आठवड्यातून फक्त २ वेळा या पाण्याने केस धुवा; झटपट वाढतील डोक्यावरचे केस.!

आठवड्यातून फक्त २ वेळा या पाण्याने केस धुवा; झटपट वाढतील डोक्यावरचे केस.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केस हे निसर्गाने दिलेला हा दागिना आहे तो आपले सौंदर्य खुलून दिसण्यासाठी फार मोलाचा ठरतो शिवाय प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व रुबाबदारपणा केसामुळे उठून दिसतो. या केसांची नीट काळजी घेतली नाही तर केस गळण्याचे, केसांमध्ये कोंडा होण्याची, केस रुक्ष दिसण्याचे ,केस पांढरे होण्याची शक्यताही वाढत जाते. आजचा उपाय खास करून महिलांसाठी महिलांसाठी आहे. फक्त तुम्हाला या पाण्याने केस धुवायचे आहेत.

या उपायांमुळे केसांची वाढ वेगाने होणार तर आहे पण ज्यांचे केस गळत आहेत, तेसुद्धा अचानकपणे केस पांढरे होत असतील त्याची गती सुद्धा मंदावेल शिवाय केसांमध्ये कोंडा होणे हि समस्या खूप दिवसापासून सुरू आहेते देखील कमी होईल. या पाण्यामुळे केस लांब वाढतील, चमकदार होतील. केसांचा काळेपणा दीर्घ काळासाठी टिकून राहिल. केसांचं सौंदर्य हे वाढायला लागेल वैशिष्ट्यपूर्ण असा हा उपाय आहे. या उपायासाठी एकूण चार पदार्थ वापरले आहेत. ते कसे वापरायचे आहेत याबाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

या शेंगा आहेत शिकाकाई च्या. आयुर्वेदामध्ये शिकाकाई ला भरपूर महत्त्व आहे. केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी या शिकाकाई चा फार पूर्वीपासून वापर केला जातो. याचा समावेश योग्य पद्धतीने जर केला तर केस लांबसडक दाट आणि मऊ होतात. शिककाई मधील पोषक घटक आहेत जे केसांच्या वाढीसाठी लाभदायक आहेत, यामुळे केसाचे तुटणे कमी होते शिवाय केस चमकदार होतात.

शिकाकाई मधील विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट आपल्या डोक्याला क्लीन करतात, ज्यामुळे हेअर फॉल होत नाही तसेच शिकाकाई उत्तम अँटी एजंट म्हणून सुद्धा काम करतात ज्यामुळे डोक्यातील कोंडा निघून जातो यामुळे केस वाढतात. शिकाकाई च्या शेंगा बारीक वाटून त्याची पावडर तयार करायची आहे.पाणी गरम करायला ठेवायचा आहे. त्यामध्ये ही पावडर एक चमचा ऍड करायची आहे त्यानंतर दुसरा पदार्थ आहे म्हणजे मंजिष्ठा.

मंजिष्ठा काड्याच्या रूपात किंवा पावडर या दोन्ही रूपांमध्ये आपल्याला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये उपलब्ध होत असतात म्हणजे केसाच्या पूर्ण वाढी साठी उपयुक्त अशी आहे हि काडी आहे. मंजिष्ठा केसांचा काळेपणा टिकून ठेवते. केस पांढरे होऊ देत नाहीत. जो नैसर्गिक रंग आहे तो टिकवून ठेवतात शिवाय केस गळती सुद्धा नियंत्रणात ठेवायला मदत मिळते. मंजिष्ठा संपूर्ण नरीशमेंटसाठी आवश्यक असलेले सगळे तत्व आपल्या स्काल्प पुरवते. यामुळे कोंडा होत नाही.

आपल्याला बारीक वाटलेली मंजिष्ठा पावडर एक चमचा या पाण्यामध्ये ऍड करायची आहे त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे त्रिफळा पावडर. आयुर्वेदामध्ये त्रिफळाचे जबरदस्त फायदा सांगितलेले आहे, यांच्यातील ॲक्टिव कंपाउंड जे आहेत ते नवीन केस उगवण्यासाठी खूप मदत करतात ज्यामुळे केस दाट आणि लांब व्हायला मदत मिळते. त्याच्या मध्ये असलेले अंतीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुण डोक्याचे संरक्षण करतात. गुंता मोकळी करतात त्यामुळे केसांची वाढ वेगानं व्हायला मदत मिळते.

एक चमचा त्रीफळाची पावडर याच्या मध्ये ऍड करायची आहे यानंतर चौथा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जटामंशी असे आयुर्वेदिक औषध आहे जी की कोंडा आणि केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्यातील अँटी इन्फलामेटरी गुण केसांचा कोरडेपणा घालतात. हेअर फॉलिकल मजबूत बनतात त्यामुळे सुद्धा खूप गळती थांबते,केस सिल्की बनवायला खूप मदत करतात. एक चमचा हि पावडर आपल्याला ऍड करायची आहे.

बघा एक चमचा शिकाकाई पावडर, एक चमचा मंजिष्ठा पावडर ,एक चमचा त्रिफळा पावडर आणि एक पावडर जटामंशी पावडर हे चार हि पदार्थ मिश्रण तयार करायचे आहे.हे मिश्रण छान उकळून झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्यायचा आहे आणि या गाळलेल्या पाणी आठवड्यातून दोन वेळा म्हणजे महिन्यातून चार वेळा धुवून घ्यायचे आहे त्यामुळे केस की ज्यांचे पांढरे होत असेल ते काळे होतील.केस लांब सडक दिसायला लागतात. असे केल्याने लवकरच रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे. अधिक उपयुक्त आणि आयुर्वेदिक उपाय आहे करून बघा याचा कोणतेही साइड इफेक्ट नाहीत उलट केस काळे सुद्धा दिसायला लागतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *