केवळ आपल्याला ठेवावी लागेल फक्त या ४ गोष्टींची काळजी.. एका आठवड्यातच केस गळती थांबेल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या काळात लोकांचे खाणे आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वाढते प्रदूषण माणसाच्या आरोग्यावरही परिणाम करते. केस गळणे या सर्व समस्यांमधील सामान्य समस्या बनली आहे. असे म्हटले जाते की प्रदूषणामुळे आपल्या केसांची मुळे कमकुवत होऊ लागतात ज्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. तसे पाहिले तर वृद्ध व्यक्तींना केस गळतीचा त्रास होतो, परंतु आजकाल अगदी लहान मुलांचे केस देखील अकाली टक्कल पडणे, केस गळतीमुळे त्या व्यक्ती वृद्ध दिसायला लागतात. जर आपण आपल्या गळणाऱ्या केसांनी त्रस्त असाल तर आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे केस गळतीपासून कसे मुक्त व्हाल या बद्दल माहिती देणार आहोत.
१. रासायनिक केसांच्या उत्पादनांपासून दूर रहा

लोक त्यांच्या केसांसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक हेअर प्रॉडक्टचा वापर करतात, परंतु त्यांना हे ठाऊक नसते की त्यात अनेक हानिकारक रसायने असतात ज्यामुळे त्यांच्या केसांवर त्याचा वाईट परिणाम होतो, जर आपण ते वापरल्यास आपले केस कमकुवत होतील आणि तुटतील, म्हणून आपल्या केसांवर हेअर जेल, हेयर स्प्रे सारखी बाजारात उपलब्ध असलेली उत्पादने वापरू नका.

२. दररोज शैम्पू वापरू नका

प्रत्येकाला त्यांच्या केसांची काळजी घेणे आवडते, परंतु जर आपण आपल्या केसांची काळजी घेत असाल तर आपण या देखील गोष्टींची काळजी घ्यायला हवी कि आपले केस सारखे धुवू नयेत., सामान्यतः हि चूक अनेक लोकं करतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे हा धुण्याचा योग्य मार्ग आहे. असे केल्याने आपले केस निरोगी व उत्तम राहतील. बर्‍याच जणांना केसातील घाण काढण्यासाठी केस रागडण्याची सवय असते, परंतु त्यांची हि सवय खूप चुकीची असते. आपण आपल्या केसांची हळुवारपणे बोटांनी मालिश करा.
३. हेअर ड्रायर वापरू नका

बहुतेक लोकांची अशी सवय असते की ते हेअर ड्रायरचा अधिक वापर करतात, ते हे केस सेट करण्यासाठी करतात परंतु  हेयर ड्रायरमुळे आपल्या केसांचे खूप नुकसान होते. त्याचा उपयोग आपले केस कमकुवत करू शकतो. जर आपण आपले केस निरोगी आणि मजबूत ठेवू इच्छित असल्यास ते नैसर्गिकरित्या कोरडे करा.

४. केस निरोगी राहण्यासाठी निरोगी आहार घ्या

एखाद्या व्यक्तीच्या जीवनशैलीचा केसांवर परिणाम होतो. जर आपण आपले केस निरोगी आणि मजबूत ठेवू इच्छित असाल तर पौष्टिक आहार घ्या आपण आपल्या जीवनात व्यायामाचा देखील समावेश केला पाहिजे. तसेच जास्त पाण्याचा वापर केला पाहिजे आणि पुरेशी झोप घ्यावी. नेहमी सकारात्मक रहा या सर्व गोष्टी केवळ आपल्या केसांसाठीच आवश्यक नसून या सर्व गोष्टी आपले आयुष्य निरोगी बनविण्यात उपयुक्त ठरतील.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असणार. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती नक्की शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *