घरात मुलगी का असावी.? घरात मुलगी जन्माला आली असेल नक्की वाचा.!

घरात मुलगी का असावी.? घरात मुलगी जन्माला आली असेल नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपला समाज इतका पुढारलेला असूनही अनेक ठिकाणी बघतो की, मुलगी जन्माला आली तर नाके मुरडली जातात आणि मुलगा जन्माला आला तर सगळीकडे पेढा वाटला जातो. प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याला एक तरी मुलगा किंवा मुलगी असावी. मुलगी नसेल तरी चालेल पण प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये मुलगा अवश्य हवा.

पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा व्हावा अशी अपेक्षा ठेवली जाते व गर्भ धारण केला जातो परंतु जर पहिला मुलगा झाला तर मुलीची अपेक्षा केली जात नाही. आजही अनेकांच्या घरांमध्ये मुलीला ओझे समजले जाते, ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. आपल्याला मोह माया या सर्वांपासून सोडविण्यासाठी आपले डोके फोडण्यासाठी मुलगा असावा म्हणतो त्याप्रमाणे आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कन्यादान करून आपल्या घरात आणतो हे कन्यादान परतफेड करण्यासाठी काय करावे लागते आणि कन्यादान करण्यासाठी मुलगी असायला हवी.

ती जर आपण इतरांकडून कन्यादान घेतलेले असेल तर आपल्याला कन्यादानाचे कर्जसुद्धा फेडायची असते. जर आपण या कर्जाची परतफेड केली नाही तर आपण या संसारातून मुक्त होऊ शकत नाही. जेव्हा आपले लग्न होते तेव्हा आपण पत्नी च्या माध्यमातून आपण कन्यादान स्वीकारत असतो परंतु जेव्हा आपल्याला मुलगी होते तेव्हा आपण कन्यादान देत असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये एक तरी मुलगी आवश्य असायला हवी.

अशा वेळेस आपण आपल्या संसार बंधनातून मुक्त होतो. मुलगा हा फक्त आपल्या कुळाचा उद्धार करतो परंतु मुलगीही माहेर व सासर या दोन्ही कुळाचा उद्धार करत असते. दोन्हीकडे व्यक्तींचा आदर सन्मान करत असते. दोन्ही व्यक्तींना जपत असते परंतु मुलगा हा फक्त स्वतःचाच विचार करत असतो मुलगी ही सर्वांचा विचार करून आपले आयुष्य त्यांच्यासाठी जगत असते. ज्या व्यक्तींवर भगवंतांची कृपा असते त्या व्यक्तींच्या घरातच मुलींचा जन्म होतो.

असे म्हणतात की मुलगी झाली अन् लक्ष्मी आली ही म्हण पण अनेकदा ऐकली असेल. मुलगी घरात आली तर माता महालक्ष्मी स्वतः आपल्या घरांमध्ये येत असते आणि तिच्या येण्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते. मुलगी चे पाऊल घरात पडताच घरातील वातावरण मंगलमय होऊन जाते. मुलगी इतकी माया घरामध्ये कोणालाच नसते. मुलगी आपल्या आई वडीलांवर खूप प्रेम करत असते व त्याचबरोबर सासू सासरे यांच्यावर सुद्धा जीवापाड जीव लावत असते. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे.

आपल्या आजूबाजूला आपण अनेक घर असे पाहतो आहे की ज्या घरामध्ये मुलगा जन्माला आलेला आहे, तो मुलगा वंशाचा दिवा आहे परंतु जेव्हा आई-वडील म्हातारे होतात तेव्हाच दिवा त्यांना सांभाळत नाही अशावेळी मुलगीच त्यांची पणती होऊन त्यांना सांभाळत असते त्यांना आपल्या घरी नेऊन त्यांचे संगोपन करत असते. म्हातारपणाची काठी म्हणून मुले नाहीतर मुली अत्यंत ताठ मानेने उभे राहतात आणि आपल्या आई-वडिलांचा संगोपन करतात.

मुलींचे आपल्या आई पेक्षा वडिलांवर थोडेसे जास्त प्रेम असते. प्रत्येक मुलीचा आधार हा तिचा वडील असतो आणि म्हणूनच जगामध्ये मुलगी आणि वडिलांचे नाते हे अवर्णनीय आहे. वडिलांना प्रत्येक गोष्ट पटवून देण्याचे कार्य सुद्धा मुली खूप चातुर्याने करत असतात कारण की मुलींना आपल्या वडिलांना कशा पद्धतीने मनवायचे असते हे माहीत असते.

मुले कधी कधी आपल्या आई-वडिलांवर रागवतात परंतु तिथे प्रेम सुद्धा करत असतात कधी कधी वडिलांना एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी मुलगी वडिलांवर रागावून सुद्धा असते परंतु तेवढीच कळल्यानंतर प्रेमाने माया सुद्धा लावत असते कधीकधी हे करणे आईला सुद्धा जमत नसते अशा वेळी घरातील मुलगी सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या घरातील सदस्यांचे मनधरणी करत असते म्हणूनच आपल्या घरामध्ये मुली राहणे अत्यंत चांगले आहे.

कारण की जेव्हा एक मुलगी शिकते तेव्हा अनेक कुटुंबाचे उद्धार होत असतो. हीच मुलगी उद्या कोणाची तरी पत्नी आई आणि आज्जी होणार आहे म्हणून आपल्याला मुलगा मुलगी असा भेदभाव न करता जर तुमच्या घरा मध्ये सुद्धा मुलगी असेल तर तिचे संगोपन अतिशय आदराने आणि प्रेमाने करायला पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *