घरात सुख शांती राहण्यासाठी सलग सहा दिवस जप करा हा मंत्र; घरात नेहमी सुखशांती नांदेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदावी असे जर वाटत असेल तर वरील मंत्राचा सहा दिवस करा. अनेकदा असे होते की घरामध्ये सर्व सुखसुविधा गोष्टी वस्तू पैसा असतो परंतु घरामध्ये समाधान आणि शांतता नसते,अशावेळी मानवाचे मन चलबिचल होऊन जाते. साध्या साध्या गोष्टीवरून घरामध्ये वाद,भांडण,कटकटी होत असतात.
घरातील लोक ,रक्ताचे लोक एकमेकांसोबत शत्रू सारखे सूडाच्या भावनेने वागत असतात.अशावेळी घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी विशेष करून महिलांनी हा मंत्र जप सलग सहा दिवस करायचा आहे. “सर्व मंगल मांगल्या शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते” सहा दिवस या मंत्राचा २८ वेळा जप करायचा आहे आणि सातव्या दिवशी एका लहान कन्येला आपल्या घरी जेवणासाठी बोलवायचे आहे.
त्यानंतर त्या कुमारिकेला एक कापड भेट म्हणून द्यायचे आहे आणि तिच्या कडून कुंकू कपाळी लावून घ्या. या मंत्राचा प्रभाव इतका प्रभावशाली आहे की, तुमच्या घरांमध्ये ज्या काही वाईट नकारात्मक शक्ती असतील,त्या सर्व शक्ती या मंत्राच्या जपाने घराच्या बाहेर जातील. अनेकदा आपला व्यवसाय उत्तम असून सुद्धा घरामध्ये अशांती वाटत असते.
मन समाधान नसते अशावेळी आपण लक्ष्मी सहस्त्र नामाचा जप सुद्धा करू शकतात. या पाठाच्या जपा ने तुमची सर्व दोष नष्ट होतात आणि तुमच्या मनाला शांती लागते त्याच बरोबर ज्या काही वाईट शक्ती मुळे तुमचे नुकसान होणारे असते ते सुद्धा थांबून सगळ्या सकारात्मक गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.