घरात अगरबत्तीचा वापर करताय तर सावधान; कॅ’न्स’रला कारणीभूत ठरू शकते अगरबत्ती.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण भारतीय लोक देवावर खूप आस्था, विश्वास व श्रद्धा ठेवतो आणि पुर्ण मनोभावे देवाची पुजा-अर्चना करतो.आपल्या देशात देवपूजेला विशेष महत्व दिले जाते व प्रत्येक घरात देवपूजा ही केलीच जाते. देवाच्या पूजेसाठी आपण फूले, कपूर, अगरबत्ती, फळे अशी अनेक सामग्री आपण एकत्र करुन देवपूजेसाठी वापरतो.
पण वैद्यानिकांच्या म्हणण्यानुसार, जर आपण या सगळया वस्तू देवपूजेसाठी वापरल्या तर आपण काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्यायला हवी. ही सगळी सामग्री आपण वापरतो ती आपल्या आरोग्यासाठी घातक आहे असे वैद्यनिकांच्या संशोधनात समोर आले आहे. देशभरात अगदी सगळीकडे आपले स्वास्थ्य बिघडवणारी ही वस्तू देवपूजेसाठी वापरली जाते चला तिच्याबद्दल जाणून घेऊया.
आपण नेहमी घरात देवपूजा करताना अगरबत्तीचा वापर करतोच जिचा मनमोहक सुगंध सगळ्यांनाच आवडतो. अगरबत्तीचा प्रयोग सर्वत्र केला जातो.आज आम्ही तुम्हाला अगरबत्तीबद्द्ल काही रोचक गोष्टी सांगणार आहोत त्या ऐकून तुम्ही आश्चर्य चकित व्हाल. अगरबत्ती मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याच संशोधक म्हणतात. तसेच त्यातून येणारा धूर हा वाहने तथा सिगरेटच्या धूरापेक्षा किती तरी पटीने घातक आहे आणि यामुळे तुम्हाला हृदयाचे विकार आणि फुफ्फूसांचे अनेक प्रकारचे इत्यादि आजार होऊ शकतात.
जेव्हा अगरबत्ती पेटवली जाते त्यातून धूराचे अनेक बारीक-बारीक कण निघतात व हवेत मिसळतात आणि शरीरातील अनेक पेशींना नष्ट करतात. अगरबत्तीच्या धुरामध्ये म्युटाजेनीक, जिनोटॉक्सीस तथा साईटोटॉक्सीस नामक विषारी तत्व मिळतात असे एका शोधतून संशोधक म्हणतात आणि हे कैंसरसारख्या उच्च आजाराचे कारण बनू शकतात.
त्याच प्रमाणे डॉक्टर म्हणतात अगरबत्तीचा धूर जेव्हा मानवी शरीरात जातो तेव्हा तो डी.एन.ए. वर खूप वाईट प्रभाव पाडतो आणि त्यासोबतच या धुरमूळे फुफ्फूसांमध्ये जळणे व श्वसनाच्या अनेक समस्या जाणवू शकतात. अगरबत्तीमध्ये 64% कम्पाउण्ड असतो आणि यामुळे त्वचारोग होतात तसेच आपल्या अगरबत्तीमध्ये कृत्रीम सुगंध देणारे अत्र वापरले असेल तर हे तुमच्या आरोग्यासाठी खूपच घातक आहे. अगरबत्तीचा धूर हा खूप धोकादायक असून याचा कमीत कमी उपयोग करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.