तुमच्या घरासमोर असेल हे झाड तर तुमचं कुणीही वाईट करू शकणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वास्तुशास्त्र मध्ये तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये अनेक अशा काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या गेलेल्या आहेत जेणेकरून त्या वस्तूंचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत असतो आणि आपल्या जीवनात ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेर पडण्यासाठी मदत होत असते म्हणूनच या शास्त्रांचा अनेक काळापासून उपयोग करून अनेक जण आपले जीवन समाधानाने व्यतीत करत आहे म्हणूनच आपले जीवन सुख शांती वैभव अनुषंगाने जगण्यासाठी आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, त्याबद्दल यामध्ये आपण एका अशा झाडा बद्दल जाणून घेणार आहोत.
ते झाड आपल्या घरासमोर असेल तर आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य हे झाड करत असते त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा मदत करत असते. ज्या घरामध्ये व घरासमोर हे झाड असते त्या घरातील लोकांना त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचे कष्ट सहन करावे लागत नाही त्यांच्या जीवनामध्ये नेहमी आनंदी आनंद निर्माण होत असतो.
या महत्त्वपूर्ण अशा झाडाचे नाव आहे बेलाचे झाड. बेलाचं झाड हे प्रामुख्याने शिवशंभो यांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे आणि हे झाड महादेवांना अतिशय प्रिय आहे. या झाडाला महादेवांचा कृपाशिर्वाद प्राप्त झालेला आहे. शिव शंभू महादेवाला प्रसन्न करण्यासाठी वेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपल्या जीवनामध्ये कितीही मोठ्या संकटी असू द्या अडचणी असू द्या त्या अडचणी संकटांना दूर पळवण्यासाठी बेल अत्यंत उपयोगी मानले जाते.
आपण दैनंदिन जीवनामध्ये शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलाचा उपयोग करू शकतो. बेलपत्र हे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपण पुजे मध्ये त्याचा वापर करू शकतो पण त्याच बरोबर अष्टमी, अमावश्या यासारख्या तिथीला बेलपत्र तोडले जात नाही ते अशुभ मानले जाते. बेल पत्रांवर दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या जीवनातील आणि दुःख नष्ट होण्यासाठी मदत होत असते.
जर आपल्याला पैशासंदर्भात अडचणी असतील तर आणि अशा वेळी आपण बेल पूजन केले तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. जर आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या अंगणासमोर बेलाचे झाड अवश्य लावा. ज्या अंगणासमोर बेलाचे झाड असते त्या घरावर शिवशंभु यांचा आशीर्वाद असतो आणि असे क्षेत्र काशी समान मानले जाते.
हे अनेक पुराणांमध्ये सांगण्यात आलेले आहे. कोणतीही काळी विद्या तंत्र मंत्र वाईट शक्तींपासून संरक्षण करण्याचे कार्य हे बेलाचे झाड करत असते. बेलाची झाड हे आपण वर्षभरातून कोणत्याही दिवशी आपला अंगणासमोर लावू शकतो घराची वायव्य दिशा हे वास्तुशास्त्रानुसार बेलाचे झाड लावण्यासाठी उपयुक्त मानले गेलेले आहेत. जर घराच्या सदस्यांमधील प्रेम वाढत नसेल , वैरभावना कटकट निर्माण होत असेल तर अशा वेळी आपल्या अंगणासमोर बेलाचे झाड अवश्य लावा. बेलाचे झाड लावल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम आदर सन्मान वाढू लागेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.