घरात कोणते झाड-रोप लावणे शुभ असते.? एकदा अवश्य वाचा नाहीतर होईल खूपच पच्छाताप.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या घरात ही झाडे लावली जातात त्या घरांमध्ये नेहमी आनंद सुख व समाधान असते तसेच ही झाडे सर्वजण लावतात आणि झाडे अध्यात्मिक दृष्ट्या तसेच वैज्ञानिक दृष्ट्या लावले जातात यामुळे हवेत ऑक्सिजनची निर्मिती होऊन वातावरण शुद्ध होते. झाडे लावणे चांगले काम आहे परंतु ही काही झाडे लावली तर आपल्यावर चांगली कृपा होईल तर ती झाडी कोणती आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत याने आपल्या घरात कृपा होईल. प्रत्येकाच्या घरी झाड हे असायलाच पाहिजे. तुमच्या घराच्या बाहेर तुळशीचे झाड असेल तर तुमच्या घरात कोणतेही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही कारण तुळशी नकारात्मक ऊर्जा नष्ट करते.
ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. तुळशीला नारायण चे प्रती रूप असेही म्हटले जाते.ज्या घरात तुळशीचे रोपटे असते त्या घरांमध्ये पैश्याची कमतरता जाणवत नाही. ज्या घरात तुळशीचे रोप असते , त्या घरात अन्नधान्याची कमतरता पडत नाही.कडीपत्त्याचे झाड लावले तर त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा असते कारण कढीपत्त्याचे झाड लावल्याने शनी व राहू या घरात शांत राहतात तसेच तुम्हाला शांतता व समाधान मिळेल .जर तुम्ही आवळ्याचे झाड लावले तर देवी लक्ष्मी तुमच्या घरी वास्तव्य करेल.तुम्हाला स्वतः जाणवू लागेल.
आवळा झाडात भगवान श्रीहरी विष्णूचा वास असतो आणि स्वतः भगवान श्रीविष्णु असतील तेथे लक्ष्मी स्वतः वास करत असते म्हणून आवळ्याचे झाड आपल्याला घरात लावायला हवे चौथे झाड म्हणजे रुई चे झाड. तुम्ही कुंडीत किंवा कोठेही जमिनीवर लावण्याचा कारण म्हणजे की 11 वर्षा नंतर रुईच्या मुळांवर स्वतः गणपती बाप्पा प्रकट होतात व झाडाचा आकार गणपती बाप्पा सारखा होतो. पांढरी रुई जास्त महत्त्वाचे मानले गेले असून याचे फुले गणपती बाप्पा तसेच महादेवांना घेतली आहेत. हे झाड लावल्याने आपल्या वर सूर्याचा प्रभाव पडतो.
पारीजातक याची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे.समुद्र मंथनातून जे काव्यरत्न बाहेर आले या झाडाला नुसता स्पर्श केला तरी पारिजातक चे पुण्य लाभते. पारिजातकाचे झाड सर्व देवी-देवतांना आवडत असते. हे झाड स्वर्गात सुद्धा लावलेले आहे यांच्या घरात पारिजातकाचा वृक्ष असेल त्यांच्या घरात कधीही कोणतेही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही.
पारिजातकाचे फुले सुगंधी असतात. सर्व देवी-देवतांना पारिजातकाची फुले वाहिले जातात आणि असे केल्याने दोष दूर होतात. जर एखादा दोष आपल्याला लागला असेल तर तो दोष दूर होतो अशा प्रकारचे हे झाड आपण घरात लावताना पूर्व कडे लावायला हवे. जेव्हा आपण एखादे झाड लावतो तर त्यांचे पावित्र्य राखणे सुद्धा महत्वाचे आहे किंवा आचार्यांनी या झाडाची पूजा करणे चांगले म्हंटले आहे आणि या झाडांचे नेहमी दर्शन करावे, यांना रोज पाणी देणे हे गरजेचे आहे. आता आपण जाणून घेऊया की कोणती झाडी लावावी आणि कोणी झाडे लावू नये.
काही झाड लावण्याने आपल्या घराचा विनाशपासून कोणीही रोखू शकत नाही तसेच देवी लक्ष्मी हे आल्या पावली निघून जाते.जर हे झाड असेल तर लगेच काढून कोठे तरी लावून द्या. घरात सुख समृध्दी यावी तर यासाठी घरात किंवा घराच्या आपण झाडे लागतो परंतु आपल्याला हे माहीत आहे का झाडेझुडपे आपल्यासाठी बरबाद याचेही कारण ठरू शकतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आसपास काही झाडे लावू नयेत त्यामुळे घरात कधीच देवी लक्ष्मी राहत नाही. जर तुमच्या घरा जवळ अशी झाडे असतील तर सावध व्हा तसे तर चिंच महटले ते सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते आणि हवी हवीशी वाटते परंतु चिंचेचे झाड घराच्या आसपास लावणे खूप अशुभ मानले जाते.
या झाडाला नकारात्मकतेचे ठाण मांडले जाते म्हणून या झाडावर भुतं ,प्रेत त्यांचे वास्तव्य असते.हे झाड घराची प्रगती थांबवते आणि आजू बाजूला भुतं असल्याचे जाणवते याविषयी अनेकांना अनुभव आलेला असतो. दुसरे म्हणजे बोराचे झाड कारण बोराच्या झाडाला नकारात्मकतेचे वास्तव मानले जाते कारण यामुळे धनाची बचतही होत नाही व नेहमी अडचण जाणवते म्हणून हे झाड घराच्या अगदी समोर असूनही ते घरापासून लांब असावे व तसेच नगफणी झाड सुद्धा नसावे हे झाड असल्याने वाद विवाद होत असतात. शांतता काही ना काही कारणाने भंग पावते. दुर्घटना, सततचे आजारपण होत असतात. घराची प्रगतीही खुंटते. या झाडाला अशुभ मानले जाते. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना लागले तर खूप मोठे इन्फेक्शन होण्याची भीती असते ज्यामुळे मृत्यूही होऊ शकतो म्हणून अशी संकटे निर्माण करणारी झाडे लावू नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.