फक्त एकदा असे उलटे स्वस्तिक काढून पहा; मग उघड्या डोळ्यांनी चमत्कार पहा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्वस्तिक हे हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. या स्वस्तिक चा वापर केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये देखील केला जातो. स्वस्तिक हे चिन्ह अतिशय शुभ मानले जाते. हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे,या चिन्हाचा अर्थ असा होतो की कल्याण असो ,ज्या ज्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते त्या त्या ठिकाणास कल्याण असो त्या ठिकाणी जे लोक राहतात त्या सर्वांचे कल्याण असो. असा या स्वस्तिक चा अर्थ आहे.
अशी मान्यता आहे की स्वस्तिक मध्ये सूर्य इंद्र वायू ,पृथ्वी, लक्ष्मी ,विष्णू ,ब्रह्मदेव ,शिवपार्वती तसेच श्री गणेश अशा अनेक देवतांचा वास असतो. शांती समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक म्हणजे हे स्वस्तिक चिन्ह. कोणतीही पूजा करताना सर्वात प्रथम स्वस्तिक काढण्याचा मान या चिन्हाचा आहे. स्वस्तिक म्हणजे धनाचे द्योतक आहे. स्वस्तिकाचे चार बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या आहेत.
हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार बाहू आहेत. हे भगवान श्री विष्णूंचे चार हात असून ते चारही दिशांना पालन आणि रक्षण करतात. आज आम्ही आपणास सांगणार आहोत की हे स्वस्तिक चिन्ह आपण कोणत्या ठिकाणी काढावे जेणेकरून आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांशा आहेत त्या सर्व पूर्ण होतील.
जर आपण एका विशिष्ट प्रकारे हे स्वस्तिक चिन्ह एखाद्या विशिष्ट ठिकाणी काढले. स्वस्तिक जो मध्यबिंदू असतो ते श्रीविष्णू यांचे नाभी मंडळ असते आणि या ठिकाणी हळद-कुंकू वाहून त्यांना नामस्मरण व मान देत असतो. या ठिकाणी कमळातून ब्रह्मदेव यांची उत्पत्ती झाली होती. जर आपण आपल्या देवघरासमोर स्वस्तिक काढले तर आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने देवघरासमोर स्वस्तिक काढले तर हिंदू धर्मशास्त्रानुसार असे मानण्यात आले आहे की त्या स्त्रीला भविष्यात वैधत्वचे भय राहात नाही.
याचा अर्थ म्हणजे ती त्या स्त्रीला सदैव सौभाग्यवती राहण्याचे आशीर्वाद प्राप्त होत असते. तिच्या पतीचा मृत्यू पासून नेहमी संरक्षण होत असते आणि म्हणूनच आपल्या देवघरासमोर स्त्रीने स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते. स्वस्तिक काढत असताना सुद्धा आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वास्तिक काढताना कधीही वेडेवाकडे काढू नये स्वस्तिक हे सरळ आणि व्यवस्थित असायला हवे.
स्वस्तिक कारखाना ते सुंदर सुद्धा दिसायला हवे व त्यानंतर ती दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढणार आहोत ती जागा स्वच्छ व सुंदर असायला हवी. तेथे कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसावी अशा जागेवर कोणत्याही प्रकारची घाण कचरा अडगळ वस्तू ठेवू नये आणि स्वच्छ ठिकाणीच आपल्याला स्वास्तिक नेहमी काढायचे आहे.
जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचण येत असेल तर अशा वेळी देव्हाऱ्यासमोर म्हणजेच देवघरासमोर हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. असे केल्याने आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी पूर्णपणे दूर होणार आहेत. जर आपल्याला आपली एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर ती इच्छा पण दोन मार्गांनी पूर्ण करू शकतो त्यातील पहिली म्हणजे आपल्या देवघरासमोर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतरची दुसरी पद्धत म्हणजे आपण एखाद्या मंदिरा मध्ये जाऊन तेथे आपल्याला उलटे स्वास्तिक काढायचे आहे.
असे केल्याने आपली इच्छा पूर्णपणे पूर्ण होते म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रामध्ये स्वस्तिक हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी मंगल कार्य असते त्या ठिकाणी स्वस्तिक अवश्य काढायला हवे. त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंबरठा असतो अशा ठिकाणीसुद्धा स्वस्तिक अवश्य काढायला हवे कारण की स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि घरातील सकारात्मक वातावरणमुळे घरातील सदस्यांना सुद्धा चांगले आरोग्य प्राप्त होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.