पुदिन्याची पाने खाल्ल्याने त्यापासून होणारे फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्वयंपाक घरातील अन्नपदार्थांना चव यावी याकरता आपण अनेक वेळा पुदिन्याची पाणी वापरत असतो. पुदिन्याची पाने जरी आकाराने लहान असलेले त्याचबरोबर तुळशी सारखी दिसत असली तरी रंगाने मात्र अधिक हिरवी असतात. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पुदिनाचे अनेक महत्त्व सांगण्यात आलेले आहेत.
त्या सर्व पुदिन्याच्या अंगी कफनाशक ,वातनाशक , पित्तनाशक, उष्णता नाशक, शीतलता प्रदान करणारे असे अनेक गुणधर्म असतात तसेच पुदिना मध्ये विटामिन सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात.कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस ,लोह ,बी सिक्स या सारखे अनेक विटामिन्स उपलब्ध असतात. ज्या घरांमध्ये पुदिना नियमित प्रमाणात वापरला जातो त्या घरांमध्ये सर्दी-खोकला-ताप कधीच शिरकाव करत नाही. त्या घरातील सदस्यांना कधीच वायरल इन्फेक्शन होत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण पुदिना बद्दल एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
प्रत्येकाच्या घरी तुळशी भरपूर प्रमाणामध्ये असतेच त्याचबरोबर पुदिना सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असायला हवा. जर आपल्याला उलटी, आम्लपित्त, मळमळ होत असेल तर अशा वेळी पुदिन्याचे पान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. लहान मुलांना पोटामध्ये कृमी झाले असल्यास अशा वेळी पुदिन्याच्या पानाचा रस दिवसभरातून दोन वेळा प्यावा असे केल्याने मुलांच्या पोटातील कृमी पूर्णपणे निघून जातात.
जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर अशा वेळी पुदिन्याचा रस व आल्याचा रस यामध्ये काळे मीठ तसेच दालचिनी मिक्स करून जर आपण हे मिश्रण प्यायले तर आपले पोट दुखी शंभर टक्के दूर होऊन जाते. जर आपल्याला भूक लागत नसेल तर अशा वेळी या पानांचा काढा जर प्यायला तर आपली पचन संस्था चांगल्या पद्धतीने कार्य करू लागते व आपली भूक सुद्धा सुधारते.
जर तुम्हाला ताप आलेला आहे ताप कमी होण्याचे नाव घेत नसेल तर अशावेळी पुदिन्याच्या पानाचा काढा प्यायल्याने आपला आता पूर्णपणे बरा होतो त्याचबरोबर वातावरणातील बदलामुळे अनेकदा आपले नाक चुरचुरीत असते अशावेळी जर आपण यांच्या पानांचा रस दोन थेंब नाकामध्ये टाकल्यास आपले नाक पुर्णपणे बरी होऊन जाते आणि सर्दी सुद्धा उद्भवत नाही. आपल्यापैकी अनेकांना डोकेदुखीची समस्या उद्भवत असते.
डोळ्यांना खाज सुटली असते अशावेळी आपण दिवसभरातून एकदा जरी पुदिन्याच्या पानाचा रस प्यायला तर आपल्याला फरक पडतो कारण की पुदिन्याच्या पाण्यामध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणात मध्ये उपलब्ध असतात विटामिन हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते त्याचबरोबर जर तुम्हाला खाज, खरुज ,गचकरण नायटा असेल तर अशा वेळी आपण याच्या पानांचा रस आपल्या त्वचेवर लावला तर खाज पासून व अन्य त्वचाविकार पासून आपल्याला लवकर सुटका मिळते.
आणि अनेकजण दाताच्या समस्येमुळे त्रस्त झालेली असतात. अनेक उपाय करून सुद्धा दात दुखी काही थांबायचे नाव घेत नाही अशा वेळी जर आपण दिवसभरातून एकदा पुदिन्याची पाने चावून चावून खाल्ले तर आपल्या हिरड्या सुद्धा मजबूत होतात व दाताला लागलेली कीड सुद्धा निघून जाते.
जर आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असतील तर अशा वेळी आपण या पानांचा रस चेहऱ्यावर लावला तर काही दिवसांमध्येच आपली त्वचा चमकु लागते व चेहऱ्यावरचे काळे डाग पडलेले आहेत ते सुद्धा निघून जाण्यास मदत होते म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पुदिना असणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या जिभेला चव पुरवण्यासाठी पुदिना महत्त्वाची भूमिका बजावत असतोच पण त्याचबरोबर नियमितपणे स्वयंपाकामध्ये पुदिन्याचा वापर केल्याने आपले आरोग्य चांगले राहते अशा प्रकारे अनेक औषधी गुणधर्म असलेल्या पुदिना आपल्या आहारामध्ये अवश्य समाविष्ट करा आणि आपल्या आरोग्य जपा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.