ज्यांच्या घराबाहेर या वस्तू असतील तिथे लक्ष्मी कधीच येणार नाही; लगेच दूर करा या वस्तू.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण घराच्या तुलनेत आपले प्रवेशद्वार सुसज्ज व सुंदर कसे दिसेल याची जास्त काळजी घेतो कारण तसे तर अंगनावरून हात घराची परीक्षा म्हणजे बाहेरचा परिसर, अंगण ,प्रवेशद्वार व्यवस्थित असे नीटनेटके व सुंदर असेल तर घर सुद्धा त्याप्रमाणे नीटनेटके व्यवस्थित असल्याचे लक्षात येते. आपण घराचे मुख्य द्वार नेहमी स्वच्छ ठेवत असतो कारण येथूनच आपल्या घरात सुख व संपन्नता आणि आनंदाचे आगमन होते. या लेखात आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेश द्वार बद्दल अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
घराचे मुख्य द्वार शुभ व उत्तम बनवण्यासाठी काय केले पाहिजे हे जाणून घेणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. सकाळी उठल्याबरोबर लगेचच मुख्य दार उघडावे त्याबरोबरच जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळी ही मुख्य दार उघडे असावेत. सर्वात आधी दार उघडल्यावर लगेच उंबरठा वर तांब्या भर पाणी शिंपडावे त्यामुळे त्यावर जमलेली जी नकारात्मक ऊर्जा असते ती घरात प्रवेश करू शकत नाही यासाठी तुम्ही रात्री घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पाण्याचा तांब्या ठेवू शकता आणि या तांब्यामध्ये हळद, अक्षदा व अत्तर सुद्धा टाकू शकता.
घराच्या प्रवेशद्वारावर माता महालक्ष्मीचा फोटो अवश्य असावा पण जेव्हा जेव्हा आपण घराच्या बाहेर जाऊ तेव्हा अशा वेळी आता महालक्ष्मीच्या फोटो आपल्या नजरेस पडावा असे असल्याने आपल्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी कृपा आशीर्वाद होतो. मगच बाहेर पडावे त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वारावर एखादे मंगल चिन्ह आवश्य काढायला हवे.सध्याच्या दिवसांमध्ये आपण अनेकदा पाहतो की प्लास्टिकचे चिन्ह आपल्या पैकी अनेक जण दरवाजावर लावत असतात परंतु अशाप्रकारचे चिन्ह लावल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत नाही.
आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण आपल्या वेळेनुसार व शक्तीनुसार रांगोळी आवश्यक काढायला हवी व रांगोळी काढताना त्यामध्ये थोडेसे रंग सुद्धा करायला हवे कारण की पांढरी रांगोळी काढायची नसते, असे केल्याने आपल्या घराकडे माता महालक्ष्मी आकर्षित होते आणि माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश केल्याने आपल्याला भविष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
जेव्हा आपण आपल्या घराच्या प्रवेश द्वारासमोर रांगोळी काढतो आणि त्या रांगोळी मध्ये माता महालक्ष्मीचे पावले जर आपण काढत असू तर अशावेळी त्या पावलांचा आकार व दिशा आपल्या घरांकडे असायला हवे.अनेकदा बाजारामध्ये आपल्याला रांगोळीचे स्टीकर सुद्धा पाहायला मिळतात परंतु यामुळे फक्त आपल्या घराची शोभा वाढते यामुळे आपला कोणत्याही प्रकारचा फायदा प्राप्त होत नाही.
अनेकदा आपण प्लास्टिक चे तोरण सुद्धा लावत असतो ते सुद्धा चुकीचे आहे. आपण आपल्या घराला नेहमीच फुलांचे किंवा आंब्याच्या पानाचे तोरण लावायला हवेत,असे करणे हे शुभ प्रतीक मानले जाते. आपल्या घराला आंब्याचे तोरण बांधणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला आंब्याचे तोरण नाही मिळाले तर अशावेळी तुम्ही अशोकाचे पान, पिंपळाचे तोरण सुद्धा लावू शकता असे केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो व माता महालक्ष्मी सुद्धा आपल्या जीवनामध्ये वास्तव्य करते. मंगळवारच्या दिवशी आंब्याचे तोरण लावणे अतिशय शुभ मानले गेले आहे.
आंब्याचे तोरण मध्ये सुखाला आकर्षित करण्याची क्षमता असते. आंब्याच्या पानामुळे चिंता व काळजी दूर होते म्हणून आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभ समजले जाते. घराचा मुख्य दरवाजाला हे तोरण बांधल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आपल्या घराच्या प्रवेश द्वाराजवळ तुळशी असायला हवी यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला जर वातावरणामध्ये जी नकारात्मक उर्जा असेल तर ती शोषून घेतली जाते. तुळशी नकरात्मक उर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते.
म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर तुळशीचे वृंदावन आवश्य असायला हवे त्याचबरोबर आपल्या घराला नजर दोष लागू नये म्हणून आपण नजर गणपती व पंचमुखी हनुमान यांचा फोटो सुद्धा घराच्या प्रवेश द्वारावर लावायला हवा.आपल्यापैकी अनेक जण लिंबू मिरची सुद्धा प्रवेशद्वारावर बांधत असतात यामुळे सुद्धा कुठलीही वाईट बांधा व शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही.
आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याचा सूर्य आवश्य असायला हवा तसेच घराच्या प्रवेश द्वारा मागे एक झाडू नक्की ठेवायला हवा यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश अजिबात करणार नाही. आपल्यापैकी अनेक जण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घोड्याची नाल लावत असतात परंतु ही घोड्याची नाल घोड्याने वापरलेली असावी.
अनेक जण बाजारातून नवीन नाल विकत घेऊन आणत असतात यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही तसेच शुक्रवारच्या दिवशी काळे घोड्या ने घातलेली नाल जर आपण आपल्या प्रवेशद्वारावर लावल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा तर येतेच पण त्याचबरोबर अशा काही गोष्टी सुद्धा आपल्याला जपणे गरजेचे आहेत की ज्यामुळे नकारात्मक येणार नाही.
आपल्यापैकी अनेकांच्या घरांसमोर चप्पल , बूट पाहायला मिळतात. या चपला अस्ताव्यस्त पडलेले असतात यामुळेसुद्धा घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच अनेकजण घराच्या बाहेर काटेरी वनस्पती यांची लागवड करत असतात जेणेकरून आपल्या घरातील अंगण सुंदर दिसावे परंतु असे करणे सुद्धा नकारात्मक शक्ती ला आमंत्रण देत असते म्हणून आपल्या घरामध्ये जर आपल्याला सुख शांती वैभव नांदावी असे वाटत असेल तर काही सात्विक वनस्पती व आपल्या आरोग्यासाठी चांगल्या ठरतील अशा वनस्पतींची लागवड आपल्याला करायला हवे.
आपल्यापैकी अनेक जण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा डबा ठेवत असतात असे करणे सुद्धा होते तर चुकीचे आहे अशा प्रकारच्या कचरा डबा ठेवल्याने तिथे जीवजंतू निर्माण होतात आणि परिणामी आपण आपल्या घरामध्ये आजारपण प्रवेश करते आणि हे आजारपण म्हणजे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते यामुळे आपल्या घरातील आर्थिक धनाची हानी होते आणि घरातील सदस्य आजारी पडतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.