घरामध्ये या ठिकाणी चुकूनही ठेऊ नका झाडू नाहीतर येईल कायमची गरिबी.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घराच्या प्रगतीत झाडूचा खूप मोठा वाटा असतो. वास्तुशास्त्रानुसार झाडू म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि म्हणून आपल्या घरात झाडूच स्थान कुठे असावं, झाडू नक्की कुठे ठेवावी यासंबंधी हिंदू धर्म शास्त्रात आणि वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
तर आज आपण पाहणार आहोत झाडू कोणत्या दिशेला चुकूनही ठेऊ नये, कारण या दिशेला झाडू ठेवल्याने आपल्या घरात वाद विवाद निर्माण होतात. घरातील लोक एकमेकांशी भांडू लागतात तसेच घरातील सुख शांती नष्ट होते. इतकंच काय तर वारंवार या ठिकाणी झाडू ठेवल्याने घरातून माता लक्ष्मी हद्दपार होते, तसेच माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहत नाही. परिणामी आपल्या घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो आणि घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येते. चला तर जाणून घेऊया झाडू कोणत्या दिशेला चुकूनही ठेऊ नये.
मित्रांनो उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांच्या दरम्यानची दिशा आहे ईशान्य दिशा. हि ईशान्य दिशा अत्यंत पवित्र समजली जाते आणि म्हणूनच घर, गाव किंवा शहर असो या प्रत्येक ठिकाणचा ईशान्य कोपरा हा आपण पवित्र ठेवायला हवा. या ठिकाणी देवघराची निर्मिती अवश्य करा. जर तुम्हाला या ठिकाणी देवघर स्थापित करणं शक्य नसेल तर या ठिकाणी पाण्याची एखादी वस्तू ठेवा.
हा जो ईशान्य कोपरा आहे तो नेहमी स्वच्छ ठेवा. जर तो स्वच्छ ठेवणं सोप्प नसेल किंवा या ठिकाणी एखादी कोणती वस्तू ठेवणं शक्य नसेल तर किमान आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकीची वस्तू ठेऊ नका. हा कोपरा रिकामा ठेवलात तरीही चालेल.
बरेचजण ईशान्य दिशेस कचरा ठेवतात, वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ईशान्य कोपऱ्यात डस्टबिन ठेवलेली असते त्या घराची प्रगती कधीच होत नाही. तसेच या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा साठा करून ठेऊ नये. तसेच या ठिकाणी टॉयलेट च निर्माण चुकूनही करू नका किंवा किचनही या ठिकाणी बनवणं चुकीचं आहे. या ठिकाणी लोखंडाची किंवा जड वस्तू ठेऊ नका.
मित्रांनो या ठिकाणी टॉयलेट बनवल्याने, कचरा पेटी ठेवल्याने किंवा कोणत्याही प्रकारची अधार्मिक वस्तू ठेवल्याने आपल्या घरातील धन संपत्तीचा नाश होतो. दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागत आणि हळू हळू आपलं घर बरबाद होऊ लागतं. मित्रांनो आपल्या घरात झाडू ठेवण्याची सर्वात अयोग्य दिशा ती म्हणजे ईशान्य दिशा. या ईशान्य कोपऱ्यामध्ये चुकूनही झाडू ठेऊ नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.