फक्त १ मिनिटांत तुमच्या तोंडाचा वास घालवण्यासाठी हा घरगुती उपाय एकदा नक्कीच करा..

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बऱ्याच जणांना तोंडाला वास येण्याची समस्या असते. कोणासोबत बोलायला लागल्यावर तोंडाला वास येतो आणि मग चार चौघांमध्ये अपमान झाल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो आज आपण तोंडाचा वास घालवणारा अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय केल्यावर अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला याचा फरक दिसू लागेल.

मित्रांनो आपल्या तोंडाचा वास का येतो हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. आपण जे काही अन्न खातोय त्या अन्नाचे लहान-लहान कण जर आपल्या तोंडामध्ये शिल्लक असतील आपल्या दातांच्या फटीत अडकत असतील किंवा आपल्या हिरड्यांजवळ ते चिटकून राहत असतील तर मित्रांनो कालांतराने ते सडतात आणि त्यातून दुर्गंधी निर्माण होते.
म्हणून जेवण झाल्यानंतर कोणताही अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर आपण चूळ भरायला पाहिजे. हि एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जिचं तुम्ही पालन करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही अन्न खातोय त्याच व्यवस्थित पचन व्हायला हवं. जर तुम्ही खाल्लेलं अन्न पचत नसेल, अन्नपचनाचा त्रास असेल, करपट ढेकर येत असतील, आपले दात कितीही स्वच्छ असुद्या तरी सुद्धा अशा लोकांच्या तोंडाचा घाण वास येतो.
healthline.com
आपल्या तोंडाच आणि पोटाचं आरोग्य चांगलं असेल तर वास आपोआपच बंद होईल. तर मित्रांनो आज जो आपण उपाय करतोय त्यासाठी आपल्याला तुळशीची पाने लागणार आहेत. मित्रांनो जेवण झाल्यानंतर केवळ २ ते  ३ तुळशीची पान घ्यायची आहेत. त्यानंतर ती स्वच्छ धुवून हि पाने सावकाश चघळत चघळत खायची आहेत.

मित्रांनो पहिल्याच दिवशी तुम्हाला दिसून येईल कि अगदी एका मिनिटांत तुमच्या तुमच्या तोंडाचा वास कमी झालाय. जर तुम्ही दररोज हा उपाय करू लागलात तर मित्रांनो तुम्हाला दिसेल कि काही दिवसातच तुमच्या तोंडाचा जो वास येत होता तो येणं बंद झालंय. 
मित्रांनो तोंडाचा वास घालवण्यासाठी हा एक अत्यंत चांगला उपाय आहे. आपण हा उपाय एकदा नक्की करून पहा. तसेच हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. 
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *