घरातील दरवाजाचा उंबरा असा असला तर देवी लक्ष्मी नेहमी घरात राहते.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घराला जो उंबरठा असतो त्या विषयी माहिती जाणून घेणार आहे आपल्या घराच्या मुख्य दाराला खालच्या बाजूला जी लाकडी पट्टी असते तिला चौकट असे म्हणतात.जी लाकडी चौकट तयार केली जाते त्यास उंबरठा असे सुद्धा म्हणतात.ही जी चौकट तयार केली जाते ती चौकट पूर्ण असावी परंतु आजकाल बहुतांश घरांमध्ये पट्टी असते पण खाली पट्टी लावलेली नसते ती चौकट कशी होऊ शकते.? आपल्या शास्त्रांमध्ये उंबरठा ला याला खूप महत्व दिले गेले आहे.
असे म्हटले जाते ते आपल्या घरात निरंतर लक्षी वास राहावा यासाठी पूर्वीच्या काळी उंबरठ्याची नेहमी पूजा केली जात असे व त्याचबरोबर घर बांधत असताना विशिष्ट मुहूर्तावर उंबरठा पूजूनच घर बांधले जात असे. काही प्राचीन मंदिरांमध्ये आपण गेलो तिथे आधी उंबरठाला नमस्कार करून मगच आत प्रवेश केला जातो त्याशिवाय आपण मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत त्याप्रमाणेच कोणतेही बाहेरची व्यक्ती घरात प्रवेश करताना उंबरठा ओलांडून आत यावी अशी आपल्या घराची रचना असावी म्हणजे घराला उंबरठा असावा.
गृह प्रवेश करतो जेव्हा आपण वास्तुशांती करत असतो तेव्हा ब्राह्मण सुद्धा आपल्याला आपल्या उंबरठ्याला ओलांडून उजवा पाय आत मध्ये घ्यायला सांगतो म्हणून आपल्या मुख्य दाराला उंबरठा असायलाच हवा. उंबरठा मुळे किती तरी सकारात्मक शक्ती आपल्याला प्राप्त होत असतात.आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ घरात सकारात्मक ऊर्जेचा साठा यावा यासाठी उंबरठा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
ज्या घरामध्ये उंबरठा असतो त्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा कधीच वास करत नाही व त्याचबरोबर धनाची देवता माता महालक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते. असे म्हटले जाते ज्या घरामध्ये उंबरठा नसतो त्या घरांमध्ये माता महालक्ष्मी जास्त वेळ थांबत नाही आणि अशा घरांमध्ये नेहमी गरिबी दारिद्र्य कांगाली येत असते. उंबरठा आपल्याला संयम व संस्कार शिकत असतो.
ज्या काही वाईट शक्ती असतात उंबरठा त्यांना आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही. असे प्राचीन शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे तसेच आणि क्षेत्रामध्ये उंबरठा चा योग्य प्रकारे वेगवेगळे उपाय सुद्धा सांगण्यात आलेले आहे. घराचे बांधकाम करताना उंबरठा खाली पितळेच्या तार टाकला तर त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्यातून आपल्याला शक्ती येते शक्य असल्यास लाकडी उंबरठा बनवावा परंतु आता काळानुसार वेगवेगळे बदल सुद्धा झालेले आहे.
लाकडी उंबरठा असल्याने आपण आपल्याला त्याचे फळ सुद्धा चांगले मिळते परंतु आता अनेक जण वेगवेगळ्या धातूचे उंबरठा बनवत असतात.असे म्हणतात की जेव्हा आपण उंबरठ्यातून घराबाहेर जात असतो तेव्हा उंबरठा आपल्याला प्रश्न विचारतो की आपण नेमके कोणते कार्य करायला जात आहोत ? कोणते वाईट कार्य करत नाही ना ? जेव्हा आपण आपल्या घरी येत असतो तेव्हा उंबरठा आपल्याला विचारत असतो तू बाहेर कोणते काम केले आहे का.? चुकीच्या कामातून पैसा धन मिळून आणलेला नाही ना.. म्हणजेच की आपल्या वाईट कर्मावर उंबरठा मुळे लगाम बसतो.
आपल्या घरातील सवाष्ण स्त्रियांनी उंबरठा पुसून उंबरठाची हळद-कुंकू ने पूजा करणे गरजेचे आहे. त्यानंतर दोन्ही बाजूला हळद-कुंकू यांनी स्वास्तिक काढावे व त्यावर काही अक्षता वाहायला हव्यात. असे करणे शुभ मानले जाते यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक उर्जा प्रवेश करत असते आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मक व कोणतीही बाधा असेल तर ती त्वरित निघून जाते यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना चांगले आरोग्य प्राप्त होते म्हणून आपले घर बांधताना आधी आपल्या घराला उंबरठा बांधणे गरजेचे आहे आणि त्या नंतरच आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.