या ६ गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर लवकर तुमच्यामागची साडेसाती नाहीशी होईल..!

या ६ गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर लवकर तुमच्यामागची साडेसाती नाहीशी होईल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो ज्या मनुष्याजवळ या ६ गोष्टी असतील तो अत्यंत सुखी आयुष्य जगतो. त्याच्यामागील सर्व साडेसाती निघून जाते. तर आज आम्ही तुम्हाला अशा ६ गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्याजवळ असतील तर तुम्ही सुखी व समाधानी होऊ शकता.

१. कोणावरही अवलंबून राहू नये:- मित्रांनो जो व्यक्ती स्वतःचे आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वतः पैसा कमावण्यास सक्षम असेल तोच सुखी आयुष्य जगतो. अनेक लोक स्वताचे आयुष्य जगण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात. अशा लोकांना स्वाभिमान नसतो आणि इतरांच्या नजरेत त्यांना मानसन्मानही नसतो. यामुळे स्वतः कष्ट करून आयुष्य जगावे.

२. चांगल्या लोकांची संगत:- मित्रांनो जो व्यक्ती चांगल्या व विद्वान लोकांच्या संगतीत राहतो त्यांच्या सोबत वेळ व्यतीत करतो त्याला सुखी मानले जाते. वाईट लोकांच्या संगतीचा परिणाम वाईटच होतो. जे लोक दृष्ट व हिंसक लोकांच्या संगतीत राहतात त्यांना भविष्यात विविध लोकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नेहमी चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये राहावे.

३. भयमुक्त जगणे:- ज्या व्यक्तीचे स्वतःपेक्षा ताकदवान व्यक्तीशी वैर असते तो प्रत्येक क्षणाला शत्रूच्या विचारात असतो. ताकदवान शत्रू त्याला व त्याच्या कुटुंबाला नुकसान पोहोचवू शकतो. एखादा भीतीखाली जगणारा मनुष्य कधीच पूर्ण आयुष्य जगू शकत नाही. त्यामुळे जो व्यक्ती भयमुक्त जगतो त्यालाच सर्वात सुखी मानले गेले आहे.

४. कर्ज घेऊ नये:- मनुष्याने स्वतःचा उत्पन्न असेल तेवढ्याच इच्छा ठेवाव्या. अनेक लोक मनावर नियंत्रण ठेवत नाहीत, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांकडून कर्ज घेतात, इतरांकडून कर्ज घेऊन प्राप्त केलेल्या सुविधा कधीच सुख देत नाहीत. अनेकवेळा लोकांनी घेतलेले कर्ज वेळेवर फेडत नाहीत. यामुळे स्वतासोबतच कुटुंबाला अडचणीत आणतात. म्हणून जो मनुष्य कर्जापासून दूर राहतो तोच नेहमी सुखी राहतो.

५. निरोगी व स्वस्थ शरीर:- जीवनात सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित काही खाऊ पिऊ शकत नाही. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जीवनातील अनेक सुखांपासून वंचित राहू शकता.

जर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्याने कोणताही त्रास सहन करावा लागतो. आजार मोठा असेल तर दवाखाना, औषध इत्यादी गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम असतो. गरज पडल्यास तो शारीरिक श्रम करू शकतो. याउलट रोगी व्यक्ती हे करू शकत नाहीत. यामुळे शरीर निरोगी असणे आवश्यक आहे.

६. स्वतःच्या देशात राहणे:- मित्रांनो अनेक लोक काही कारणामुळे स्वतःचा देश सोडून इतर देशात वास्तव्य करतात. असे करण्यामागे कोणतेही कारण असो परंतु आपल्या देशात राहण्याचे जे सुख आहे ते इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही. जो मनुष्य आपले पूर्ण आयुष्य आपल्या लोकांमध्ये व आपल्या देशामध्ये व्यतीत करतो तो सर्वात सुखी असतो.

तर मित्रांनो या ६ गोष्टी आपल्याला लक्षात असायला हव्यात. या ६ गोष्टी ज्या मनुष्याकडे असतील तो आयुष्यातील सर्वात सुखी व्यक्ती असेल व त्याच्यामागील सर्व साडेसाती निघून जातील.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *