फक्त ५ मिनिटांत या घरगुती रामबाण उपायांनी तुमची सांधेदुखी दूर करा.. १००% फरक जाणवेल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वाढत्या वयानुसार सांधेदुखीचा त्रास वाढायला लागतो. चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अशावेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो.
सामान्य लक्षणे:-
काम किंवा हालचाल करताना सांधे दुखणे, सांध्यांवर सूज येणे, सकाळी उठल्यावर सांधे दुखणे, विशेषतः हाता पायाची बोटे जखडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
सांधेदुखीमध्ये काय खावे..?
गहू, तांदूळ, दुधी, दोडका, घोसाळे, तूर, मूग, कुळीथ, द्राक्षे, कोहळा, दूध, तूप, लोणी, आले, लसूण, गरम पाणी इत्यादी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे.
काय खाऊ नये..?
वरई, नाचणी, चवळी, वाल, पावटे, कारले, कैरी, कच्चा टोमॅटो, आंबट दही. चिंच, इडली, वगैरे आंबवलेले पदार्थ खाण्याचे टाळावे.
सांधेदुखीवर घरगुती उपाय:-
सांधेदुखीचा त्रास असल्यास दोन चमचे बडीशेप व सुंठीचे तुकडे चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राही पर्यंत उकळावे. व अर्धा चमचा एरंड तेल घालून प्यावे. याप्रमाणे महिनाभर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल. दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंडमूळाची भरड चार कप पाण्यामध्ये उकळावे व कप पाणी राहिल्यावर गाळून प्यावे. हा काढा नियमित घेतल्यास सांधेदुखीमध्ये निश्चित आराम मिळेल.
याशिवाय याने परसाकडे साफ होऊन सांध्यांवरील सूज कमी होऊन वेदना कमी होतात. निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सूज व वेदना कमी होतात. जर सांधा दुखत असेल तर मूठभर ओवा एरंडतेल गरम करून सुती कापडात बांधून पुरचुंडी करावी व त्याने दुखणारा सांधा शेकावा.
सांधा सुजला असेल व वेदना होत असतील तर सूज व वेदना कमी करण्यासाठी एरंड्याची पाने वाफवून कुटून दुखत असलेल्या सांध्यावर बांधावी. रोजचे कणिक मळताना चमचाभर एरंड तेलाचे मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलवा खावा. याने सांधेदुखीचा व सर्व सांधे संबंधित समस्या दूर होतात.
अशक्तपणामुळे सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो. रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये, व सकाळी चालायला जावे. असे केल्यास सांधेदुखीचा त्रास होत नाही. तसेच तीळ व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तेल नियमित लावल्यास व आहारामध्ये योग्य प्रमाणात साजूक तूप समाविष्ट केल्यास शरीराचे स्नेहन होऊन सांधेदुखी कमी होते.
तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.