शुक्रवारी तुमच्या पाकिटात ठेवा 9 पैकी 1 वस्तू; लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील.!

शुक्रवारी तुमच्या पाकिटात ठेवा 9 पैकी 1 वस्तू; लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येकाला आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असावी असे वाटते तसेच आपल्याला कधीच काही कमी नसावे असे वाटत असते परंतु लक्ष्मी ही चंचल स्वभावाची मानली गेली आहे. ती एकाच ठिकाणी जास्त काळ टिकत नाही परंतु मानले जाते की काही उपायाने मात्र माता लक्ष्मीचा वास तसेच जास्त काळ घरांमध्ये राहतो. आपल्याकडे दररोज खूप पैसा येतो परंतु दुसर्‍या दिवशी त्यातील काही शिल्लक राहत नाही. खूप कष्ट केले, पैसा आला तरी पण धन टिकत नाही.

सकाळी पैशांनी भरलेले पाकीट रात्री रिकामे होते. पैसा टिकत नाही अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी अथवा कोणत्याही शुभ दिवशी तुमच्या पाकिटामध्ये या नऊ पैकी एक वस्तू माता लक्ष्मी चे मनोभावे स्मरण करून ठेवायची आहे त्यामुळे शास्त्रानुसार मानले जाते की तुमच्या इथे जे धन आहे ते वाढू लागते आणि जे धन आहे ते कमी होत नाही. तसेच धनाचे मार्ग हे सापडू लागतात, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो हा तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे परंतु लक्षात ठेवा की माता लक्ष्मी चा फोटो कमळावर बसलेले स्वरूपामध्ये फोटो ठेवायचा आहे. उभे असलेल्या लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा नाही.उभे असलेल्या मातेचा फोटो ठेवल्याने मानले जाते की तुमच्या पैशांची कमी होत जाते तसेच बसलेल्या माता लक्ष्मीचा फोटो यामुळे पैशाची आवक वाढते तसेच तुमच्यावर सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते तसेच दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पिंपळाचे पान. शास्त्रांमध्ये, हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते.

या पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या पाकिटामध्ये पिंपळाचे पान ठेवले तर असे शुभ मानले जाते की लक्ष्मीकृपा प्राप्त होऊन आर्थिक लाभ होतात टिकून राहते. हे पान शुभमुहूर्तावर अभिमंत्रित करून आपल्याला ठेवायचे आहे.नंतर ची वस्तू आहे लाल रंगाचा कागद. त्या लाल रंगाच्या कागदावर आपल्या ला ओम श्रीम लिहायचे आहे आणि हा कागद आपल्याला पाकीट मध्ये ठेवायचा आहे त्यामुळे लक्ष्मी कृपेने आपल्या हातात नेहमी पैसा येत राहतो त्यानंतर ची वस्तू म्हणजे तांदूळ.

आपण नेहमी तांदूळ घरात आणत असतो. तांदुळ ला आपल्या धर्मात शुभ मानले गेले आहे त्यामुळे पैसा टिकतो आणि माता लक्षी आपल्या इथं टिकून राहते त्यामुळे पाकिटात एक चिमूट केवळ 21 तांदळाचे दाणे आपल्या पाकिटामध्ये शुभ दिवशी ठेवायचे आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पाकीटा मध्ये एक छोटासा आरसा ठेवल्यास शुभ मानले जाते.

धन यामुळे वाढते आणि पैशाची कमतरता राहत नाही. धन संबधित अडचणी दूर होतात तसेच लक्ष्मीची कृपा प्राप्त होते किंवा आपण पाकिटामध्ये गोमती चक्र देखील ठेवू शकतात. त्यानंतर ची महत्त्वाची वस्तू आहे म्हणजे चांदीचा शिक्का.हा शिक्का आपण पाकीटा मध्ये ठेवत असताना आधी आपण शुभ दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी समोर त्याचे पूजन करायचे.

महालक्ष्मीचे मनोभावे पूजन करायचे आहे .महालक्ष्मी नमन करून नंतर तो आपला चांदीचा शिक्का आपल्या पाकीटा मध्ये आहे.त्यांनतर ची वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे. आपल्याला धन पैसा वाढवण्यासाठी रुद्राक्ष मदत करणार आहे. आपल्याला मिळालेले पैसे किंवा आपण लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहतील तसेच आपण आपल्या पाकीट मध्ये चुरगळलेले पैसे ठेवायचे नाही त्यामुळे लक्ष्मीची अवकृपा होते तसेच पैसे कमी होतात त्यामुळे आपल्या धनाची कमी पडत असते तसेच धनाची मार्गदेखील आटतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *