फक्त दुधासोबत दोन चमचे हा पदार्थ सेवन करा; मायग्रेन, डोकेदुखी, सायनस डोळ्यांची कमजोरी होईल लवकरच दूर.!

फक्त दुधासोबत दोन चमचे हा पदार्थ सेवन करा; मायग्रेन, डोकेदुखी, सायनस डोळ्यांची कमजोरी होईल लवकरच दूर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण एक आगळावेगळा उपाय जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना डोकेदुखी, डोळ्यांची कमजोरी,यासारखे अनेक समस्या उद्भवत असतात आणि या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय योजना सुद्धा करतो परंतु आपल्याला या सगळ्या उपायांचे फारसे काही फरक जाणवत नाही.

अशा वेळी आपण चिंता व्यक्त करत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय जाणून घेणार आहोत तो अत्यंत प्रभावी व गुणकारी आहे. हा उपाय केल्याने आपल्या हृदयाच्या संबंधित ज्या काही समस्या असतात त्या सुद्धा मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या लेखामधील महत्त्वाचा उपाय..

हा उपाय केल्याने लहान मुलांची स्मरणशक्ती वाढणार आहे त्यांचे अभ्यासामध्ये मन लागणार आहे तसेच ज्या व्यक्तींना ताण तनाव, हाय ब्लडप्रेशर ही समस्या आहे. ज्या लोकांना रात्री झोप लागत नाही, अनिद्रा समस्या सतावत आहे. या सगळ्यांसाठी हा उपाय रामबाण औषध ठरणार आहे. जर डोकेदुखी खूप काळापासून तुम्हाला त्रास देत असेल तर तिचे रूपांतर हळूहळू मायग्रेन मध्ये सुद्धा होऊ लागते आणि मायग्रेन मध्ये आपले डोके कधी उजव्या बाजूला दुखते तर कधी डाव्या बाजूला दुखते तर कधी मध्ये दुखते तर कधी मागे दुखते अश्या वेगवेगळ्या प्रमाणामध्ये सर्व प्रकारांमध्ये डोकेदुखी सतावत असते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला खसखस लागणार आहे.खसखस ला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. जर आपल्याला नेहमी अशक्तपणा वाटत असेल, काही ही काम न करता सुद्धा आपले अंग थकत असेल व आपण भरपूर काम केले अशी भावना जर मनामध्ये येत असेल तर अशावेळी आपल्याला खसखस सेवन अवश्य करायला हवे तसेच खसखस मध्ये ओमेगा फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते.

ज्या लोकांना अनेक अनिद्रा समस्या आहे अशा लोकांनी रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये एक चमचा खसखस टाकून हे मिश्रण सेवन केल्यास शांतपणे आपल्याला झोप लागते. असा उपाय करण्यासाठी आपल्याला गायीचे दूध लागणार आहे. गाईचे दूध नाही मिळाले तर म्हशीचे दूध सुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु जर गायीचे दूध मिळाल्यास अधिक उत्तम ठरते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुकलेले खोबर्‍याची अख्खी बंद वाटी घ्यायची आहे आणि त्या सुकलेल्या बंद खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक आयताकृती आकाराचे छिद्र करायचे आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे खसखस भरायचे आहे व तसेच बदाम सुद्धा टाकायचे आहे त्यानंतर आपण जे छिद्र बनवले आहे ते खोबर्याच्या सहाय्याने बूजवून टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला हे नारळ दुधामध्ये टाकायचे आहे व दूध चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे.

ज्या पद्धतीने दूध आटत जाईल तसे तसे आपला हा उपाय प्रभावी बनत जाईल. बदाम नियमित खाल्ल्याने आपली स्मरण शक्ती चांगले राहते पण त्याच बरोबर डायबेटीस रुग्णांना सुद्धा उपयोगी ठरते. आता आपल्याला नारळ काढून घ्यायचे आहे आणि मधोमध कापून घ्यायचे आहे. जर तुम्ही आतमध्ये कापून बघितले तर बदाम सुद्धा चांगल्या पद्धतीने उकळून गेलेले असतील आणि आता आपल्याला खोबर्‍याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि ती खसखस व बदाम आहेत त्याचे हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक मिश्रण बनवायचे आहे.

हे मिश्रण आपल्याला रात्री झोपताना व दिवसभरातून जसा वेळ मिळेल तसा आपल्याला दुधामध्ये एक चमचा टाकून सेवन करायचे आहे. असे जर आपण नियमितपणे केल्यास आपली डोकेदुखी तर दूर होणार आहे पण त्याचबरोबर कितीही जुना मायग्रेन असेल तर तो पूर्णपणे नष्ट होणार आहे. जर तुम्हाला सुद्धा मायग्रेनचा त्रास असेल भयंकर डोकेदुखी सतावत असेल तर हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *