एका देवघरात दोन शंख असावेत की नाही?
नमस्कार मित्रांनो,
देवपूजेत शंख आणि घंटा असणे ही अत्यावश्यक बाब समजली जाते. काही ठिकाणी गव्याचे शिंगही ठेवले जाते शंखोदकात औषधी गुणधर्म असतात. वास्तविक देवाचा अंगावर समर्पण करावयाचे शंखोदक हे रात्रभर त्या शंखात ठेवलेले असावे. पण हा औषधी गुणधर्म बऱ्याचदा कुणाला माहीतच नसतो.
पुजा करण्यापुर्वी शंख धुऊन पुसून तो भरण्यात येतो आणि त्याची पूजा करून त्यात कलशोधक मिसळून ते पूजाद्रव्य आपल्यावर शिंपडले जाते. नंतर देवांच्या मूर्तींना स्नान घालताना तो शंख पात्रात बुडून कधीही पाणी त्यात भरू नये असा शास्त्रदंडक आहे.
कारण त्यामुळे शंख बुडवलेले पाणी सुरा तानाप्रमाणे ठरते. म्हणून शंखात पात्राने वरून पाणी घालून तो शंख भरावा आणि देवांना शंखोदक अर्पण करावे. देवांच्या मूर्तींमध्ये पंचायतनाची स्थापना असेल तर त्यातील मानलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही. पण महादेवाची पिंड असेल तर तिला शंखोदकाने स्नान घालू नये.
एकाच देवघरात 2 शंख ठेवू नयेत. पण उजवा शंख शंखोदकासाठी आणि डावा शंख ध्वनीसाठी ठेवायचा झाल्यास ते वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवावेत. शंखास अक्षदा वाहू नये. फक्त गंध, तुळशीपत्र किंवा गंधपुष्प अर्पण करावे. मित्रांनो शंखाचे पौराणिक आणि ऐतिहासिक सुद्धा खूप महत्त्व आहे.
महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांजवळ पांचजन्य शंख होता, तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा शंख होता. युधिष्ठराजवळ अनंतविजय, नकुलाकडे सुघोष आणि सहदेवाकडे मनीपुष्पक शंख होता.
यापैकी एका शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायायची. भारताच्या पुरातन इतिहास कालात शंख हे एक राष्ट्रीय नाद वाद्य होते. मांगल्याचे प्रतीक होते. आपल्याकडील रत्न शास्त्रात तिखट गुलाबी रंगनी गोलसर स्वच्छ चकचकीत सुंदर शंख हा रत्न मानतात.
उजवा शंख आणि डावा शंख असे शंखात प्रकार आहेत. ते उजवीकडे आणि डावीकडे वळलेली असतात म्हणून त्यांना तसं म्हटलं जातं. उजवा शंख दुर्मिळ आणि पुण्यप्रद मानला जातो. मित्रांनो शंखाबद्दल जर तुमच्या मनात अजून काही शंका असेल तर कमेंट करुन आम्हाला नक्की कळवा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.