घरात माठ असल्याने काय घडते? नक्की पहा फायदा करून घ्या.
नमस्कार मित्रांनो,
पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे मातीचे माठ असत. उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा वर्षाचे बाराही महिने प्रत्येक घरात माठातील पाणी पिण्याचे सर्वांना सवय होते. आणि त्या पाण्यामुळे कधीही सर्दी-पडसे कोणालाही होत नसे. नंतर घरोघरी फ्रीज आले. मग फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या जाऊ लागल्या व बाटलीतले पाणी पिण्यास सुरुवात झाली. आता आले पुरिफायर.
आता आपण डायरेक्ट नळातूनच पाणी प्यायला घेतले जाते. परंतु जी मजा माठाच्या पाण्यातील आहे ती इतर कशातच नाही. आजही उन्हातून घरी आल्यानंतर माठातील थंडगार पाणी पिले तर तहानही भागते आणि गारवाही जाणवतो. तसेच इतर कोणत्याही पाण्यात नाही. आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीचे माठ असतात आणि त्यातलेच पाणी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत पितात.
शहरी भागात बहुतेक ठिकाणी उन्हाळ्यात अडगळीत ठेवलेले माठ शोधून काढले जातात. आणि त्या पाणी भरून त्यांचा वापर होतो. घरात माठ भरून ठेवणे याचा वास्तुशास्त्राशीही खूप निकटचा संबंध आहे. घरात असलेला माठ हा घराच्या भरभराटीसाठी तसेच समृद्धीसाठीही महत्त्वाची कामगिरी बजावतो. चला तर जाणून घेऊयात घरात पाण्याचा माठ का असावा ते?
वास्तुशास्त्रानुसार घरात वापरात असलेल्या पाण्याच्या माठामुळे घरातील अनेक अडीअडचणी व संकटे सहज सुटतात. आपल्या संकटांचे व बांधांचे निराकरण करण्याचे कार्य माठामार्फत न कळतपणे होत राहते. असे म्हणतात की, आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात आपल्या पितरांचा वास असतो. आणि जर घरात पिण्याच्या पाण्याचे भांडेच भरून ठेवले नाही तर आपले पित्र कुठे वास्तव्य करतील?
पूर्वीच्या काळी दररोज सकाळी घरातील माठ्यातून 1 तांब्याभर पाणी घेऊन ते महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला अर्पण केले जात असे. यामुळे दररोज आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असे. आता असे काहीही राहिलेले नाही. घरात माठच नाही तर त्यातून तांब्याभर पाणी घेऊन जाण्याचा प्रश्नच नाही.
आणि आपण मंदिरात गेलो तरी रिकामा तांब्या घेऊन जातो आणि तेथूनच पाणी घेऊन तेच पाणी महादेवांना अर्पण करतो. मग तो पितृदोष घरात तसाच राहतो आणि वाढतच जातो. यामुळे घरात नेहमी प्रत्येक कार्यात काही न काही अडीअडचणी आणि संकटे येत राहतात. घरात भांडण तंटे आणि वाद विवाद होतात. परंतु आपल्याला त्याचे कारणच समजत नाही.
त्याशिवाय आपण घरात जो पाण्याचा माठ भरून ठेवतो तो नेहमी घराच्या उत्तर दिशेलाच असावा. कारण ही पिण्याच्या पाण्याची अगदी योग्य दिशा आहे. पाण्याचा माठ किंवा हंडा कधीही रिकामा होऊ देऊ नये. पाण्याचे भांडे अर्धे झाले की, लगेच त्यात पुन्हा पाणी भरावे. माठातील निम्म्यापेक्षा कमी झालेले पाणी घरात वाद विवाद आणि भांडणे उत्पन्न करते.
जर पाण्याचे भांडे निम्यापेक्षा खाली गेले तर घरात चोवीस तासात नक्कीच भांडणे व वाद विवाद होतात. म्हणून पिण्याच्या पाण्याचे भांडे कधीही अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये. अर्धे झाले तर हरकत नाही परंतु त्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये. घरात जर कोणाला मानसिक दडपण आलेले असेल,
ताणतणाव वाटत असेल तर अशा व्यक्तीने माठातून 1 तांब्या भरून पाणी घ्यावे व सलग एखाद्या झाडाला काही दिवस टाकावे. या उपायामुळे त्या व्यक्तीचा ताणतणाव, दडपण नक्कीच दूर होते.मित्रांनो आपल्या लक्षात आलेच असेल की, घरात पाण्याचा माठ का असावा आणि त्याचे काय महत्त्व आहे ते.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.