1 तुकडा सकाळी किंवा झोपताना खा; सकाळी पोट झटक्यात साफ, शरीरात पोषण तत्वाची कधीच कमी भासणार नाही.!

1 तुकडा सकाळी किंवा झोपताना खा; सकाळी पोट झटक्यात साफ, शरीरात पोषण तत्वाची कधीच कमी भासणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी आपल्याला चांगले इंजिनाची गरज असते त्याचप्रमाणे आपले शरीर नितांत व आरोग्यदायी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील जी अवयव आहेत त्यांचे चांगले राहणे आतिशय गरजेचा आहे. त्यांची कार्यशक्ती उत्तम असायला हवी तरच आपल्या शरीराचे कार्य उत्तम रित्या पार पडू शकेल. म्हणूनच आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व गरजेचे असतात. त्या पोषक तत्वांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला तर आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर होऊन आपले शरीर सुरळीतपणे कार्य करू लागते.

म्हणूनच काही पोषक तत्वांचे आपल्याला शरीराला आवश्यक गरज असते या लेखांमध्ये आपण अशी काही पोषकतत्व जाणून घेणार आहोत. त्या पोषक तत्वाच्या म्हणजेच पदार्थाचे सहाय्याने आपण आपल्या शरीरामध्ये उर्जा निर्माण करणार आहोत. हा पदार्थ दिवसभरातून एकदा जरी खाल्ल्या तरी आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दिसणार नाही. आपले रक्त चांगले राहणार आहे. आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा कधीच येणार नाही. नेहमी तुम्हाला ताजेतवाने वाटणार आहे.

त्याचबरोबर या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निघून जाणार आहे. या पदार्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असल्यामुळे आपले हाड मजबूत बनणार आहेत. तसेच हा पदार्थ बनवण्यासाठी शेंगदाण्याचा वापर केला गेल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर पित्ताचा त्रास सुद्धा नष्ट होतो तसेच या पदार्थाचे सेवन केल्याने मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुद्धा चांगले राहते. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला घरातलं काही वस्तूंचा वापर करायचा आहे ,त्या पदार्थाचे नाव आहे चिकी.

चिकी आपल्या सर्वांना आवडत असते त्यासाठी जे काही पदार्थ वापरतो ते आपल्याला घरामध्ये सहज उपलब्ध होत असतात. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला गुळ, शेंगदाणे, डाळ, काजू ,बदाम इत्यादी पदार्थ घ्यायचे आहेत. हे सगळे पदार्थ तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गुळ मिक्स करायचा आहे.

त्यानंतर गुळ्याचा पाक तयार झाल्यानंतर वरील सर्व पदार्थ आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर हे पदार्थ एका सपाट वस्तूवर तूप लावून व्यवस्थित रित्या टाकायचे आहे आणि त्यानंतर थोडे थंड झाल्यावर त्याचे तुकडे करायचे आहे जेणेकरून त्यांना चिक्की सारखा आकार प्राप्त होईल. हा जो पदार्थ आहे तो आपल्या शरीरात उत्तम मानला जातो कारण की यामध्ये वापरण्यात आलेली पदार्थ शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा देत असतात.

आपण या पदार्थांमध्ये वापरलेला गूळ हा शरीरामधील ऊर्जा तसेच शहरातील विविध आजार दूर करण्यासाठी वापरला जातो. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे त्याचबरोबर शेंगदाणे हे गरीबाची बदाम मान्य केलेले आहे यामुळे आपले पोट सुद्धा स्वच्छ होते त्याचबरोबर काजू बदाम हे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात आणि चण्याची डाळ आपल्या पोटातील गॅस कमी करण्यासाठी मदत करत असते.

म्हणूनच सर्व युक्त अंगाने उपयुक्त असणारा असा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे ,जो आपण दिवसातून एक जरी तुकडा खाल्ला तरी आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी प्राप्त होत असते आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगले बनते असा हा महत्त्वाचा उपाय आहे घरच्या घरी होणारा तर अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *