5 मिनिटांत आळस, कंटाळा सोडून कामाला लागाल; एकदा हा भागवत गीता संदेश नक्की वाचा.!

5 मिनिटांत आळस, कंटाळा सोडून कामाला लागाल; एकदा हा भागवत गीता संदेश नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भगवद्गीता तर सर्वांनाच माहितच आहे. भगवत गीता हा धर्मग्रंथ आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अनेक उपदेश केलेले आहेत. हे उपदेश फक्त श्री अर्जुन यांच्यासाठी होता का? तर नाही.. भगवद्गीतेमध्ये जो काही उपदेश सांगिलेला आहे तो समस्त मानवजातीसाठी सांगण्यात आलेला आहे. मानव जातीचे कल्याण कोणत्या गोष्टी मध्ये आहे याबद्दल आपल्याला सांगण्यात आलेले आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण यांनी संपूर्ण मानव जातीला मार्गदर्शन केलेले आहे.

जर आपण विचार केला तर सर्वात जास्त उत्साह देणारे भाषण म्हणजे भगवद्गीता होय व साहित्य म्हटले तरी भगवद्गीता आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलेला उपदेश संपूर्ण मानव जाती ला उद्देशून करण्यात आलेला आहे. मग तो व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असू द्या निरक्षर, साक्षर असू द्या असा कोणताही भेदभाव न मानता श्री कृष्ण यांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी असे अनेक उपदेश सांगितले आहेत.

जेव्हा अर्जुन युद्ध भूमी मध्ये त्याच्या नातलगान विरुद्ध लढत होता तेव्हा त्याच्या अंगावर काटा आला होता तेव्हा श्री कृष्ण यांना विनंती केली होती की मी हे युद्ध करू शकत नाही कारण की या रणभूमी मध्ये उभे असलेले सगळे माझे नातेवाईक आहेत आणि माझ्यासाठी यांच्यासोबत जिंकून सुद्धा मी हरणार आहे आणि असाही हरणार आहे त्याचप्रमाणे आपण सगळे जण आपल्या जीवनामध्ये कोणते ना कोणते युद्ध लढत असतो आणि या युद्धामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो.

एखादे कार्य करण्यासाठी आपण त्याचे नियोजन करत असतो.नियोजन करण्यासाठी खूप सारी तयारी करत असतो परंतु हे सगळे करणे म्हणजे कार्य नव्हे तर कार्य म्हणजे एखादी हाती घेतलेले कार्य मन लावून पूर्ण करणे म्हणजेच कार्य होय. अर्जुनचे संभ्रावस्थेमधील वागणे पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तुझे असे वागणे योग्य नाही. तुझ्या हृदयातील हा त्रास तू अजिबात काढून घे. तुला लढायचे आहे.

तुझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो काढून टाक. तुला हे युद्ध करणे गरजेचे आहे कारण की तुला हे कार्य पूर्ण करायचे आहे. आपल्यापैकी अनेकजण असे आहेत की ते कोणतेही कार्य करत नाही परंतु ते कार्य करण्याआधी वेगवेगळे अर्थ लावत असतात आणि कामचुकारपणा करत असतात. कोणतेही कार्य करायला गेले तर त्यामध्ये अनेक चुका व्यक्त करत असतात.

हे अत्यंत वाईट गोष्टी आहेत असे श्रीकृष्ण म्हणतात. आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीच्या जीवनामध्ये आळस हा अत्यंत वाईट आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि आळस केल्यामुळेच मानवाच्या जीवनामध्ये अनेक संकटे निर्माण होत असतात. जर तुम्हाला आळस करायचा असेल तरच आळसाचा आळस करायला हवा. आज केल्याने आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य निर्माण होत असते म्हणूनच आळस झटकून आपल्याला नव्याने काम करायला उभे राहायला हवे.

आपण अशा पद्धतीने काम करायला हवे की ज्यामुळे समोरच्या व्यक्तीने सुद्धा म्हणायला हवे की काय कार्य करत आहे. कधी न थकता मेहनतीने प्रयत्न करायला हवे. आणि असे केल्यानेच आपल्याला यश प्राप्त होईल म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सुद्धा उपदेश केला होता की तू कामचुकारपणा न करता तुझे कार्य व्यवस्थित रित्या पार कर.

फळाची अपेक्षा करू नको परंतु तुझे कार्य व्यवस्थित आणि प्रामाणिक पणे पुढे सुरू ठेव यातच तुझे भले आहे अन्यथा कामातून पळून जाणे हे तुझ्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही. पाच हजार वर्षांपूर्वी केलेला हा उद्देश आजही तेवढाच सार्थकी होतो म्हणून आपल्याला कोणत्याही कार्यांमध्ये यश प्राप्त करायचे असेल तर भरपूर मेहनत करायला हवी तरच आपल्याला यश प्राप्त होऊ शकते अन्यथा आपल्याला भविष्यात यश कधीच मिळणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *