हेडफोन लावून गाणी ऐकण्याचे दुष्परिणाम जाणून तुम्हालाही धक्का बसेल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरेचसे लोक आहेत जे हेडफोन लावून गाणी ऐकतात. परंतु जसे आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला जसे फायदे दिलेले आहेत तशाप्रकारे वाईट गोष्टी सुद्धा दिलेल्या आहेत. मोबाईल वर किंवा आयपॉड वर गाणी ऐकण्याचे प्रमाण हल्ली खूप प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर कुठेतरी जायला बाहेर पडलो तर आपल्याला दिसते कि कोणीतरी हेडफोन लावून गाणी ऐकत आहे. बस स्टॉप, रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे मध्ये असे कुठेही ज्याला जिथे वेळ मिळेल तिथे तो गाणी ऐकतो.
याचा फटका आता तरुणांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. कारण मोबाईल किंवा आयपॉडवर गाणी ऐकणाऱ्या तरुणांची श्रवण शक्ती आहे ती धोक्यात आली आहे. जगातील १ अब्ज तरुण-तरुणींच्या श्रवण शक्तीला कानाला हेडफोन लावून जोरजोरात संगीत ऐकण्याचा किंवा गाणं ऐकण्याचा परिणाम झाला असल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या पाहणीमध्ये श्रीमंत देशामधील सर्वसाधारपणे २५ वयोगटातील तरुण-तरुणींच्या श्रवण शक्तीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आणि जागतिक आरोग्य संघटनेने कानाच्या अत्यंत जवळून कर्णपटलांवर जोरजोरात आदळणाऱ्या संगीत लहरींनी बहिरेपणा येतो अशाप्रकारे स्पष्ट केलेलं आहे.
बहिरेपणाचा सामना मोबाईल फोन किंवा अन्य उपकरणांचा वापर संगीत ऐकणाऱ्या ६० टक्के लोकांना करावा लागतो. तर सुमारे ४० टक्के लोकांना नाईट क्लब संगीताचे कार्यक्रम ऐकल्याने बहिरेपणा येतो. जागतिक आरोग्य संघटनेचे शेली चड्डा याबाबत बोलताना म्हणाले कि जोरदार आवजच संगीत ऐकायला तरुण-तरुणींना आवडत असतं. त्यांच्या श्रवण शक्तीवर हे ध्वनी परिणाम करत असते. आणि त्यामुळे त्यांना श्रवण शक्ती गमवावी लागते.
उझेला नावाचे वाद्य साऊथ आफ्रिकेमध्ये २०१० मध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या वेळीस स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यास वापरण्यात आले होते. ९ सेकंद हे वाद्य वाजल्यास सुमारे १२० डेसिमल चा आवाज निर्माण होत होता. श्रवण शक्तीवर या वाद्याचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. हो गोष्ट आता आपण टाळू शकत नाही.
तरुण-तरुणींनी आता लक्षात घेणं खूप आवश्यक आहे कि एकदा गेलेली श्रवण शक्ती पुन्हा येत नाही. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणानेही बहिरेपण येऊ शकते. ८५ डेसिमल पर्यंत हे प्रदूषण पोचले आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्नशील राहणे खूप महत्वाचे आहे.
इअरप्लग सारखे उपकरण आपल्याला वापरायचे असेल तर आवाज मर्यादित ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणून सुदंर कान जे आपल्याला दिलेले आहेत ते ऐकण्यासाठी तसेच्या तसे राहावे आणि आपल्याला अमर्याद काळापर्यंत चांगलं ऐकता यावं यासाठी आपल्याला काही गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे.
म्हणून हेडफोन जरा जपून वापरा, आवाज कमी असायला पाहिजे, जोरात आवाज करून ऐकलंत तर आपल्याला बहिरेपण येऊ शकते. या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर आपल्या जिवलग मित्रमैत्रिणींना अन नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.