फक्त पाय जमिनीवर ठेवा असे श्री स्वामी समर्थ महाराज लोकांना सांगतात

फक्त पाय जमिनीवर ठेवा असे श्री स्वामी समर्थ महाराज लोकांना सांगतात

नमस्कार मित्रांनो,

आपल्याला जर थोडेसे यश मिळाले तर आपण हुरळून जातो. जे आपल्यापेक्षा मागे आहेत त्यांना कमी समजतो, त्यांची चेष्टा करतो, थोड्याश्या यशाने आपण हवेत उडायला लागतो. प्रगती खूप करावी, यशाची उंच शिखरे गाठवित, आभाळाला स्पर्श करावा परंतु आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवावेत.

आपण कितीही मोठे झालो, कितीही यश मिळाले तरीही आपली पूर्वस्थिती विसरू नये. आपण जमिनीपासूनच वर आलेलो आहोत याचे नेहमी भान ठेवावे.कुणाची बरी वाईट, आर्थिक स्थिती, रंगरूप, शारीरिक रंग अथवा राहणीमानाची, खाण्यापिण्याची किंवा त्यांच्या गरिबीची मुलाबाळांची अथवा ते वापरत असलेल्या साध्यासुध्या कपड्यांचे चुकूनही चेष्टा करू नये.

प्रत्येकजण आपल्या आपल्या पूर्वजन्माच्या पाप पुण्याच्या प्रारब्धानुसार बरे वाईट जीवन जगत असतो. आपल्याहून हुशार, दिसायला देखणे, बुद्धिमान, श्रीमंत, नीतिमान, कर्तव्यतत्पर तसेच सुख समृद्धीत लोळत असलेले अनेकजण असू शकतात.

त्याच्या उलट अनेक प्रकारे दुःखी जीवन हे अनेकांच्या वाट्याला आलेले असते. पूर्व कर्मानुसार ते आपले जीवन जगत असतात. अंधारा मागून दिवस व दिवसानंतर रात्र हा निसर्गाचा नियम आहे. त्याचे उल्लंघन करू नका. कर्मगती देवादिकांना सहज कुणालाही चुकलेली नाही.

एखाद्या खेळात अथवा कलेत, संगीतात प्राविण्य मिळाले एखादा पुरस्कार अथवा सर्टिफिकेट मिळाले 4 लोकात वाह वाह सुरू झाली, नोकरीत योग्यता नसताना वरची पोस्ट मिळाली की, अनेक जण हवेत तरंगू लागतात. आज जे गर्व करतात, उन्मत्तपणाने अथवा गुर्मीने वागतात, कृतज्ञतेची जाण ठेवत नाहीत त्यांनी आपल्या पुढे काय होणार आहे याचा अंदाज घ्यावा.

पन्नास पन्नास साठ साठ लाखाच्या गाडीने फिरत असाल, पण तुमच्या पडत्या काळात साथ दिलेल्या सायकलला विसरू नका. नोकरीवर जातेवेळी पाया पडून आ शि र्वा द घेतलेल्या व्यक्तींचा मान ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारे उत्तुंग शिखरावर जाल पण त्यांचा अपमान झाल्यास त्यांच्या शापाने रसातळाला जाईल हे कायम लक्षात ठेवा.

एखादी मुंगी चावली तर कळा येतात. पण त्या मुंगीचे नांगी आपण पकडू शकत नाही त्यामुळे कुणालाही कमी लेखू नका. प्र त्ये क जण आपापल्या परीने श्रेष्ठ असतो पण सर्वज्ञही नसतो हे विसरु नका. मुले आपल्या नोकरीवर असलेले आई-बाबा इतरांना कस्पटासमान लेखतात.

तुमच्या मुलांचे अजुन कशात काही नाही मुले काय करतात असे ते टोचून विचारतात. पण आपले हायफाय मुले अथवा मुली बाहेर काय गुण उधळतात हे सांगत नाहीत. पुढील जन्मात त्याचे फळ त्यांना भोगावे लागते. मुले हुशार असूनही आर्थिक दुर्बलतेमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत हे ते विसरतात.

पूर्वीच्या काळातील मोठमोठे संस्थाने, जमीनदार, राजे राजवाडे यांच्यापुढील पिढीची आजची स्थिती कशी आहे ते पहा. कलयुगात जे कराल ते याच जन्मात भोगाल, पापे वाढतील म्हणजे चांगले कराल त्याचे फळही त्वरित मिळेल. असा महाभारत कालीन श्री कृष्णांनी सांगितलेले आहे.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *