घरात माठ असल्याने काय घडते.? एकदा नक्की पहा आणि फायदा करून घ्या.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरामध्ये माठ आपल्याला पाहायला मिळायचा. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तिन्ही ऋतुमध्ये आपण माठातले पाणी प्यायचो. या माठातले पाणी आपण सगळेजण पीत असतो परंतु त्यानंतर बदल होऊ लागला कालांतराने आपल्या सर्वांच्या घरी फ्रीज येऊ लागले. फ्रिजमधील थंड पाणी आपण सगळे पिऊ लागलो.
फ्रीजमध्ये अनेक जण बाटली भरून ठेवत असे आणि तीच बाटलीतले पाणी आपण हळूहळू तिला घेऊ लागलो आणि अजून तंत्रज्ञानात प्रगती झाली हळूहळू विकास होऊ लागला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये वॉटर प्यूरीफायर आले आणि आता आपण थेट नळातून येणारे पाणी सेवन करायला लागलेलो आहोत परंतु या सर्व गोष्टी जरी काळानुसार बदलत गेल्या तरी माठातील पाण्याची चव कशालाच नाही हे मात्र तितकेच सत्य आहे.
आजही जेव्हा आपण उन्हातून थकून घरी येतो अशा वेळी जर आपण माठातले पाणी प्यायले तर आपला आत्मा तृप्त होतो. आजही ग्रामीण भागामध्ये मोठे मोठे माठ घराच्या बाहेर असतात आणि आज सुद्धा अनेकांच्या घरांमध्ये माठ आपल्याला पाहायला मिळतात.
शहरांमध्ये सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अडगळीच्या खोलीमध्ये ठेवलेला माठ शोधला जातो आणि त्यामध्ये पाणी भरले जाते जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला थंडगार पाणी प्यायला मिळावे म्हणून परंतु तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की आपल्या घरातील माठ याचा थेट संबंध वास्तुशास्त्र सुद्धा निगडित आहे ज्या घरांमध्ये माठ असतो त्या घरांमध्ये नेहमी भरभराट होत असते. आपल्या घरातील माठ हा संपन्नतेचा वैभवतेचा प्रतीक मानला जातो. चला तर मग आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की आपल्या घरामध्ये माठ नेमका का असायला हवा आणि या माठाचे वास्तूशास्त्राच्या दृष्टिकोनातून नेमके कोणते फायदे आहेत त्याबद्दल..
आपल्या घरातील माठ हा सुख शांती वैभव यांचा संकेत मानला जातो तसेच ज्या घरामध्ये माठ असतो त्या घरामधील संकटे सुद्धा लवकरच दूर होतात. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक संकटांचा नाश करण्याची क्षमता व बाधांचा नायनाट सुद्धा माठा मार्फत कळत-नकळत होत असतो. असे म्हटले जाते की,आपल्या घरातील पिण्याच्या रिकाम्या भांड्यांमध्ये पितर वास करत असतात आणि अशा वेळी जर आपण घरातील भांडी रिकामी ठेवले तर आपले पितर कुठे वास करतील हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे.
पूर्वीच्या काळी एक पद्धत खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती म्हणजेच की आपल्या माठातील एक तांब्या भरून महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण केले जात असे. असे केल्याने आपल्या घरातील पितृ दोष हळूहळू कमी होत असे. सध्या आपण तसे काहीच करत नाही जरी आपण महादेवाच्या पिंडी वर जल अर्पण करायला गेलो तरी आपण तसेच रिकाम्या हाताने जातो आणि आपल्या घरामध्ये माठ नसल्याने आपण तांब्या सुद्धा रिकामाच घेऊन जातो आणि अशावेळी आपल्या घरातील पितृदोष सुद्धा तसाच राहतो आणि दिवसेंदिवस वाढत जातो.
या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या प्रत्येक कार्यामध्ये काहीतरी अडचणी येत असतात. प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला खूप सार्या गोष्टींना सामोरे जावे लागते. नेहमी कटकटी भांडण वाद-विवाद वारंवार घडत असतात. या सगळ्या घटना घडण्याच्या मागे नेमके काय कारण आहे ते सुद्धा आपल्याला कळत नाही आणि अशा वेळी आपण चिंता व्यक्त करत असतो त्याच बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की आपल्या घरातील पाण्याचा माठ हा नेहमी उत्तर दिशेला असायला हवा.
पिण्याच्या पाण्याची जागा ही अतिशय उत्तम मानली गेली आहे तसेच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, पिण्याचे माठ व हंडा कधीच रिकामी ठेवू नये. माठामध्ये जर पाणी कमी शिल्लक राहिले असेल तर अशा वेळी ते भांडे आपल्याला पाण्याने भरायला हवी तसेच माठ सुद्धा पूर्ण भरायला हवा. जरा पण तसाच अर्धा ठेवला तर आपल्या घरातील सदस्यांमध्ये भांडण होऊ लागतात आणि अनेक वाद सुद्धा घडतात आणि म्हणूनच आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी रिकामी ठेवू नये.
आपल्या घरातील पिण्याचे भांडे कधीच रिकामे ठेवू नयेत असे जर भांडे रिकामे झाले असेल तर अशा वेळी ते भरावी अन्यथा चोवीस तासाच्या आत आपल्या घरातील सदस्यांमध्ये भांडण नक्की होत असते अशी मान्यता सुद्धा आहे. जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला नेहमी मानसिक दडपण येत असेल किंवा ताणतणावामुळे नेहमी बेचैनी वाटत असेल तर अशावेळी माठातील पाणी घेऊन एखाद्या झाडाला काही दिवस अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला फरक जाणवेल तसेच तुम्हाला जे मानसिक दडपण आहे ते सुद्धा निघून जाईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.