घड्याळ या दिशेला अजिबात लावू नये; यामुळे जीवनातील नकारात्मकता होते अधिक गडद.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूचे महत्व सांगण्यात आले आहे. जर आपल्या घरामध्ये एखादी वस्तू योग्य ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी यामुळे व त्या वस्तू मुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करते आणि जर एखादी वस्तू आपल्या घरामध्ये योग्य जागेवर नसल्यास त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि या नकारात्मक ऊर्जेचा व सकारात्मक उर्जेचा आपल्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम सुद्धा होत असतो. वैज्ञानिक शास्त्र सुद्धा या घटनेला दुजोरा देताना पाहायला मिळते.
आपल्या घरामधील वस्तू अनेकदा घरांमध्ये वेगळ्या प्रकारचे तरंग निर्माण करत असतात आणि आपल्या घरामध्ये वातावरण निर्माण करत असते.आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये घड्याळ हमखास पाहायला मिळते. घड्याळ हे आपल्या जीवनातील वर्तमानकाळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ याचे प्रत्यक्ष अनुमान सांगत असते. आपल्या जीवनावर सर्वात जास्त एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडत असेल तर ती गोष्ट म्हणजे वेळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेळ एकसारखी सुद्धा नसते.
वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ ही प्रत्येकाच्या पुढे जात असते. या वेळेला आपल्याला गाठायचे असते. जर आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ आणायची असेल तर त्यासाठी आपल्याला काही उपाय करणे सुद्धा गरजेचे आहे. या उपायांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ आवश्य आणू शकतो आणि जी वाईट वेळ आहे त्या वाईट वेळेवर वर मात करू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ असते.
ही घड्याळ आपल्या जीवनामध्ये चांगली किंवा वाईट वेळ आणू शकते परंतु जर आपण सगळेच घड्याळचा योग्य तो उपयोग करून घेतला तर आपल्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास करते. अनेकदा आपल्या जीवनातील अशा छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो परंतु या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पाडत असतात. जर आपल्या घरातील घड्याळ योग्य दिशेला असेल तर यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ येते त्याच बरोबर जर आपल्या घरामध्ये कॅलेंडर आपण लावत असतो.
तसे तर कॅलेंडर लावण्याची दिशा सुद्धा योग्य असावी. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनावर खूपच प्रभाव पाडत असतात आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण या गोष्टींबद्दल सविस्तर मध्ये माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ आपल्याला पाहायला मिळतात. वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घरातील घड्याळ गोलाकार व अंडाकृती असेल तर अत्यंत शुभ मानले जाते परंतु सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि फॅशनच्या दुनियेत आपल्या घरातील गऱ्यांचा आकारसुद्धा कालांतराने बदललेला आहे. अनेकांच्या घरांमध्ये चौकोनी, आयताकृती लांबट अशा वेगवेगळ्या आकाराच्या घड्याळ पाहायला मिळतात, तसे तर वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत चुकीचे आहे.
आपल्यापैकी अनेक जण घड्याळ लावताना त्या घड्याळाच्या आत मध्ये देवी-देवतांचे फोटो सुद्धा लावत असतात. हे सुद्धा अत्यंत चुकीचा आहे. या सर्वांचा कुठेना कुठे आपल्या जीवनावर सुद्धा परिणाम होतो. ज्या ठिकाणी देवांचे फोटो असतात अशा ठिकाणी अगरबत्ती करणे गरजेचे आहे व पूजा सुद्धा करणे महत्त्वाचे आहे परंतु जेव्हा आपण घड्याळांमध्ये देवांचे फोटो लावतो तेव्हा आपण अनेक दिवस घड्याळ पुसत नाही आणि परिणामी धूळ जमा होते. असे होत असेल तर याचा विपरीत परिणाम आपल्यावर होऊ शकतो तसेच घड्याळ यांचा आकार गोलाकार किंवा अंडाकृती असणे गरजेचे आहे.
घड्याळाचे गोलाकार आणि अंडाकृती हे पृथ्वीचे प्रतीक मानले जाते व चौरस आकाराचे घड्याळ असते त्याच्या चारी बाजूला टोकेरी बाजू असतात. या टोकेरी बाजू वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करणाऱ्या मांडलेल्या असतात आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये चौकोनी आयताकृती घड्याळ असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करू लागते.
आपण नेहमी स्वच्छ राहतो. स्वच्छ व चांगले दिसण्यासाठी आपण अनेक प्रयोग करत असतो आणि चांगले चांगले कपडे घालून आपण आपले व्यक्तिमत्व सुधारत असतो त्याच पद्धतीने आपल्या घरातील घड्याळ सुद्धा नेहमी स्वच्छ करायला हवे. त्या घड्याळावर कोणत्याच प्रकारची धूळ साचू देऊ नका. जेव्हा घड्याळावर धूळ असते यामुळे सुद्धा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.
घरामध्ये धूळ साचलेली, बंद पडलेले तसेच खराब झालेले घड्याळ ठेवू नये. आपल्या घरातील घड्याळ कधीच दक्षिण दिशेला लावू नये. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि या दिशेला अनेक वाईट गोष्टी आकर्षित होत असतात आणि जर आपण अशा वेळी दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास आपले वेळ सुद्धा चुकीच्या दिशेने प्रवास करू लागते आणि आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात.
तुम्ही तुमच्या घरामध्ये उत्तर-पूर्व दिशेला घड्याळ लावू शकता परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधीही आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या वर किंवा घरातील अन्य रूममधील प्रवेश करण्याचा ठिकाणावर घड्याळ अजिबात लावू नका. या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या दिनचर्या वर व येणे जाणाऱ्या घटनेवर होऊ शकतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर असते. कॅलेंडरच्या सहाय्याने आपण अनेक तिथी, वार पाहत असतो आणि जर तुमच्या घरातील कॅलेंडर पूर्व व उत्तर दिशेला असणे उत्तम मानले जात नाही. याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर सुद्धा होऊ शकतो.
घड्याळ आणि कॅलेंडर हे दोन्ही आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्याचे संकेत असतात. वेगवेगळ्या मार्गांचा आपल्याला पत्ता सांगत असतात. आपण अनेक संधी प्राप्त करत असतो आणि म्हणूनच त्या दोघांची दिशासुद्धा योग्य असणे गरजेचे आहे. आपल्या घरामध्ये बंद पडलेले घड्याळ अजिबात ठेवू नये. बंद पडलेले घड्याळ आणि जुने कॅलेंडर यामुळे आपल्या नशिबावर सुद्धा चुकीचा परिणाम होतो आणि आपली प्रगती होण्याऐवजी दिवसेंदिवस अधोगती होत असते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा आपल्याला प्रकर्षाने विचार करायला हवा. जर तुमच्या घरी सुद्धा बंद पडलेले घड्याळ आणि जुने कॅलेंडर असतील तर ते आत्ताच काढून नवीन घड्याळ आणि नवीन कॅलेंडर अवश्य लावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.