स्मार्टफोन मधील Google Chrome Browser च्या काही Tips आणि Tricks !

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपले स्वागत आहे. तुम्ही जर अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल किंवा नवीन घेतला असाल तर त्यात एक Browser  जो असतो तो  Google Chrome चा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत Google Chrome च्या काही टिप्स आणि ट्रिक्स ज्यांचा तुम्हाला तुम्हाला नक्की फायदा होईल.

तुम्हाला माहिती असेलच कि आपण बरेचसे टॅब्स ओपन करून ठेवतो त्यामुळे आपल्याला ऍड्रेस च्या इथे ३,४ असे नंबर्स दिसतात. त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही हव्या त्या टॅब वर जाऊ शकता. पण तुम्हाला माहितेय का या व्यतिरिक्त एक सोप्पं उपाय आहे तो म्हणजे तुमचा जो Browser चा जो बार असतो तो Left to Right स्वाईप करा. जेणेकरून तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या टॅब्स वर सोप्प्या पद्धतीने जाऊ शकता.

idownloadblog.com

मित्रांनो आजकाल Dark Mode आहे ते खूप लोकप्रिय झालेलं आहे. काहीजण थांबलेले आहेत कि अँड्रॉइड १० ची अपडेट कधी येईल आणि मग Dark Mode लावता येईल. पण Google Chrome मध्ये तुम्ही अँड्रॉइड १० नसताना सुद्धा Dark Mode करू शकता. जर तुमचं chrome  अपडेटेड असेल तर तुम्ही  Google Chrome च्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला Theme च ऑप्शन दिसेल त्या वर क्लिक करून तुम्ही तुमच्या  Google Chrome मध्ये Dark Mode ऍक्टिव्ह करू शकता. 

मित्रांनो Data Saver हा तुम्ही जर वापरत नसाल तर एकदा खरचं वापरून बघा. समजा जर का तुम्ही ब्रॉउस करत असाल आणि तुमचं तिथे १०० Mb वापरात येत असेल तर Data Saver चालू केल्यावर ते ५० Mb च्या खाली येईल. याने थोडा फायदा हा नक्कीच होतो. यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही बस Browser च्या सेटिंग मध्ये जाऊन Lite च ऑप्शन ऍक्टिव्ह करा.


बऱ्याच वेळेला असं होत कि काही वेबसाईट खूप महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तुम्हाला सेव्ह करून ठेवायच्या असतात तर Chrome मध्ये तुम्ही Save As PDF देखील करू शकता. यासाठी तुम्ही प्रिंट मध्ये जा. आणि वर Save As PDF असं ऑप्शन येत त्या वर क्लिक करून सेव्ह करू शकता. या साठी तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन शेअर वर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तिथे अशा प्रकारे प्रिंट च ऑप्शन दिसू लागेल. 

पुढची ट्रिक म्हणजे Incognito Mode. हे मोड तुमचा कोणताच डेटा सेव्ह करत नाही. जेव्हा तुम्ही chrome मध्ये काही सर्च करत असता तेव्हा तुम्ही कुठल्या लिंक वर गेलात, तुम्ही काय काय पाहिलत या सगळ्या गोष्टी Cache मध्ये सेव्ह होतात पण Incognito Mode मध्ये तसं काही होत नाही.

बर्र्याच वेळेला असं होत कि आपल्या स्मार्टफोन छाया स्क्रीन खूप छोट्या असतात आणि जे वेबपेजेस असतात ते अजूनच छोटे दिसतात. तसेच बरेचश्या वेबसाईट अशा असतात जिथे तुम्ही झूम देखील करू शकत नाही. तर तुम्हाला या साठी काही काळजी करायची गरज नाहीय. बस तुम्ही तुमच्या Chrome च्या सेटिंग मध्ये जा आणि Accessibility मध्ये जाऊन Force Enable Zoom या वर टिक करा. नंतर तुम्हाला जी माहिती झूम करून पाहायची असेल या साठी स्क्रीन वर ३ वेळा टॅप करा मग ती स्क्रीन अगदी दुर्बिणीसारखी झूम होईल. 
जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईट वर सारखं जात असाल तर त्यासाठी अगदी सोप्पं उपाय आहे. तुम्ही तुमची वेबसाईट Add To Home Screen  करू शकता. यामुळे दरवेळी वेबसाईट ओपन करण्यासाठी तुम्हाला सारखे Chrome ओपन करावं नाही लागणार. तुम्ही डायरेक्ट त्या आयकॉन वर क्लिक करून त्या वेबसाईट वर जाऊ शकता. 



तर मित्रांनो तुम्हाला या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा. आणि हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *