ह्या चार वस्तू कधीच कुणाला भेट म्हणून देऊ नका अन्यथा होईल अनर्थ; पछाताप करण्याची वेळ येऊ शकते.!

ह्या चार वस्तू कधीच कुणाला भेट म्हणून देऊ नका अन्यथा होईल अनर्थ; पछाताप करण्याची वेळ येऊ शकते.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण एकमेकांना भेटवस्तू देत असतो. जर आपल्या घरी एखादे शुभ कार्य असेल तर आपण एकमेकांना अनेक वस्तू देत असतो किंवा काही समारंभ असेल तर आपण अनेक वस्तू विकत सुद्धा घेत असतो. प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्याला कोणीतरी गिफ्ट द्यावे काहीतरी सरप्राईज द्यावी. जेव्हा आपण एखाद्याला वस्तू देतो तेव्हा आपण त्या व्यक्तीची आवड निवड या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्याला गिफ्ट देत असतो.

अनेकदा आपण लोकांना भेटवस्तू देत असताना असे अनेक मापदंड ठरवतो म्हणजेच की महिलांना या वस्तू द्यायची असतात ,पुरुषांना या वस्तू द्यायच्या, लहान मुलांसाठी या वस्तू भेट म्हणून द्यायचा असे अनेक प्रकारचे विचार आपण आधीच करून ठेवतो. अनेकदा आपण एखादी वस्तू समोरच्या व्यक्तीला भेट म्हणून देतो तेव्हा अनेकदा न कळत नकळत काही चुका करून घेतो जेव्हा आपण अशी आपल्या जवळची एखादी वस्तू समोरच्या व्यक्तीला भेट देतो तेव्हा आपल्याला त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात.

ज्योतिष शास्त्रामध्ये असे सांगण्यात आलेली आहे की प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी एक ऊर्जा असते. त्यामुळे त्या वास्तूचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक सुद्धा परिणाम होत असतो म्हणून अशावेळी एखाद्या व्यक्तीला ती वस्तू भेट देत असताना त्या व्यक्तीचा त्या वास्तूचा आपल्या जीवनावर प्रभाव सुद्धा जाणूनच ती भेट द्यायला हवी. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देत असतो तेव्हा त्या वस्तूचा परिणाम आपल्यावर सुद्धा होत असतो.

अनेकदा चुकीच्या गोष्टी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीचा प्रवेश होत नाही तर किंवा आपल्या जीवनातील माता महालक्ष्मी निघून जाते त्याचबरोबर आपण काय वस्तू भेटू देतो आहे याचा प्रभाव सुद्धा ग्रहांवर सुद्धा होत असतो आणि त्यानुसार आपले पुढील कार्य ठरले असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ,जेणेकरून आपल्याला कोणत्या वस्तू या लोकांना भेट म्हणून द्यायला पाहिजे व कोणत्या वस्तू भेट म्हणून नाही द्यायला पाहिजे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती माहिती.

भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा सांगितले आहे की या वस्तू चुकून सुद्धा भेटवस्तू द्यायला नाही पाहिजे. त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे माता महालक्ष्मीची मूर्ती. अनेकदा आपण आजूबाजूला पाहत असतो की माता महालक्ष्मीची मूर्ती हमखास अनेक वेळा दिवाळीच्या दिवशी एकमेकांना दिले जाते परंतु हे जरी चांगले असले तरी त्यामागे काही कारण सुद्धा गरजेचे आहे ते म्हणजे अनेकदा आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला माता महालक्ष्मीची मूर्ती देतो तेव्हा समोर देणाऱ्या ला सुद्धा व घेणाऱ्याला सुद्धा असे काही वेळा परिणाम भोगावे लागू शकतात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला माता महालक्ष्मीची मूर्ती भेटवस्तू म्हणून देतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या घरातील लक्ष्मी समोरच्या व्यक्तीला प्रदान करत असतो आणि त्यामुळे आपल्यावर आर्थिक संकट सुद्धा येऊ शकते.

अनेकदा असे म्हणले जाते की देव पूजा करण्याच्या काही वस्तू असतात ते सगळ्या स्वतःच्या पैशाने विकत घ्यायला पाहिजे जर आपण दुसऱ्याच्या पैशाने विकत घेतले तर ते पुण्यात त्या व्यक्तीच्या भाग्य जमा होतो म्हणूनच अशावेळी आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गणपतीची मूर्ती. अनेकदा आपण पाहतो की एखाद्या चा गृहप्रवेश असेल ,दुकानाचे ओपनिंग असेल, काही शुभ कार्य असेल तर अशा वेळी आपण एकमेकांना गणेशाची मूर्ती देत असतो हे सुद्धा चुकीचे ठरते. अनेक वेळा आपण गणपतीची मूर्ती देतो म्हणजे आपण आपली विद्या समोरच्या व्यक्तीला दान करत असतो त्याच बरोबर गणेश हे संकट दूर करणारे असतात याचा अर्थ आपले जे संकट टाळणारे गणपती आहे.

आपणही दुसऱ्याच्या हवाली करतो आणि यामुळे अनेकदा आपल्या जीवनामध्ये संकट सुद्धा येऊ शकतात त्याचबरोबर अनेकदा घरामध्ये एकापेक्षा जास्त गणपती मूर्ती असल्यामुळे सुद्धा आपण त्यांची विशेष पद्धतीने काळजी घेऊ शकत नाही आणि गणपतीची पूजा करत असतांना डावी-उजवी होऊन अशा काही गोष्टींचा सुद्धा आपल्याला विचार करायला सज्ज त्यांची योग्य प्रमाणामध्ये किंवा विधिवत पूजा झाली नाही तर त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे घडी.

आपण अनेकदा पाहिले आहे की अनेक जण एकमेकांना घडी भेटवस्तू म्हणून देत असतात खरे तर घडी भेटवस्तू देणे म्हणजे अत्यंत चुकीचे आहे. घडी एकमेकांना भेट देणे म्हणजे याचा अर्थ आपण समोरच्या व्यक्तीला आपली चांगली वेळ आणि वाईट वेळ सुद्धा देत असतो किंवा त्याची चांगली वेळ किंवा वाईट वेळ सुद्धा स्वीकारत असतो अशामुळे आपल्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो म्हणून एकमेकांना घडी गिफ्ट म्हणून देणे टाळले पाहिजे त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे धारदार वस्तू.

खरे तर आपण धारदार वस्तू एकमेकांना सहसा देत नाही परंतु अनेकदा आपण भांड्यांचे सेट देत असताना कळत-नकळतपणे एखादी धारदार वस्तू त्यामध्ये देत असतो , अशा वेळी जर आपण एखाद्या व्यक्तींना भेट म्हणून अशा धारदार टोकदार वस्तू जर दिल्यानंतर त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो व आपले नातेसंबंध बिघडू शकतात म्हणून या गोष्टी शक्यतो एकमेकांना भेटवस्तू देण्याचे टाळले पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *