प्रत्येक शुक्रवारी नक्की करा हे काम; महालक्ष्मी घरात आल्याशिवाय राहणार नाही.!

प्रत्येक शुक्रवारी नक्की करा हे काम; महालक्ष्मी घरात आल्याशिवाय राहणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांंनो अनेक लोकांवर आयुष्यात खूप संकटे येतात घरी पैसा नसतो अशांती सगळी कडे पसरलेली असते. सगळ्या गोष्टीत अपयश हाती लागते. मात्र आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर तीन शुक्रवार हा उपाय करा मग बघा तुमचे आयुष्य कसे बदलून जाईल. मित्रांनो आपल्या सगळ्या देवी देवतां मध्ये माता लक्ष्मीचे एक वेगळे स्थान आहे माता लक्ष्मी ला देवी देवतांमध्ये धनाची देवता म्हणून संबोधले जाते.

ज्या माणसा वर माता लक्ष्मीची कृपा बरसते तो माणूस कोणत्याच गोष्टीत अपयशी ठरत नाही जर हतात पैसा असेल तर तो कोणत्या ही कार्याला मागे सरत नाही. प्रत्येक देवी देवतांचे आपले आपले एक वेगळे महत्व आहे. देवी माता लक्ष्मी जर आपल्या वर प्रसन्न असेल तर आपल्या आयुष्यात धन, यश, किर्ती प्राप्त होते मात्र जर आपल्याला माता लक्ष्मीचा आशिर्वाद हवा असेल तर आपल्याला आधी श्री हरी विष्णूंना प्रसन्न करुन घ्यावे लागेल.

जिथे श्री हरी विष्णू तिथेच माता लक्ष्मी मित्रांनो आम्ही आज आमच्या लेखा द्वारे जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत तो तुम्हाला पुर्ण श्रध्दा भावनेने करायचा आहे. हा उपाय तुम्ही मनापासून केलात तर तुमचे दिवस क्षणात बदलून जातील घरात पैसा येण्यास सुरवात येईल दु:खाचे डोंगर सरून जातिल व सुखाची सकाळ होईल. व्यापारात व कामात सगळ्याच ठिकाणी तुम्हाला यश प्राप्ती होण्यास सुरवात होईल. काय आहे नक्की हा उपाय चला तर पाहूया.

मित्रांनो जिथे मनात शंका आली तिथे हा उपाय होणे शक्य नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनात श्रद्धा व सकारात्मक भावना ठेवणे गरजेचे आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्या ही महिन्याच्या शुक्रवारी उठू शकता. हा उपाय करताना तुम्हाला सकाळी ब्रह्म मुहूर्ताला उठावे लागेल होय ब्रह्म मुहूर्त म्हणजे सकाळी चार ते सहा चा काळ.

या वेळात सकाळी सगळी कडेच शांतत असते. माणसाचे डोके व मन या वेळात शांत असते म्हणून हा काळ आपल्या या उपयासाठी अत्यंत योग्य आहे. पहाटे लवकर उठून तुम्ही तुमच्या घराच्या शेजारी कुंड अथवा नदीवर जाऊन स्नान करु शकता जर नदीवर जाऊन स्नान करणे हे शक्य नसेल किंवा शेजारी नदी किंवा तलाव नसेल तर तुम्ही घरी देखील स्नान करु शकता. या नंतर देवी माता लक्ष्मीच्या समोर बसून तिची पूजा करावी तिच्या समोर शुद्ध तूपाचा दिवा लावला व देवी आईला प्रसन्न करणारा मंत्र ओम श्री श्रीये नमः हा मंत्राचा 108 वेळा जप करावा. या उपाय सकाळी आठ वाजण्यापूर्वी करावा. या मंत्राचे उच्चारण करुन झाल्यास आपल्या दैनंदिन कामाला तुम्ही सुरवात करु शकता.

मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठून स्नान करुन पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. हे कपडे तुम्ही फक्त शुक्रवारच्या दिवशी घाला कारण पिवळा रंग हा जगत पिता श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहे. नंतर माता लक्ष्मीचा ओम श्री श्रीये नमः या मंत्राचा जाप 108 वेळा करावा या मंत्राचा जाप करताना तुम्ही नेहमी तुमच्या उजव्या हातात चांदीची अंगठी परिधान करावी.

माता आईला या पूजे नंतर शीर्याचा प्रसाद अर्पण करावा. नंतर एखाद्या गरीब व गरजू व्यक्तीला थोडे से गहू व थोडे से तांदूळ दान करावेत हा उपाय तुम्ही जर तीन शुक्रवार केलात तर तुमचे दिवस बदलण्यास वेळ लागणार नाही. माता लक्ष्मी व श्री हरी विष्णू तुमच्यावर अति प्रसन्न होतील व तुमच्या आयुष्यातील सर्व दु:ख व त्रास दूर करतील. तुमच्या घरात धन-धान्य व वैभव नांदू लागेल. घरात शांती व आपसातले मतभेद कमी होवून सगळे गुण्या गोविंदाने राहू लागतील. हा मंत्र मनापासून श्रद्धा भावनेने करा माता लक्ष्मीचे वास्तव्य तुमच्या आयुष्यात मिळवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *