घरात मुंग्या अश्याप्रकारे देत असतात धन व पैसा येण्याचा व जाण्याचा मोठा संकेत.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला मुंग्या पाहायला मिळतात. आज आपण आपल्या लेखामध्ये मुंगी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बहुतेक वेळा आपल्या घरातील धन येणार आहे कि धन जाणार आहे याचे संकेत आपल्याला मुंग्यांच्या माध्यमातून कळत असते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक अशा काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टींकडे आपण फारसे लक्ष देत नाही परंतु मुंग्या भविष्यात घडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्याचे आपल्याला संकेत देत असतात परंतु या गोष्टींचा अर्थ आपल्याला कळत नाही.
जर तुमच्या घरामध्ये काळा मुंग्या भरपूर प्रमाणामध्ये असतील आणि या काळया मुंग्या एका रेषेमध्ये चालत असतील तर याचा अर्थ तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. तुमच्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल व त्याचबरोबर काही मुंगी आपल्या घरामध्ये अचानक धन प्राप्ती साठी अतिशय सुखाचे लक्षण मानले जाते. काळी मुंगी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करत असते त्याचबरोबर काळी मुंगीला माता महालक्ष्मी चे प्रतिरूप सुद्धा मानले जाते यामुळे आपल्या घरामध्ये धन भरपूर प्रमाणामध्ये प्रवेश करत असते.
म्हणून काळी मुंग्या कधीच मारू नये परंतु याचा अर्थ सुद्धा असा नाही की त्या घरात तसेच ठेवावे यासाठी तुम्हाला एक कार्य करायचे आहे. यासाठी आपल्याला एक गुळाचा तुकडा घ्यायचा आहे आणि खडू प्रमाणे घराच्या बाहेर एक रेष मारायची आहे. गुळ्याच्या वासाने सर्व मुंगी घराच्या बाहेर जातील आणि हे कार्य करताना तुम्ही जर जमिनीवर लाल रंगाचे कपडे अंथरले तर अशावेळी माता महालक्ष्मी चे नामस्मरण केले तर माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते व तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल.
आता आपण लाल मुंगी बद्दल जाणून घेऊया. लाल मुंग्या घरामध्ये येताना अनेक अशुभ गोष्टी घेऊन येत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकटे अडचणी सुद्धा निर्माण होऊ लागतात. लाल मुंगीचा घरामध्ये प्रवेश करणे म्हणजे तुम्ही कर्जबाजारी होण्याचे लक्षण आहे. तुमचे व्यापारावरील नुकसान होऊ शकते आणि घरामध्ये शांतता भंग सुद्धा निर्माण होऊ शकते.
घरामध्ये वारंवार भांडण द्वेष इत्यादी सगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून आपल्या घरामध्ये जर लाल मुंग्या असतील तर त्याला लवकरात लवकर बाहेर काढाव्यात परंतु अशावेळी लाल मुंग्यांना विषारी औषध देऊन मारू नये त्यासाठी तुम्ही कणकेच्या गोळ्यामध्ये साखर टाकून एका कापडामध्ये बांधून तो कपडा दरवाज्याच्या बाहेर ठेवायचा आहे.
अशाने लाल मुंग्या आकर्षित होऊन घराच्या बाहेर निघून जातील. काळी मुंगी अत्यंत शुभ मानले जातात आणि जर तुम्ही कणकेच्या गोळ्या मध्ये साखर टाकून त्यांना खायला दिले तर तुम्हाला सहस्त्र भोजनाचे लाभ प्राप्त होत असते त्याचबरोबर सकाळी आंघोळ केल्यानंतर एक चिमूटभर साखर काळी मुंगी ला खायला दिले तर तुमच्या वरील कर्जसुद्धा लवकर दूर होऊन जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.