केळीच्या पानावर जेवण्याचे चमत्कारिक फायदे वाचून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धती आहेत. या परंपरेने आपल्या स्वास्थ्याला खूप लाभ मिळतो. तर आज आपण या परंपरेशी निगडित असलेल्या काही गोष्टी पाहणार आहोत.
मित्रांनो केळीला पवित्र आणि पूज्य झाड मानले जाते. केळीच्या पानापासून मंडप देखील बनवले जातात. भगवान सत्यनारायणाच्या पूजेमध्ये या पानांचे विशेष महत्व असते. वस्तू शास्त्रानुसार केळीच्या पानांमुळे घरातील अनेक दोष दूर होऊ शकतात. या केळीच्या पानावर गरम जेवण वाढले जाते. त्यामुळे पानांवर असलेले पोषक तत्व जेवणावर उतरतात. हे तत्व स्वास्थ्याला लाभदायक असतात.
रोज केळीच्या पानावर जेवण केल्याने केस मजबूत होतात तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स देखील कमी होतात. पोटाशी संबंधित देखील सर्व आजार दूर होण्यास मदत होते. केळीच्या पानामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात जे आपल्याला पालेभाज्या मधून देखील मिळतात.
प्लास्टिक च्या भांड्यांमध्ये ठेवलेले अन्न आपल्या स्वास्थ्यासाठी चांगले नसते. तसेच धातूंच्या भांड्यांची स्वछता करण्यासाठी देखील साबणासारख्या केमिकल चा उपयोग जातो. हे केमिकल्स देखील आपल्या स्वास्थ्याला हानिकारक असते. त्यामुळे शक्य असल्यास रोज केळीच्या पानावर जेवण करावे. यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे कमी जावं लागेल आणि तुमचं आरोग्य उत्तम राहील.
तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला नक्कीच विसरू नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.