हात पायांच्या भेगा लपविण्यापेक्षा करा हा अद्भुत उपाय; ७ दिवसांतच नाहीश्या होतील पायांच्या भेगा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांना उष्णतेमुळे पायाला भेगा पडतात त्यामुळे पायाची आग होने , पाय जड पडणे अशा अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. बऱ्याच जणांना सतत प्रवास करावा लागतो अशावेळी पाय दुखण्याचा त्रास होतो,पायाच्या टाचांना भेगा पडतात, पायाच्या टाचा नाजुक असल्याने त्यातून रक्त सुद्धा बाहेर पडत असते.
अनेकदा भेगाचे घर्षण होऊन, वातावरणाचा, धुळीचा परिणाम होऊन कधी कधी पायांना भेगा पडू त्यातून रक्त निघू लागते तसेच पायांच्या भेगांची नीट काळजी घेतली गेली नसेल तर हि भेगा पडण्याची व पाय फुटण्याची समस्या तीव्रतेने जाणवायला लागते. याचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो म्हणूनच पडलेल्या भेगा मुळे जमिनीवर पाय सुद्धा ठेवता येत नाही अशा वेळी हा उपाय केल्या मुळे पायांच्या भेगा नाहीशा होतील.
त्या दिसणार सुद्धा नाहीत त्यामुळे हा उपाय कसा करायचा आहे.? त्यासाठी कोणकोणते पदार्थ लागणार आहेत.याचा वापर कधी आणि कसा करायचा हे या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या उपायांसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे ते एरंड तेल. क्लस्टर ऑइल या नावाने सुद्धा तेलाला ओळखले जाते. या तेला मध्ये खूप पोषक तत्व असतात तसेच या तेलामुळे अँटी सेप्टिक गुण असल्याने पायांच्या वेदना कमी करायला मदत होते.
हे तेल उत्तम मॉइस्चर रायझर आहे. हाडांची खालच्या दिशेने होणारी वाढ आहे ती सुद्धा थांबली जाते त्यामुळे होणारी तीव्र वेदना सुद्धा थांबत असतात. .या एरंड तेलाचा वापर करायचा आहे. या तेलामुळे पाय सॉफ्ट होतात. एक चमचा हे तेल वापरायचा आहे याच्या नंतर तर एक चमचा लिंबाचा रस ॲड करायचा आहे यातील असिडीक प्रॉपर्टीज यामुळे पायाचा कोरडेपणा घालवतात, पायांच्या भेगा तयार झालेल्या त्वचेवर ओलावा निर्माण करतात.
या रसामध्ये अँटी बॅक्टेरिअल गुण आहे त्यामुळे वेदना कमी व्हायला मदत मिळणार आहे. सर्वांच्या घरांमधील सहज उपलब्ध असणारी हळद वापरायचे आहे. हळद पायाचा कोरडेपणा तर घालवते तसेच ओलावा टिकून राहून रुक्ष आणि कोरडेपणा घालवते.हळदीतील गुणामुळे ओलावा टिकून राहतो यानंतर सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे चंदन पावडर.एक चमचा पावडर आपल्याला ऍड करायची आहे. पायाच्या नरीशमेन्ट साठी, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, पायावरील डेड स्कीन बाहेर काढण्यासाठी चंदन पावडर उपयोग करते.
त्याच्यामुळे पायाला थंडावा सुद्धा मिळतो यानंतर लागणार आहे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर वडीच्या रूपांमध्ये सुद्धा मिळतो, पूजेला वापरतो तो नव्हे. हा कापूर अत्यंत औषधी गुणांचा असतो. यामध्ये अँटी बॅक्टरियल व अँटी फंगल असे गुण असतात. पायांच्या भेगा वर वर खूप फायदेशीर ठरतो.
आता एरंड तेल एक चमचा, लिंबाचा रस एक चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, चंदन पावडर एक चमचा, भीमसेनी कापूर अर्धा चमचा यांचे मिश्रण एकत्र करून मलम तयार करायचा आहे आणि ते मिश्रण पायांच्या भेगा आहेत त्यावर रात्री झोपण्यापूर्वी हळुवार लावून ठेवायचा आहे आणि सकाळी आपल्याला धुवून ठेवायचा आहे. या उपायामुळे या व मिश्रणामुळे पायाच्या भेगा आहेत सात दिवसांमध्ये भरून येणार आहेत. पायात होणारी आग , जळजळ सुद्धा थांबणार आहे. टाच दुखी सुद्धा कमी होणारा हा उपाय आहे. हा अत्यंत आयुर्वेदिक सहज आणि सोपा असा उपाय आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.