या 4 राशी लव मॅरेज करतात…कोणत्या आहेत त्या जाणून घ्या.

या 4 राशी लव मॅरेज करतात…कोणत्या आहेत त्या जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो,

आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे विवाह. प्रत्येकालाच आपला विवाह केव्हा होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपला जोडीदार कसा असेल ही उत्सुकता सुद्धा प्रत्येकाला असते.

ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या कुंडलीतील 7 व्या स्थानावरून विवाहाची माहिती कळते. अलीकडच्या काळात कित्येक लोक प्रेम विवाह करतात. कित्येकांच्या बाबतीत असे सुद्धा होतो की प्रेमात पडतात पण लग्नापर्यंत पोहोचत नाही.

मार्गात अनेक अडथळे येतात पण काही लोक असेही असतात की, मार्गात कितीही अडथळे आले तरी सुद्धा आपलं प्रेम मिळवण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतात. आणि प्रेमाचं लग्नात रूपांतर करतात. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच राशिंबद्दल ज्यांच्यामार्गात कितीही अडथळे आले तरी सुद्धा ते त्यांच्या प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत बऱ्याचदा पूर्ण करतात.

1) मेष रास – या राशीचे लोक विश्वासार्ह असतात. या लोकांनी एकदा एखाद्यावर प्रेम केलं की, शेवटपर्यंत साथ देतात आणि त्यांच्याशी लग्न करतात. कारण यांचे निर्णय फार पक्के असतात. मंडळी तसं तर हे लोक पटकन कुणाच्या प्रेमात पडत नाहीत. पण जर चुकुन माकुन कुणाच्या प्रेमात पडलीच तर मात्र प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत नेल्याशिवाय राहत नाहीत.

2) मकर रास – मकर राशीच्या लोकांनाही प्रेमविवाहाला प्राधान्य द्यायला आवडते. हे लोक आपल्या जीवन साथीबरोबरही खूप प्रामाणिक असतात. त्यामुळे ते काहीही झालं तरी आपल्या प्रेमाची साथ सोडत नाहीत. हे लोक सहसा त्यांची निवड बदलत नाही आणि त्यामुळेच मकर राशीच्या लोकांचा सुद्धा प्रेमविवाह होऊ शकतो.

3) मिथुन रास – मिथुन राशीचे लोक स्वभावाने मुळातच चांगले असतात. त्यामुळे ते सहजच एखाद्याच्या मनात आपली चांगली ओळख निर्माण करतात. तसच ते पटकन कोणाशीही मैत्री सुद्धा करतात. या राशीचे लोक दिसायलाही चांगली असतात. ही लोकं त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर असतात. एकदा का मिथुन राशीची लोक प्रेमात पडली ती सहसा कोणाचीही फसवणूक करत नाही. या राशीच्या कुंडलीत बऱ्याचदा प्रेम योग असतोच.

4) वृषभ रास – पटकन प्रेमात पडणाऱ्या राशीमध्ये पहिला नंबर लागतो वृषभ राशीचा. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळेच वृषभ राशीच्या लोकांना एक आकर्षक व्यक्तिमत्त्व मुळातच लाभलेलं असत. या राशीच्या स्वभावात दिलदारपणा, खेळकरपणा आणि आशावादीपणा असतो.

भरपूर उत्साही असतो आणि त्यामुळेच लोक यांच्याकडे पटकन आकर्षित होतात. आयुष्याचा भरपूर आस्वाद घेणाऱ्या वृषभ राशीचे लोक जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्यांचं प्रेम मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. मग मार्गात येणाऱ्या सगळ्याच अडथळ्यांना पार करण्याची त्यांची तयारी असते आणि म्हणूनच वृषभ राशीच्या लोकांचा सुद्धा बऱ्याचदा प्रेमविवाह झालेला पाहायला मिळतो.

तर मंडळी या होत्या 4 राशी. या जर प्रेमात पडल्या तर त्यांच्या प्रेमाचा प्रवास त्या लग्नापर्यंत नेतातच. या बाबतीला तुमचा अनुभव कसा आहे नक्कीच थोडाफार वेगळा ही असू शकतो पण तो जाणून घ्यायला मला आवडेल तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *