला कारणीभूत असतात. त्यामुळे उपचारासोबत या गोष्टी करणे सुद्धा थांबवावे.
कंबरदुखीवर घरगुती उपचार : एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या. यात लसूणाच्या सोललेल्या ५ ते ६ पाकळ्या टाकून भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कंबरेसोबत पूर्ण शरीराची मालिश करून घ्यावी आणि मग अंघोळ करावी.
लसूण हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला वेदनेपासून लवकर आराम मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की मालीश करण्याआधी किमान 30 मिनिटांनीच अंघोळ करावी. जेणेकरून या वेळेत तुमचे शरीर हे मिश्रण शोषून घेईल.
कपड्याने द्या शेक : जेव्हा कंबर खूप दुखत असेल आणि कोणी मसाज करणारा सुद्धा नसेल तेव्हा गरम पाण्यात मीठ मिसळा आणि त्यात एक स्वच्छ कपडा टाकून भिजवा आणि मग तो कपडा पिळून त्यातून निघणाऱ्या वाफेने कंबरेला शेक द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या अंगावर प्युअर कॉटनचे कपडे असतील. सोबत या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या की शेक कधीच थेट त्वचेवर देत नाही तुमच्या त्वचेवर कॉटन कपड्याचा एक थर असावा.
कामातून ब्रेक घ्या : जर तुम्ही तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कामातून तुम्ही दर तासाने एक ब्रेक घ्या आणि 5-10 मिनिटे फेरी मारा. तुमच्या शरीराची हालचाल ठराविक काही काळाने व्हायला हवी. असे केल्यास कंबरेवर दाब पडत नाही आणि कंबरेला आराम मिळत राहतो.
तुम्ही घरी असाल की ऑफिसला ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका. ही गोष्ट तुम्ही करत नसाल तर कंबरदुखीचा त्रास तुम्हाला विळखा नक्कीच घालणार. त्यापासुन स्वत:चा बचाव करायचा असेल तर आवर्जून कामातून ब्रेक घेत राहा.
कॅल्शियम डायट : स्त्रियांच्या शरीरात वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर आणि पुरुषांच्या शरीरात वयाची 45 वर्षे ओलांडल्यानंतर कॅल्शियमची कमतरता भासू लागते. म्हणून गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या शरीरात शक्य तितका कॅल्शियमचा वापर करावा.
कॅल्शियम तुमची कंबरदुखी दूर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, पण हेच कॅल्शियम जर कमी झाले तर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास सुद्धा सहन करावा लागेल. म्हणून शक्य तितका कॅल्शियम युक्त आहार घ्यावा.
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.