घराच्या पश्चिम दिशेला जर असेल हे झाड तर घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.!

घराच्या पश्चिम दिशेला जर असेल हे झाड तर घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि समाधान हवे असल्याने त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा. पैसा कमविणे तर महत्त्वाचे असते पण त्याचबरोबर कमवलेला पैसा साठवून ठेवणे हे सुद्धा तेवढेच कठीण असते. अनेकदा आपण खूप सारी मेहनत करतो आपण पण परंतु पैसा हा वायफळ खर्च मध्ये जात असतो त्यामुळे आपल्या मनाची चिडचिड होते.

मेहनतिने पैसे कमवतो आणि जर हे पैसे आपल्या घरातील व्यक्तींच्या आजारपणात किंवा अनावश्यक गोष्टी जर खर्च होत असेल तर आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य आणि गरिबी राहिली तर असा आजारपणावर पैसा खर्च होऊ नये आणि आपल्या घरात पैसा टिकून राहावा यासाठी आपण आज एक उपाय जाणून घेणार आहोत. शात्रांमध्ये मध्ये अशी काही झाडे सांगितली गेली आहेत की जी आपल्यासाठी लाभदायक ठरतात आणि ही झाडे आपण आपल्या घराच्या आजूबाजूला लावली तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या जीवनावर झालेला दिसून येतो.

आपले जीवन बदलून जाते म्हणजे तुळस, वटवृक्ष आणि पिंपळ. पिंपळाच्या झाडाला अध्यात्म शास्त्रांमध्ये मध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. पिंपळाच्या झाडा मध्ये साक्षात भगवान विष्णू विराजमान असतात.श्री विष्णू यांचा निवास असलेल्या पिंपळाच्या झाडाचा आज आपण एक उपाय जानणार आहोत. तुमच्या घरा मध्ये वास्तुदोष असेल आणि जर एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामध्ये वारंवार पैसा खर्च होत असेल तर अशावेळी हा उपाय केल्याने त्या परिस्थितीमध्ये बदल जाणवतो यासाठी आपल्याला दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल चढवायचे आहे.

एका तांब्यात पाणी घेऊन ते पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या पिंपळाच्या झाडाला 5 ,7 ,11 ,शक्य होईल तेवढा प्रदक्षणा घालायचे आहे .या प्रदिक्षणा घालताना आपल्याला श्री विष्णु देव यांचा एक मंत्रजप सुद्धा करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे.

असे केल्याने तुमच्या घरातील जी व्यक्ती आजारी आहे ती लवकर बरी होईल व त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जो वास्तुदोष निर्माण झालेला आहे तो सुद्धा दूर होऊन जाईल. तुमच्या कुंडली मध्ये म्हणजे काही ग्रह दोष असतील तर ते देखील दोष दूर होतील. जर आपल्या घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाचे झाड असेल तर हे आपल्यासाठी एक खूप मोठं वरदान असणार आहे.

पिंपळाच्या झाडा मधून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करणार आहे आणि आपल्याला जीवनी शक्ती प्रदान करतात यामुळे आपले मन उत्साही राहते.आपले कामामध्ये मन लागते आणि सदैव आनंदी रहाण्यास मदत होते जर तुम्हाला शक्य झाल्यास आपल्या घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाचे झाड अवश्य लावा. त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे मी तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला निलगिरीचे झाड असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते कारण की निलगिरीचे झाड हे आपले जीवन शक्ती शोषून घेते.

म्हणून जर आपण पाहिले असेल तर निलगिरीच्या झाडावर कोणतेच पक्षी आपले घरटे बनवत नाही. नीलगिरी चा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जात नाही. निलगिरी ही उंच उंच वाढत जाते त्याचा फारसा काही उपयोग होत नाही म्हणूनच पश्चिम दिशेला निलगिरीचे झाड असल्यास ते अशुभ मानले जाते आणि आपल्या घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाचे झाड असेल तर ते शुभ मानले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *