बारीक पुळ्या, घामोळ्या, लाल पुळ्या, चट्टे, डाग कायमचे निघून जातील; करा हा घरगुती उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवी शरीर व अत्यंत सेंसिटीव असते यावर घामामुळे म्हणा किंवा कशामुळे देखील जर आपल्या त्वचेवर वेगवेगळे स्पॉट येत असतील. कुठल्याही प्रकारची ऍलर्जी होत असेल. स्किन लाल होणे, घामोळ्या येणे किंवा खाज येणे, किंवा स्किन वर छोट्या छोट्या पुटकुळ्या येऊन त्या लाल होत जाणे आणि स्किन वर पसरत जाणे किंवा कुठल्याही प्रकारचे एलर्जी होऊन आपल्या शरीराला याचा त्रास होणे.
आणि स्किन वर नायट्याचा त्रास असो किंवा चट्टे असो या सारख्या समस्या देखील असतील तरी यामुळे त्या निघून जाण्यास मदत होईल. आणि याचाच उपयोग आपले केस सिल्की, सुंदर आणि लांबसडक व्हावे. तसेच केसांमधील कोंडा निघून जावे यासाठी देखील करू शकतो. मित्रांनो आम्ही आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो करताच तुमच्या शरीरावरचे व डाग व चट्टे निघून जातील हा उपाय तुम्हाला खूप फायदेशीर आहे म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचा.
तर यासाठी उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्रेश कडीपत्त्याची पाने. कढीपत्ता हा आपल्याला अत्यंत सहजतेने मिळणारा असा पदार्थ आहे. की जो आपल्या शरीरा करता खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण यामुळे पित्ताच्या समस्या, गॅसचा विकार व पोटांच्या समस्या हे तर निघून जातातच. परंतु केसांकरिता व स्कीनकरीता हा कडीपत्ता तितकाच उपयुक्त ठरतो.
तर या कडीपत्तयामध्ये विटामीन ए, विटामीन बी, विटामीन सी, विटामीन इ, कॉपर, मिनरल, फॉस्फरस, कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, आयरन, अमिनोऍसिड ही पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. आणि म्हणूनच कढीपत्ता हा आपल्या शरीराचा करतात इतकाच उपयुक्त ठरतो. तर यासाठी आठ-दहा कढीपत्त्याची पाने घेऊन, हे प्रथम स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. मिठाच्या पाण्याने तुटल्यामुळे जर यावर काही जंतू असतील तर ते निघून जातात.
मित्रांनो एका पातेल्यामध्ये अर्धा कपभर दूध घेऊन, आणि हे छान गरम होत आहे तेव्हा आपण जी कडीपत्त्याची पाने घेतली आहेत ती यामध्ये टाकायची आहेत. ती हाताने थोडी बारीक करून घेऊन यामध्ये टाकायचा आहे. जेणेकरून या मधील अर्क आहे तो या दुधामध्ये छान उतरतो. परंतु कडीपत्ता यामध्ये टाकताना प्रथम हे दूध छान गरम करून घ्यायचे आहे आणि नंतरच कढीपत्त्याची पाने या दुधामध्ये टाकायची आहेत.
आणि हे मंद आचेवर किंवा तीन ते चार मिनिटे छान गरम करून घ्यायचे आहे. लगेचच गॅस बंद करून हे असेच थंड होऊ द्यायचे आहे आणि हे गाळून घ्यायचे आहे. आणि हे जे तयार झालेले दूध आहे ते एका वाटीत काढून घ्या. आपल्याला हवे तेवढे दूध आपण काढून घ्यायचे आहे. आणि उरलेले दुध आहे ते आपण फ्रीजमध्ये देखील स्टोर करून ठेवू शकता. दोन दिवस आपण याचा वापर करू शकता. तिसऱ्या दिवशी हे दूध नासेल.
तर याच प्रमाणे नवीन दूध तयार करून याचा वापर करायचा आहे. आणि यामध्ये अगदी पाव चमचा भर एलोवेरा जेल टाकायची आहे. आणि जर तुमच्याकडे घरी कोरफड असेल तर त्याचा देखील येथे वापर केला तरी चालेल आणि हे एकजीव होईपर्यंत छान छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला हे दूध वापरायचे आहे त्याच वेळेस कोरफडेचा वापर यामध्ये करायचा आहे. आणि एक कॉटन बॉल घेऊन या ठिकाणी आपल्याला एलर्जी होत आहे किंवा त्रास आहे, त्या त्या ठिकाणी हे दूध लावून घ्यायचे आहे.
अगदी अलगद हाताने हे लावून घ्यायचे आहे आणि हे असेच अर्धा ते एक तास सोडून द्यायचे आहे. व नंतर सामान्य कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. नॉर्मल त्रास असेल तर आंघोळीआधी रोज हा उपाय केल्याने देखील तुम्हाला बरं वाटेल. परंतु जास्त त्रास होत असेल तर दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी याप्रमाणे हा उपाय करा. यामुळे कुठल्याही प्रकारची एलर्जी असेल तर ती निघून जाण्यास मदत होते. मित्रांनो हे डाग किंवा चट्टे जर जास्तच असतील तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन नक्की तपासणी करुन घ्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.